Majhi Kanya Bhagyshree Yojana 2024 | माझी कन्या भाग्यश्री योजना |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyshree Yojana 2024) याबाबत संपुर्ण माहिती जाणून घेऊया. सरकार अनेक योजना तर वारंवार राबवतच असते पण त्यातील बऱ्याच योजना या मुली आणि महिलांसाठीच्या आहेत हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे. मुलींना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे चांगले पालनपोषण व्हावे, त्यांच्या जीवनमानात आणि राहणीमानात सुधारणा व्हावी म्हणून शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. मुलींना समाजात मिळणारे दुय्यम स्थान कमी करणे हा मूळ हेतू माझी कन्या भाग्यश्री योजनेचा आहे.

Majhi Kanya Bhagyshree Yojana : आज आपण या लेखात माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की काय आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना साठी पात्रता काय आहे, यातून मुलींना काय फायदा मिळणार आहे, माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा, आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे

महाराष्ट्र सरकार मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक नवनविन योजना राबवत असते ज्यातून मुलींना त्यांचे शिक्षण घेता येईल, गरजेच्या वस्तू घेता येतील, आरोग्याची योग्य ती काळजी घेता येईल. जसे की सुकन्या समृध्दी योजना, लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना. Majhi Kanya Bhagyshree Yojana ही योजना 1 किंवा 2 मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटूंबातील मुलींना 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य देते.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

उद्देश

  • माझी कन्या भाग्यश्री योजना चा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या साक्षरतेत सुधारणा करणे, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे
  • मुलींच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे
  • मुलींचा जन्मदर वाढवण्यास मदत करणे
  • Majhi Kanya Bhagyshree Yojana अंतर्गत बालविवाह पूर्णपणे नष्ट करणे
  • मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी आर्थिक साहाय्य करणे
  • माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मुलींच्या जन्माचे समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे

पात्रता

  • मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे
  • लाभार्थी मुलींचा जन्म दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर झालेला असावा
  • फक्त एका मुली नंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर ती एकुलती एक मुलगी या योजनेसाठी पात्र असेल
  • जर पालकांना 2 मुलीच झाल्या असतील आणि त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर त्या 2 मुली माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत
  • पहिले अपत्य मुलगी असेल आणि दुसरे अपत्य मुलगा असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जुळ्या मुली झाल्या असतील तर त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत
  • जर पहिले अपत्य मुलगा असेल आणि दुसरे अपत्य मुलगी असेल तर ती मुलगी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही
  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे अशा कुटूंबातील मुली या योजनेसाठी पात्र आहेत
  • माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सदर कार्यालयात सादर करणे गरजेचे आहे
  • सदरील योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबवण्यात येईल तसा सरकारने बँके सोबत करार केला आहे, त्यामूळे मुलींचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते असणे बंधनकारक आहे

लाभ

  1. एका मुलीनंतर जर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर त्या मुलीच्या नावे बँकेत 50000/- रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येतील
  2. दोन मुलींनंतर जर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर त्या दोन मुलींच्या नावे माझी कन्या भाग्यश्री योजनेमार्फत मुदत ठेव म्हणुन बँकेत प्रत्येकी 25000/- रुपये गुंतवले जातील
  3. 50 हजार रकमेवर 6 वर्षानंतर होणारे फक्त व्याज मुलीच्या सहाव्या वर्षी काढता येते
  4. आणि मुद्दल 50000/- रुपये मुलीच्या वयाच्या अठराव्या वर्षी काढता येईल अशीच प्रक्रिया 2 मुलींसाठी देखील आहे

कागदपत्रे

  • पालकाचे अधिकृत राहिवासी प्रमाणपत्र
  • BPL श्रेणी रेशनकार्ड
  • मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • मुलीचे व मातेचे बँक पासबुक
  • लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
  • योजनेसाठी अर्ज करताना लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मिळकत प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे मोबाइल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा

MKBY Application Form |

  • सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या
  • तिथून माझी कन्या भाग्यश्री योजना अर्जाची PDF download करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या
  • किंवा या योजनेस आवश्यक असणारी सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, तसेच जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे पालकाचे नाव, मुलीचे नाव, मोबाइल नंबर, मुलीचे जन्म प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण तपशीलवार माहिती भरून आणि अर्जाला सर्व आवश्यक कागदपत्र जोडून, अर्ज संबधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल
  • अशा प्रकारे आपली माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Majhi Kanya Bhagyshree Yojana Overview

योजनेचे संपुर्ण नाव माझी कन्या भाग्यश्री योजना |
Majhi Kanya Bhagyshree Yojana
कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकार
विभागमहीला व बालविकास विभाग
उद्देश मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी आर्थिक साहाय्य करणे
लाभार्थीराज्यातील मुली
श्रेणी राज्य सरकारी योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Majhi Kanya Bhagyshree Yojana 2024

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2024 |Majhi Bhagyashree Kanya Yojana | शासकीय अनुदान योजना 2023 | Majhi Kanya Bhagyashree Yojana | Mazi Kanya Bhagyashree Yojana | Bhagyashree Yojana | Mazi Kanya Bhagyashree Yojana Online Form | girl yojana in maharashtra | एक मुलगी योजना | माझी कन्या भाग्यश्री | मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, फॉर्म PDF, पात्रता, योजनेचे लाभ |