PM Suryoday Yojana | प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 ( PM Suryoday Yojana ) बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आयोध्यामधील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची सुरुवात केली. मध्यमवर्गीय लोकांना विजबिलापासून दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे वीज बिल कमी करण्यासाठी सरकारने सूर्योदय योजना सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

PM Suryoday Yojana – या लेखात आपण योजना नक्की काय आहे?, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, प्रधानमंत्री सूर्योदय योजना पासून मिळणारा लाभ, तसेच योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज कसा करावा या सर्व बाबींची माहिती घेणार आहोत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री सूर्योदय योजना नक्की काय आहे

पंतप्रधान सूर्योदय योजनेच्या माध्यमातून सरकार द्वारे एक कोटी पेक्षा अधिक घरांवरती सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. आजही देशात अनेक ठिकाणी वीज पोहचलेली नाही, काही राज्यामध्ये घरासाठी लागणारी विजेची पुरेशी सुविधा नाही, तर काही ठिकाणी आर्थिक परिस्थिती मुळे वीज घेणे शक्य झालेले नाही अशा भागात वीज पोहचवण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्याचा निश्चय केला आहे. घरावरती सोलर पॅनल बसवून विजेचा पुरवठा केला जाणार आहे जेणेकरून घरातील विजेची सर्व कामे सौर ऊर्जेवर पूर्ण होणार आहेत. गरिबांना आर्थिक मदत म्हणून आणि दुर्गम भागात देखील वीज पोहचावी म्हणून सरकारने ही योजना चालू केली आहे

PM Suryoday Yojana Eligibility

पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखा पेक्षा जास्त नसावे
  • लाभार्थी कुटुंबापैकी कोणी सरकारी नोकरदार नसावा
  • घरात आयकर भरणारी व्यक्ती नसावी
  • बीपीएल कार्ड धारकास अधिक प्राधान्य
  • स्वतःचे घर असावे

फायदे

  • विजबिलापासून कायमची मुक्तता
  • 24 तास विजेची उपलब्धता
  • 2 कोटी घरावरती ही योजना राबविण्याचा प्लान असल्याने याने रोजगार निर्मिती

Pradhanmantri Suryoday Yojana Document

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मोबाइल क्रमांक (आधार कार्ड ला लिंक असलेला)
  • राहत्या घरचा ते घर स्वतचे असल्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • लाइट बिल
  • बँक पासबूक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • दिलेली माहिती सत्य असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा

  • सर्वात आधी शासनाच्या Solarrooftop.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
  • आता होम पेज ओपन होईल तिथे Registration वरती जावून आपली Consumer Account Details टाका
  • त्यात तुम्ही तुमचा जिल्हा,राज्य,आपणला वीज पुरविणारे महामंडळ आणि आपल्या लाइट च्या मिटर चा Consumer Account Numbeटाकायचा आहे आणि खाली Next बटन वरती क्लिक करा
  • आता तुमच्या मोबाईल वर रजिस्ट्रेशन केल्याचा मॅसेज येईल
  • आता लॉगिन करा आणि सर्व माहिती भरायची आणि अप्लाय करायचे आता तुम्ही Discom च्या मान्यतेची वाट पाहायची आहे
  • मान्यता मिळाली की,तुम्ही एखाद्या अधिकृत एजन्सी कडून आपल्या छतावर सोलर रुफटॉप बसवून घ्यायचे आहे.
  • सोलर रुफटॉप बसवले की, डिसकॉम तुमच्या त्या प्लांट ची शहनिशा करेल आणि तुम्हाला त्याचे वैध असल्याचे सर्टिफिकेट देईल.
  • त्यावेळी तुम्ही तेथे तुमचा एक रद्द चेक आणि बँक डीटेल टाकायच्या आहेत आणि apply करायचे आहे.
  • सर्व प्रक्रिया पुनः होईल आणि मग 30 दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील.

भूमिहीन शेतमजूरांना मिळणार जमीन

PM Suryoday Yojana in Marathi | PM Suryoday Yojana 2024 | PM suryooday yojana application process | pm Suryoday Yojana registration | pm Suryoday Yojana website | pradhanmantri Suryoday Yojana 2024 | pradhanmantri Suryoday Yojana in Marathi | pradhanmantri Suryoday Yojana registration | प्रधानमंत्री सूर्योदय योजना अर्ज | suryoday Yojana 2024 |