Paper Bag Making Business Marathi | पेपर बॅग व्यवसाय |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण घरगुती एका खास व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत ज्याचे नाव आहे पेपर बॅग व्यवसाय (Paper Bag Making Business Marathi). तुम्हालाही जर या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख नक्की वाचा. आपण या लेखात पेपर बॅग व्यवसाय सुरू कसा करावा, त्यासाठी लागणारे भांडवल, गुंतवणूक, मशीन किमंत, नोंदणी कशी करायची आणि कुठे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत

Paper Bag Making Business Marathi – आज नोकरी बरोबरच तरुण पिढीमध्ये उद्योग, व्यवसाय करण्याचे महत्त्व दिसून येत आहे. ते त्यांच्या कौशल्याचा वापर करू इच्छित आहेत. त्यांना उद्योगाचे, व्यवसायाचे महत्व नव्याने सांगण्याची गरज आता पूर्वीसारखी राहिली नाही. तसेच ते पुढे येण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिला देखील घरबसल्या अनेक प्रकारचे व्यवसाय करून चांगली कमाई करत आहेत. कमाई बरोबरच त्या स्वतःला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवत आहेत. पेपर बॅग व्यवसाय सुरू करून महिला किंवा घरात बसून असणारे कोणीही व्यक्ती सहज 20 ते 25 हजार प्रती महिना कमावू शकतात. आज प्लास्टिक बंदी आल्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर किती वाढला आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहितच आहे. त्यामुळे या व्यवसायात तुम्हाला 12 महिने मागणी असणार आहे. आणि प्लास्टिक बंदी करून तुम्ही एक चांगले काम करत आहात म्हणून सरकारनेही या व्यवसायासाठी कर्ज देण्याची व्यवस्था देखील केली आहे.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

या व्यवसायसाठी कुठे नोंदणी करायची

 • Paper Bag Making Business करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक नगरपालिका व्यापार परवाना आणि सरकार कडून उद्योग आधार क्रमांक घेणे गरजेचे आहे.
 • MSME अंतर्गत नोंदणी करून तुम्ही शासनाकडून निधी ही मिळवू शकता.
 • या व्यवसाय करिता GST नोंदणी आणि BSI प्रमाण असणे आवश्यक आहे.
 • पेपर बॅग या व्यवसाय करिता शासनाकडून तुम्हाला कर्ज ही उपलब्ध होऊ शकते.

पेपर बॅग बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 • पांढरा, किंवा रंगीत पेपर
 • फ्लेक्सो कलर
 • पॉलिमर स्टिरीओ
 • प्रिंटिंग शाई रसायने ई.
 • पेपर शिट 40″*60″, 1800 शीट
 • पेपर रोल रंग आणि पांढरा 500 reams
 • आयलेट्स
 • पॅकेजिंग उपभोग्य
 • पॉलिस्टर स्टिरीओ
 • हँडल करिता टॅग

पेपर बॅग व्यवसाय करण्यासाठी मशीन आवश्यक आहे का ?

तर हो. पेपर बॅग बनवण्यासाठी मशीन आवश्यक आहे. तुम्ही मशीन च्या मदतीने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पेपर बॅग बनवू शकता. मशीन ची किंमत 3 लाख रुपयांपासून सुरू होते. एकाच मशीन मध्ये सर्व सुविधा असलेली मशीन घेणे सर्वात चांगले राहील. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामासाठी स्वतंत्र मशीन घेण्याची गरज भासणार नाही आणि तुमचे पैसे पण वाचतील

पेपर बॅग साठी करावी लागणारी एकूण गुंतवणुक किंवा खर्च

या व्यवसायात तुम्हाला 3 लाख ते 4 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यासोबतच तुम्हाला काही वस्तू खरेदी करण्यासाठी 50000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

मिळवा 5 लाख रूपयांचे कर्ज एका क्लिक वर

Paper Bag Making Business मधून होणारा नफा

आपण वरती पाहिले की स्वयंचलित मशीन 1 मिनटात 60 पेपर बॅग बनवू शकते.साधारणपणे 1 बॅग वरती 7 ते 10 रू नफा असल्याचे दिसते.जर आपण मार्केटिंग योग्य रीतीने केली तर तुम्ही महिन्याला 30 ते 40 हजार रुपये येवढे सहज कमावू शकता.तुम्हाला तुमच्या पेपर बॅग ह्या चांगल्या दर्जाच्या आणि आकर्षक बनवाव्या लागतील.


अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

Paper Bag Making Business Marathi

How to start a Paper Bag Making Business | Paper Bag Making Business | Paper Bag Making Business in Marathi | Paper Bag Making Business Marathi | पेपर बॅग बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा | high profit business ideas | work from home business ideas | पेपर बॅग व्यवसाय प्लॅन | पेपर बॅग व्यवसाय | business ideas | top 10 business ideas | work from home ideas |