RTE Maharashtra | आर टी ई प्रवेश मध्ये करण्यात आला बदल: या शाळेत मिळणार नाही प्रवेश; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत RTE Maharashtra आर टी ई हा प्रवेश मध्ये झालेल्या बदल करिता माहिती, यासाठी आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

RTE Maharashtra In Marathi

मित्रानो, RTE Maharashtra महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिस्खन विभागातर्फे RTE म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यात बदल.करण्यात आलेला आहे. व त्या बाबतचे राजपत्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता एक किलोमीटर परिसरात शासकीय किंवा अनुदानित शका असल्यास संबंधित परिसरातील विना अनुदानित शाळेत RTE अंतर्गत प्रवेश दीला जाणार नाही. याच कारणामुळे आर टी ई प्रवेशाच्या जागा कमी होणार आहेत. याचा परिणाम इंग्रजी माध्यमांच्या शाळा येवेजी पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश सरकारी शाळांमध्ये करावा लागणार आहे.

RTE Maharashtra
  • शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 25% आरक्षित जागांवर आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता.
  • राज्यातील सुमारे 1 लाखाहून अधिक जगावर विद्यार्थी आर टी ई अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेत होते.
  • या विद्यार्थ्याना शुल्क प्रती पूर्तीची रक्कम शासनातर्फे संबंधित शाळांना दिली जात होती.
  • परंतु शासनाकडून शाळांना पूर्ण रक्कम दिली जात नव्हती.
  • याच कारणामुळे संस्था चालकांमध्ये शासानाबाबत नाराजी होती. आणखीनही शाळांची कोट्यवधी रुपये प्रतिकृतीची रक्कम शासनाकडे थकलेले आहे.
  • त्यातच आता शासनाने RTE कायद्याच्या कक्षेत सरकारी व अनुदानित शाळा आणल्या आहेत.

प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात काय आहे?

  • महाराष्ट्र राज्य शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या रजपत्रानुसार वंचित व दुर्बल घटकातील RTE 25% प्रवेश करिता ज्या खासगी विनाअनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत,
  • अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही.
  • त्याच बरोबर आर टी ई कायद्यात नियम 4 च्या उपनियंम पाच खाली निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विना अनुदानित शाळा कलम बाराच्या उप कलम दोन नुसार प्रतिपूर्ती करता पात्र ठरणार नाही.
  • त्यामुळे शुल्क प्रतिकृती बाबतही शासनाने स्पष्ट भूमिका झहीर केली आहे.

बारावी नंतर विद्यार्थ्याना मिळणार 43 हजार रुपये, येथे क्लिक करा

शासकीय व अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतीकृतीची रक्कम संबंधित शाळांना दिली जाणार नाही. असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून या उप कलमांचा अर्थ लावला जात आहे.

RTE Maharashtra राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या रजपत्रानुसार शैक्षणिक वर्ष 2024 – 25 साठी आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी. अशा प्रकारच्या सूचना राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण आयुक्त व प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाला दिल्या आहेत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

RTE Maharashtra | right to education act | RTE Admission process | education department | RTE Admission 2024 – 25 | karanataka pattern of RTE | RTE act Changing | RTE Act | RTE Admission In Marathi