Atal Pension Yojana In Marathi | अटल पेन्शन योजना: 210 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 5 हजार रु. प्रती महिना पेन्शन; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Atal Pension Yojana In Marathi अटल पेन्शन योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Atal Pension Yojana In Marathi 2024

मित्रानो, तुम्हाला माहित आहे असंघटित क्षेत्रातील कामगार त्यासोबतच मजूर यांना इतर वयात पेन्शन ची सुविधा नसते. Atal Pension Yojana In Marathi त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या दैनंदिन जीवनातुल गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. या वरील समस्या लक्षात घेता केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली आहे.

900 पेक्षा अधिक आजारांवर मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण

या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृत्तीच्या आयुष्यासाठी बचतीची सोय होईल आणि त्यांनी केलेल्या या बचत मुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. देशात किमान 88% म्हणजेच 47.29 करोड लोकसंख्या ही असंघटित क्षेत्रात काम करत आहे.

अटल पेन्शन योजने फायदे

Atal Pension Yojana In Marathi Benefits

  • भारतीय रहिवाशांसाठी सदस्यता घेणे सोपे आहे. मग ते स्वयंरोजगार असो किंवा नोकरदार वर्ग असो.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थींचा मृत्यू झाल्यास जोडीदार किंवा नोमिनीला लाभ दिला जातो.
  • सदस्यानी केलेल्या वर्गणीच्या आधारावर 1000 रू, 2000 रू, 3000 रू, 4000 रू, किंवा 5000 रू. पेंशन हमी.
  • आयकर कर सवलातीस लाभार्थी पात्र आहेत.
Atal Pension Yojana In Marathi

अटल पेन्शन योजना पात्रता

Atal Pension Yojana In Marathi Eligibility

  • या योजनेअंतर्गत 18 वर्ष ते 40 वर्ष असणारे सर्व नागरिक पात्र असतील.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक मध्ये खाते असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार हा इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभार्थी नसावा.
  • ज्या नागरिकांना निवृत्ती नंतर कोणत्याही प्रकारची पेन्शन सोय नसेल असे नागरिक या योजनेअंतर्गत पात्र असतील.

अटल पेन्शन योजना अंतर्गत खाते उघडण्याची प्रक्रिया

  • अर्ज करण्यासाठी तुमच्या स्थानिक बँकेच्या शाखेत APY नोंदणी फॉर्म भरा व तिथेच सबमिट करा.
  • त्याना तुमचे बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक द्या.
  • खाते उघडण्याच्या वेळी तुमची लिंक केलेल्या बँक खात्या मधून तुमची पहिली वर्गणी रक्कम कपात केली जाईल.
  • तुमची बँक तुमचाला पावती क्रमांक / PRAN क्रमांक जाती करेल.
  • आता त्या नंतरची वर्गणी तुमच्या बँक अकाऊंट मधून स्वयं डेबिट केली जाईल.

APY म्हणजेच अटल पेन्शन योजना फॉर्म कसा डाऊनलोड करावा?

  • अटल पेन्शन योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी फॉर्म योजनेशी जोडलेल्या बँक शाखेत सहज मिळू शकतो.
  • आपण पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपेंट अथॉरिटी PFRDA या अधिकृत वेबसाईट वरून APY फॉर्म ऑनलाईन डाऊनलोड करू शकता.

अटल पेन्शन योजना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेचे नावAtal Pension Yojana In Marathi | अटल पेन्शन योजना 2024
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
योजनेची सुरुवातजून 2015
वर्ष2024
पेन्शन लागू होण्याचा कालावधी60 वर्षनंतर
वयाची अट18 ते 40 वर्ष पर्यंत
योजना द्वारे सुरूकेंद्र सरकार
लाभार्थीभारततील नागरिक
सरकारी योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा