Shravan Bal Yojana | श्रावणबाळ अनुदान योजना |

दरमहा मिळणार 1500/- रूपयांचे आर्थिक साहाय्य

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वर श्रावणबाळ अनुदान योजनेबद्दल (Shravan Bal Yojana) संपूर्ण माहिती घेणार आहे. महाराष्ट्र सरकार जेष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवत असते आणि त्यातून वयस्कर नागरिकांना बराच फायदा देखील होतो. महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या वयस्कर वृद्ध लोकांना दरमहा आर्थिक मदत व्हावी म्हणून श्रावणबाळ योजने अंतर्गत दर महिन्याला 1500/- रुपये दिले जाणार आहे. यामुळे वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारेल. त्यांचा आर्थक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होईल. तरी राज्यांतील सर्व वयस्कर मंडळी नी श्रावण बाळ योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया

Shravan Bal Yojana :- आज आपण या लेखात श्रावणबाळ अनुदान योजना नक्की काय आहे, श्रावणबाळ अनुदान योजनेची ठळक वैशिष्ट्ये, श्रावणबाळ अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता, अटी, नियम तसेच श्रावणबाळ योजने साठी अर्ज कसा करावा, आणि त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अशा सर्व बाबींची माहिती जाणून घेणार आहोत. हा लेख वाचून सर्व गरजू वयस्कर लोकांपर्यंत हा लेख नक्की पोहचवा आणि गरजूंना मदत करा.

श्रावणबाळ अनुदान योजना नक्की काय आहे

Shravanbal Yojana अंतर्गत महाराष्ट्र राज्यांतील गरजू, गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या निराधार वृद्ध व्यक्तींना ज्यांचे वय 65 वर्षे किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजना चा लाभ घेता येईल. दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असलेल्या अथवा नसलेल्या 65 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या नागरिकांना श्रावणबाळ अनुदान योजना अंतर्गत प्रती महीना 1500/- रुपये आर्थिक साहाय्य मिळणार आहे.

वैशिष्ट्ये

 • Shravanbal Yojana ही वृध्द लोकांसाठी सुरु केलेली खास योजना आहे.
 • वयस्कर नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात कोणावर अवलंबून राहू लागू नये म्हणून श्रावणबाळ अनुदान योजना अंतर्गत प्रती महिना आर्थिक मदत दिली जाईल
 • आर्थिक परिस्थितीने मागास असलेल्या नागरिकांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे
 • योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थी च्या बँक खात्यात जमा होणार आहे

लाभ

 • श्रावणबाळ योजना अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी दर महा 1500/- रुपये अदा करणे
 • जेष्ठ नागरिक स्वावलंबी बनतील आणि त्यांचे जीवनमान सुधारेल
 • राज्यांतील वयस्कर मंडळी मिळालेल्या अनुदानातून स्वतःच्या मूलभूत गरजा भागवू शकतील
 • वृध्द नागरिक सक्षम आणी आत्मनिर्भर होण्यास मदत होईल
 • जेष्ठ व्यक्ती स्वतःच्या गरजा स्वतः पुर्ण करू शकल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण होईल
 • वयस्कर नागरिकांना तोंड द्याव्या लागणाऱ्या आर्थिक समस्यांचे प्रमाण कमी होईल

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

श्रावणबाळ योजना उद्देश

 1. राज्यांतील जेष्ठ व्यक्तींना आर्थिक साहाय्य करून त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे
 2. वयस्कर नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे
 3. जेष्ठ नागरिकांचे वृध्दप काळातील जीवनमान सुधारणे

पात्रता

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे

श्रावणबाळ अनुदान योजना नियम आणि अटी

 • लाभार्थी 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करणारा असावा
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे
 • श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त असावे
 • लाभार्थी च्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000/- रुपयांच्या आत असावे
 • अर्जदार कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर शासकीय सेवेत रुजू असेल तर लाभार्थीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही
 • अर्ज करणारी व्यक्ती जर आधीच कोणत्या पेन्शन चा लाभ घेत असेल तर तिला Shravanbal Anudan Yojana चा लाभ घेता येणार नाही

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • पॅन कार्ड
 • वयाचा दाखला
 • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी दाखला/ डोमासाईल
 • वीज बील
 • रेशन कार्ड
 • घरपट्टी
 • उत्पन्न दाखला
 • दारिद्य्र रेषेखालील प्रमाण पत्र
 • वैध मोबाईल क्रमांक

येथे pdf download करू शकता

अर्ज कसा करावा

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • सर्वात आधी तुमच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीला किंवा तहसील कार्यालयाला भेट द्या
 • तिथे श्रावणबाळ अनुदान योजना चा अर्ज घ्या
 • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सांगितलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडा
 • आणि सदर अर्ज कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा
 • अशा प्रकारे अर्ज करण्याची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण होईल

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

 • श्रावण बाळ योजनेबद्दल ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या
 • मुख पृष्ठ वर तुम्हाला नवीन युजर किंवा येथे नोंदणी करा असे दिसेल त्यावर क्लिक करा
 • पुढे 2 पर्याय दिसतील त्यापैकी एकावर क्लिक करा तिथे अर्ज येईल
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा आणि सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा
 • अर्ज सबमिट करा, अशा प्रकारे तुमची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल

श्रावण बाळ योजने अंतर्गत लभार्थी यादी पाहण्याची प्रक्रिया

 • श्रावणबाळ योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्या.
 • मुख पृष्ठ वरती आल्या नंतर तुम्हाला लाभार्थी यादी वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा/ब्लॉक/गाव निवडावे लागेल.
 • त्यानंतर तूमच्या समोर लाभार्थी यादी ओपन होईल.
 • अशा प्रकारे तुम्ही या योजनेची लाभार्थी यादी पाहू शकता.

Shravanbal Yojana Overview

योजनेचे नावश्रावणबाळ अनुदान योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभप्रति महिना 1500/- रुपयेआर्थिक साहाय्य
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांवरील
जेष्ठ नागरिक
उद्देश राज्यांतील जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन/ ऑफलाईन
Shravan Bal Yojana

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा


shravan bal yojana marathi | श्रावणबाळ अनुदान योजना मराठी | shravan bal yojana details in marathi | निराधार अनुदान योजना | Maharashtra Shrvan Bal Yojana | Shravan Bal Anudan Yojana Maharashtra | Maharashtra Shravan Bal Yojana | shravan bal yojana list 2022 maharashtra | Shravan Bal Yojana Maharashtra | Shravan Bal Yojana | Shravan Bal Yojana | Shravan Bal Anudan Yojana | Shravan Bal Yojana Maharashtra |