Vishwakarma Loan Scheme | पीएम विश्वकर्मा कर्ज योजना |

कमी व्याजदरात सरकार देणार 3 लाखांपर्यंत कर्ज

कर्ज मिळत नाही का ?, व्याज जास्त आहे ? कर्ज घेण्याचा मार्ग बरोबर कोणता? असे प्रश्न कर्ज घेताना पडत असतील तर पीएम विश्वकर्मा कर्ज योजना (Vishwakarma Loan Scheme) हा लेख नक्की वाचा. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर पी एम विश्वकर्मा कर्ज योजना बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज सहज आणि कमी व्याजदरात उपलब्ध व्हावे म्हणुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त Vishwakarma Loan Scheme सुरू करण्याची घोषणा दिली. सर्व व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना या योजनेचा खूप फायदा होईल तरी सर्वांनी लेख वाचून पी एम विश्वकर्मा कर्ज योजना चा लाभ जरूर घ्या.

Vishwakarma Loan Scheme :- मित्रांनो या लेखात आपण पंतप्रधान विश्वकर्मा कर्ज योजना नक्की काय आहे, योजनेची वैशिष्ट्ये, यापासून मिळणारा लाभ, आवश्यतेनुसार पात्रता, विश्व कर्मा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत, पी एम विश्वकर्मा कर्ज योजना साठी अर्ज कसा करावा आणि यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तरी योजनेच्या संपूर्ण माहिती साठी हा लेख नक्की वाचा.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम विश्वकर्मा योजना नक्की काय आहे

देशातील व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी विश्वकर्मा योजना अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेव्दारे सोनार, लोहार, गवंडी, दगडी शिल्पकार, मोची आणि नाई यांसारख्या पारंपारिक कौशल्य असणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेतून लाभ मिळणार आहे. या योजनेत 18 पारंपारिक कुशल व्यवसायाचा समावेश केला आहे. देशातील कुशल व्यक्तींना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतील.

पीएम विश्वकर्मा योजना वैशिष्ट्ये

  • देशातील कारागीर आणि शिल्पकारांची कुशलातेची क्षमता वाढवणे
  • विश्वकर्मा योजनेचे एकूण बजेट 13000 कोटी ते 15000 कोटी आहे
  • कारागीर आणि शिल्पकार यांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करण्यास प्रवृत्त करणे.
  • देशातील कुशल व्यक्तींचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे
  • पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तंत्रज्ञान, आर्थिक साहाय्य व कौशल्य प्रशिक्षण यांचा समावेश होणार आहे
  • जर एखाद्या कुशल व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही आर्थिक अडचणी येत असेल तर ते या योजनेव्दारे कर्जासाठी अर्ज करू शकतात.

लाभ

  • यामध्ये 13 लाख रुपयांपर्यंतचे कर्जाची तरतूद करण्यात आली आहे
  • व्यवसाय करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये मिळतील, आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात व्यवसायाच्या विस्तारासाठी 2 लाखांपर्यंत कर्ज मिळते. कर्ज 5 टक्के व्याजदराने मिळेल
  • PM Vishwakarma Yojana अंतर्गत ठरलेल्या 18 ट्रेड मधील लोकांच्या कौशल्यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी मास्टर्स ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल आणि सोबत 500 रुपये दिले जातील
  • लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि मूलभूत व प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, 15000 रूपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  • पीएम विश्वकर्मा कर्ज योजना अंतर्गत 140 जातींचा समावेश केला आहे

PM Vishwakarma Loan Scheme

पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे कमीतकमी वय 18 आणि जास्तीत जास्त वय 50 वर्षे असावे
  • लाभार्थी हा विश्वकर्मा योजनेअंतर्गत निर्णय घेतलेल्या 18 व्यापरांपैकी एकाचा असणे अनिवार्य आहे
  • मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
  • लाभार्थी योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एका जातीचा असावा

विश्वकर्मा कर्ज योजनेचा लाभ कोणाला मिळणार

  • कुंभार
  • सुतार
  • नाविक
  • धोबी
  • लोहार
  • मूर्तिकार
  • शिंपी
  • मोची
  • न्हावी
  • कुलपांचे करागिर
  • चटई, झाडू बनवणारे कारागीर
  • सोनार
  • मच्छिमार
  • लहान मुलांची खेळणी बनवणारे
  • हातोडा बनवणारे

आवश्यतेनुसार कागदपत्रे

PM Vishvakarma Loan Scheme in Marathi

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक पासबुक तपशील
  • मोबाईल क्रमांक
  • ईमेल आयडी

पी एम विश्वकर्मा कर्ज योजना मराठी

अर्ज कसा करावा

  • सर्वात आधी पीएम विश्वकर्मा कर्ज योजनेच्या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या
  • आता तुम्हाला होम पेज वर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनाचे चित्र दिसेल
  • पुढे दिसलेल्या Apply Online बटन वर क्लिक करा
  • आता तेथे तुमचे नोंदणी करून घ्या, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलमध्ये SMS व्दारे येईल
  • त्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन करून अर्ज बिनचूक भरा आणि सोबत सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
  • अशा प्रकारे तूम्ही अगदी सोप्या पद्धतीने PM Vishwakarma Loan Yojana साठी अर्ज करू शकता.

Vishwakarma Loan Scheme Overview:-

योजनेचे संपूर्ण नाव पीएम विश्वकर्मा कर्ज योजना
सुरवात कोणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरुवात झाली 2023
विभागसूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
बजेट 13000 कोटी ते 15000 कोटी
लाभार्थी विश्वकर्मा योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या जाती
उद्देशकारागीर आणि शिल्पकार यांना आर्थिक मदत करून व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे
अधिकृत वेबसाईट pmvishwakarma.gov.in

फायदे

  • कारागीर आणि शिल्पकार यांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
  • जर एखाद्या कुशल व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही आर्थिक अडचणी येत असेल तर ते या योजनेव्दारे कर्ज उपलब्ध होईल.
  • देशातील कारागीर आणि शिल्पकारांची कुशलातेची क्षमता वाढण्यास मदत होईल
  • लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि मूलभूत व प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, 15000 रूपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  • देशातील कुशल व्यक्तींचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल
Vishwakarma Loan Scheme

PM Vishvakarma Loan Scheme | पी एम विश्वकर्मा कर्ज योजना | पी एम विश्व कर्मा योजना मराठी | ishvakarma Loan Scheme | PM Vishvakarma Loan Scheme in Marathi | विश्वकर्मा कर्ज योजना | विश्वकर्मा योजना | PM Vishvakarma Yojana | PM Vishvakarma Yojana in Marathi |


अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा