Nabard Loan For Dairy Farming | दूध व्यवसाय अनुदान योजना |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण एका व्यवसाय अनुदान बद्दल माहिती घेणार आहोत ज्याचे नाव आहे डेअरी अनुदान योजना (Nabard Loan for Dairy Farming). आता करा स्वतःचा व्यवसाय सुरू तेही तुमच्या हक्काच्या पैशातून. आर्थिक परिस्थितीमुळे तुम्ही जर व्यवसाय करण्यासाठी थांबला आहात तर थांबु नका ,आजच डेअरी अनुदान योजना चा लाभ घेऊन स्वतःची दूध डेअरी सुरू करा आणि लाखो रुपये कमवा. सरकार शेतकऱ्यांचा कल्याणासाठी अनेक योजना राबवित असते शेतकऱ्याना शेती पूरक जोडधंदा होईल या हेतूने देखील शासनाने अशी स्कीम राबविण्याचा संकल्प केला आहे. या योजनेतून बेरोजगार, गरीब, शेतकरी तसेच अनेक लोकांना रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील. भारतात मोठया प्रमाणावर दुधाचे उत्पादनही वाढेल. एकुणएक या योजनेमुळे सर्वांना फायदाच होणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि सविस्तर माहिती साठी हा लेख नक्की वाचा आणि गरजूंना देखील हा लेख नक्की पोहचवा.

Nabard Loan for Dairy Farming :- आज आपण नाबार्ड डेअरी कर्ज योजना नक्की काय आहे , डेअरी अनुदान योजना चे फायदे, ठळक वैशिष्ट्ये, पात्रता, लाभ, दूध व्यवसाय अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व बाबींची संपुर्ण माहिती घेणार आहोत

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

डेअरी व्यवसाय कर्ज अनुदान योजना नक्की काय आहे

शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेतकऱ्याना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि देशातील दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने ही योजना राबावण्यास सुरुवात केली आहे. नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजना अंतर्गत सरकार एका जनावरासाठी 17750/- रुपये इतके अनुदान दिले जाते. असंघटीत क्षेत्रात संरचनात्मक बदल घडवून आणणे हे या योजनेचा मुख्य हेतु आहे. दुधाची प्राथमिक प्रक्रिया ग्रामीण भागात च पूर्ण करण्याचा प्रयत्न NABARD Scheme याद्वारे केला जाईल. या योजनेअंतर्गत दुग्ध शाळेच्या / डेअरीच्या स्थापनेस प्रोत्साहन दिले जाईल

Dairy Farming Scheme

नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजनेचा उद्देश

 • शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेतकऱ्याना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे
 • देशातील दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत दुग्ध शाळेच्या / डेअरीच्या स्थापनेस प्रोत्साहन देणे
 • असंघटीत क्षेत्रात संरचनात्मक बदल घडवून आणणे
 • दुधाची प्राथमिक प्रक्रिया ग्रामीण भागात च पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
 • स्वच्छ दुधाच्या उत्पादनासाठी असंघटीत क्षेत्रातच आधुनिक डेअरी फार्म उभारण्यास प्रोत्साहित करणे

वैशिष्ट्ये

 • नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजना अंतर्गत सरकार एका जनावरासाठी 17750/- रुपये इतके अनुदान दिले जाते
 • दुधापासून जर तुम्हाला दुसरी उत्पादने तयार करावयाची असतील तर त्यासाठी लागणाऱ्या मशीन खरेदीसाठी तुम्हाला 25 टक्के अनुदान दिले जाईल
 • Nabard Dairy Loan अंतर्गत शीतगृह बनवण्यासाठी 25 टक्के अनुदान दिले जाईल
 • या योजने अंतर्गत इच्छूक व्यक्ती 2 जनावरांसह स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकतात
 • Dairy loan Yojana अंतर्गत अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती प्रवर्गातील नागरिकांना एका जनावरांसह 23300/- रुपये अनुदान दिले जाते.

Nabard Loan for Dairy Farming

पात्रता

 • योजने अंतर्गत एक व्यक्ती एकाच वेळेस लाभ घेऊ शकतो
 • संघटीत गटामध्ये दूध, सहकारी संस्था, बचत गट, दूध संघ इ. चा समावेश होतो
 • Nabard Loan Scheme अंतर्गत एखादया व्यक्तीला सर्व घटकांसाठी मदत मिळू शकते, परंतू तो लाभार्थी प्रत्येक घटकांसाठी केवळ एक वेळेसच पात्र असेल.

नाबार्ड डेअरी फार्म योजने अंतर्गत कर्ज देणाऱ्या संस्था

 • प्रादेशिक बँक
 • राज्य सरकारी बँक
 • राज्य सरकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक
 • व्यावसायिक बँक
 • नाबार्ड कडून पूनर्वितासाठी पात्र असलेल्या इतर संस्था

लाभार्थी

 • असंघटीत क्षेत्र
 • संघटित गट
 • कंपन्या
 • शेतकरी
 • गैर सहकारी संस्था
 • उद्योजक

अर्ज कसा करावा

Dairy Farming Scheme Online Application

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या
 • तुमच्या समोर मुख पृष्ठ (होम पेज) येईल
 • पुढे सूचना केंद्र हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा
 • आता एक नवीन पेज ओपन होईल
 • तिथे परिपत्र या पर्यायावर जा आणि डाऊनलोड pdf वर क्लिक करा
 • आता तुमच्या समोर नाबार्ड योजनेचा अर्ज येईल तो सविस्तर भरून घ्या
 • सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
 • अशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत

 • सर्वात आधी तुम्हाला कोणते (छोटे/मोठे) डेअरी फार्म उघडायचे आहे ते आधी ठरवा
 • जर तुम्हाला छोटे फॉर्म उघडायचे असेल तर तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन Nabard Dairy Loan Scheme साठी अर्ज करा
 • जर तुम्हाला मोठे फॉर्म उघडायचे असेल तर तुम्हाला जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल
 • अर्जदाराच्या कर्जाची रक्कम जर मोठी असेल तर अर्जदाराला त्याचा प्रकल्प अहवाल नाबार्ड कडे सादर करावा लागेल

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • पॅन कार्ड
 • मोबाइल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • बँक खाते
 • उत्पन्न दाखला
 • सातबारा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Overview :

योजनेचे नावNabard Loan For Dairy Farming | नाबार्ड डेअरी कर्ज अनुदान योजना
कोणी सुरु केलीकेंद्र सरकार
विभाग नाबार्ड
लाभदूध व्यवसाय करण्यासाठी अनुदान
लाभार्थीदेशातील नागरिक
श्रेणी केंद्र सरकारी योजना
उद्देश देशातील बेरोजगार नगरिकाना रोजगार उपलब्ध
करून देणे आणि दुधाचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहित करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन/ ऑफलाईन
Nabard Loan For Dairy Farming

Dairy Farming Scheme | NABARD Yojana | दूध अनुदान योजना | दूध व्यवसाय अनुदान योजना | NABARD Yojana: Dairy Farming Scheme Online Application | Nabard Loan For Dairy Farming | NABARD Scheme 2023 | नाबार्ड योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन | Dairy Farming Scheme Online Application | NABARD Yojana: Dairy Farming Scheme Online Application | नाबार्ड योजना 2023 मराठी: डेअरी फार्मिंग योजना ऑनलाईन अर्ज | nabard schemes | nabard loan | nabard dairy loan scheme 2022


अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा