Savitri Bai Phule Scholarship | सावित्री बाई फुले स्कॉलरशिप योजना: 5 वी ते 10 वी च्या मुलींना मिळणार स्कॉलरशिप; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Savitri Bai Phule Scholarship सावित्री बाई फुले स्कॉलरशिप योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Savitri Bai Phule Scholarship 2024

मित्रानो, या योजनेचा उद्देश असा हे की शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी करण्यासाठी व दररोजची उपस्थिती 100 टक्के राखण्यासाठी सरकार ने Savitri Bai Phule Scholarship सावित्री बाई फुले प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना अंतर्गत शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देऊन प्रोटासित करणे असा आहे. ही योजना इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविते.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही राज्यातील अनुसूचित जाती व इतर मागास वर्गीय आणि भटक्या जमातींच्या इयत्ता पाचवी ते 10 वी च्या विद्यार्थिनींना दिली जाते. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलींना शाळेत नियमित उपस्थित असणे अनिवार्य आहे. विद्यार्थीनीची उपस्थिती किमान 75% असल्यास त्यांना 600 रुपये मिळतात व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये मिळतात.

RTE प्रवेश दिनांक झाला जाहीर, येथे क्लिक करा

Savitri Bai Phule Scholarship

शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी 1996 अन्वये मागास समाजातील विद्यार्थीनींसाठी व शासन निर्णय दिनांक 29 अक्तोंबर 1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थिनींना देखील लागू करण्यात आलेली आहे. या प्रवर्गातील विद्यार्थिनींच्या अनुउपस्थितीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रोत्साहन पर अनुदान स्वरुपी ही स्कॉलरशिप दिली जाते.

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना पात्रता

Savitri Bai Phule Scholarship Eligibility

  • विद्यार्थी ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी ही इयत्ता 5 वी ते 10 वी या वर्गात शिक्षण घेत असली पाहिजे.
  • अर्जदार विद्यार्थीची उपस्थिती ही 75% असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी ही शासन मान्य शिक्षण संस्थेत शिक्षण घेंत असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्याचे पालक शासकीय सेवते असल्यास अशांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे
Savitri Bai Phule Scholarship Documents
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवरगाचा दाखला.
  • राष्ट्रीयकृत बँकेत खाते.
  • मागील वर्षाचे गुणपत्रक
  • पालकांचा उत्पन्न दाखला.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत
Savitri Bai Phule Scholarship Application Process
  • संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कडे सदर करावेत.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटलं आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा