Bhumihin Yojana 2024 Marathi | भूमिहीन योजना; दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण भूमिहीन योजना 2024 (Bhumihin Yojana 2024 Marathi) बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजेच आज आपण दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना बद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजूर त्यांच्या हक्काची जमीन मिळणार आहे.

Bhumihin Yojana 2024 – आज आपण या लेखात भूमिहीन योजना 2024 नक्की काय आहे, भूमिहीन योजनेची उद्दिष्ट्ये/ वैशिष्ट्ये, या योजनेपासून मिळणारा लाभ, योजनेसाठी असणारी आवश्यक पात्रता, अटी तसेच भूमिहीन योजना 2024 साठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत

रमाई घरकुल आवास योजना साठी येथे क्लिक करा

भूमिहीन शेतमजूर योजना नक्की काय आहे ?

आजपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी अनेक नवनवीन योजना राबवल्या आहेत. या योजना शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरल्या आहेत. पण आता सरकारने शेत मजुरांचा विचार करून त्यांच्यासाठी देखील एक नवीन योजना सुरू केली आहे ती म्हणजे भूमिहीन योजना 2024/ दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना होय.

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर यांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर कोरडवाहू शेत जमिनीसाठी 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. या प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमीन खरेदी करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी हा शासनाचा प्रमुख हेतू आहे.

लाभ

 • दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दारि्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखाली जमीन उपलब्ध करून त्यांच्या नावे करून देण्यात येते.
 • जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्च पैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज तर 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते

पात्रता

 • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
 • लाभार्थीचे कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 60 वर्षे असणे अनिवार्य आहे
 • शेतमजूर हा दारिद्रयरेषेखालील असला पाहिजे, विधवा किंवा परीतक्त्या स्त्रियांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल
 • महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सीलिंग च्या जमिनी वाटप केले आहे, अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही

नियम

 1. जमीन खरेदी करताना 3 लाख रुपये प्रति एकर येवढ्या कमीत कमी मर्यादे पर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हा स्तरीय समितीस देण्यात आली आहे.
 2. भूमिहीन योजनेअंतर्गत या पूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
 3. या योजनेअंतर्गत लाभ घेऊन जमीन मिळवलेल्या लाभधारकांने जमीन स्वतः कसने गरजेचे असून यास करारनामा करून देणे बंधनकारक राहील
 4. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्च पैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज तर 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते
 5. लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिन व्याजी 10 वर्ष असणार आहे.
 6. कर्जफेडीची सुरुवात कर्ज मंजुरीनंतर 2 वर्षानंतर सुरू होणार आहे, कुटुंबाने विहित मुदतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून 10 वर्षात कर्जाची परत फेड करणे आवश्यक आहे.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Bhumihin Yojana 2024 Document

कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • रेशनकार्ड
 • अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्या बाबतचा जातीचे प्रमाणपत्र असावे
 • अर्ज विहित नमुन्यात पासपोर्ट फोटो सह भरावा
 • रहिवाशी दाखला
 • भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसिलदाराचा दाखला
 • लाभार्थी दारिद्रयरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
 • मागील वर्षाचा उत्पन्नाचा तहसील कार्यालयातील दाखला
 • 60 वर्ष वया पेक्षा कमी वय असल्याचा पुरावा
 • शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा

अर्जदाराला संबधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात जावे लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा वरील सर्व कागदपत्रे जोडून अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा

Bhumihin Yojana Marathi | भूमिहीन योजना | भूमीहीन योजना 2024 | Bhumihin Yojana 2024 Marathi | bhumihin yojana maharashtra | Bhumihin Yojana | भूमीहीन योजना | भूमिहीन योजना मराठी | भूमिहीन योजना महाराष्ट्र 2024 | Bhumhin Yojana Maharashtra | Bhumhin Yojana form PDF | Dadasaheb Gaikwad sabakikaran and swabhiman Yojana | Bhumihin Yojana 2024 | भूमिहीन योजना महाराष्ट्र

Bhumihin Yojana 2024 Marathi

Overview

योजनेचे नाव Bhumihin Yojana 2023 Marathi
कोणी सुरू केली महाराष्ट्र राज्य
विभाग सामाजिक न्याय विभाग
सुरुवात 2004
लाभ 2 एकर बागायत किंवा 4 एकर कोरडवाहू शेतजमिनीसाठी
50 टक्के अनुदान व 50 टक्के बिन व्याजी कर्ज
लाभार्थी राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्र्य
रेषेखालील भूमिहीन शेतमजूर
उद्देश अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारि्र्यरेषेखालील
भूमिहीन शेतमजूराना शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करून
देऊन त्यांना रोजगाराची संधी निर्माण होईल
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
व्हॉटसप ग्रुपला जॉईन करा येथे क्लिक करा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा