E Shram Card Apply 2024 | ई श्रम कार्ड योजना 2024 |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण ई श्रम कार्ड (E Shram Card Apply 2024) बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. ई श्रम कार्ड बद्दलची संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा. E Shram Card Apply 2024 आपल्या देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या गरजू नागरीकांना ई श्रम कार्ड ही एक खास सुविधा सुरू केली आहे. ज्याचे अनेक फायदे असंघटीत क्षेत्रातील नागरीकांना होणार आहेत.

E Shram Card बनवल्यानंतर लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळते. जर एखादा कामगार काम करण्यास अक्षम झाल्यास त्यास 1 लाख रुपये रोख दिले जातात. व या 2 लाखांच्या विम्यासाठी 1 रुपयांचे ही प्रीमियम भरावे लागत नाही.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

ई श्रम कार्ड चे फायदे

 • ई श्रम कार्ड काढल्यानंतर कामगारांना 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3000/- रुपये पेन्शन मिळणार आहे
 • सध्या ई श्रम कार्ड धारकांना 500 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे
 • या कार्ड व्दारे असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
 • असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे.
 • काहींना घर बांधणीसाठी मोफत निधी ही दिला जातो
 • या योजनेतून कामगार विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळतो, जसे की मोफत सायकल, मोफत शिलाई मशीन, मुलांसाठी शिष्यवृत्ती, तूमच्या कामासाठी मोफत साधने इत्यादी.
 • केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा थेट लाभ ई श्रम कार्ड धारकांना मिळणार आहे.
 • लवकरच या सोबत रेशन कार्ड सुद्धा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कामगाराला देशातील कोणत्याही दुकानातून रेशन मिळू शकेल.
 • या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो

या कार्डसाठी कोण कोण अर्ज करू शकते ?

 • बांधकाम क्षेत्रातील कामगार
 • फेरीवाले
 • स्थलांतरित मजूर
 • स्थानिक रोजंदारी वर काम करणारे मजूर
 • भूमिहीन शेत मजूर
 • घर कामगार
 • तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार

आयकर भरणारे, EPFO, ESIC यांचे सदस्य असणाऱ्या व्यक्ती ई श्रम कार्डसाठी नोंदणी करू शकत नाही.

E Shram Card Apply Documents

श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड (मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे)
 • उत्पन्न दाखला
 • पत्याचा पुरावा
 • वयाचे प्रमाणपत्र
 • मोबाईल क्रमांक
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • बँक खाते क्रमांक
 • राशन कार्ड

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना साठी येथे क्लिक करा

पात्रता

 • अर्जदार हा भारताचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे
 • अर्जदाराचे कमीतकमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 60 वर्षे असणे गरजेचे आहे
 • अर्जदाराकडे आधार कार्ड असायला हवे ते आधार कार्ड संबंधीत बँक खात्याला लिंक असणे अनिवार्य आहे

ई श्रम कार्ड कसे काढावे | How to apply for e Shram card |

 • सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या
 • तिथे तुम्हाला स्व: नोंदणी करावी लागेल Resigeter on E Shram card ह्या वेबसाईट वरिल पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन होम पेज दिसेल
 • होम पेज वर मोबाईल क्रमांक टाकून कॅपचा भरून Send OTP या पर्याय वरती क्लिक करा
 • त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सांगायचं आहे. या दोन्ही पर्यायांपुढील NO या पर्यायावर क्लिक करायचं आहे
 • आता तुमच्या समोर एक अर्ज येईल ज्यात तुमची सर्व माहिती विचारतील जसे की तुमचे नाव, घराचा पत्ता, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता, नोकरी, बँक खाते इत्यादी माहिती अचूक भरा
 • ही सर्व माहिती भरून SEND OTP वरती क्लिक करा
 • आता मिळालेले OTP टाका आता तिथे तुमचे ई श्रम कार्ड दिसेल
 • अशा प्रकारे तुमची ई श्रम कार्ड नोंदणी पूर्ण होईल

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

E Shram Card Apply In Marathi | E Shram Card Apply 2024 | E Shram Card Apply Marathi | E Shram Card | E Shram Card benefits | what is e shram card | e shram card |