Vidhava Pension Yojana | इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना (Vidhava Pension Yojana) बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. आजच्या जगात पैसा किती महत्वाचा आहे हे तर आपल्या सर्वांना खुप जवळून माहिती आहे. सामान्य वर्गातील कुटुंबांना त्यांच्या काही सामान्य गरजांसाठी देखील आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात जर ती महिला असेल तर ती पूर्णपणे किंवा काही स्त्रिया अंशतः आपल्या पतीवर अवलंबून असतात. पण जर त्यांच्या पतीचे देखील काही कारणाने आकस्मित निधन झाले तर त्या एकट्या पडतात. त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशा साठी खुप आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामूळे अशा महिला वर्गाचा विचार करून इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना चालू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. Indira Gandhi Vidhava Pension Yojana यातून अनेक एकट्या पडलेल्या स्त्रियांना आर्थिक मदत च होईल आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हातभारच लागेल.

Indira Gandhi Vidhava Pension Yojana : आपण आज आपल्या लेखात इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना नक्की काय आहे, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेची वैशिष्टये, यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, यापासून मिळणारा लाभ, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना साठी अर्ज कसा करावा आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना वैशिष्टये

  • विधवा महिलांना इतर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही
  • पतीच्या अचानक झालेल्या आकस्मित मृत्यूमुळे स्त्रियांना भासणारी पैशांची चणचण थोड्या प्रमाणात कमी होईल
  • राज्यांतील विधवा महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनतील
  • महिलांना आर्थिक मदत होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि त्यांना नव्याने सुरूवात करण्यास प्रोत्साहन मिळेल
  • योजनेंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा 600 रुपये दिले जातील.
  • महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून एखाद्या विधवा महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्यांना या योजनेंतर्गत दरमहा 900 रुपयांची आर्थिक रक्कम दिली जाईल.

पात्रता

Indira Gandhi Pension Yojana Form

  • अर्जदार विधवा महिलांचे कमीत कमी वय 40 वर्षे असावे आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे असावे
  • 65 वर्षांवरील महिलांना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना चा लाभ घेता येणार नाही
  • अर्जदार विधवा महिला आर्थिक दृष्ट्या गरीब किंवा दारिद्य्र रेषेखालील असाव्यात.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे.

Indira Gandhi Vidhava Pension Yojana Eligibility

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • दारिद्रय रेषेखालील रेशन कार्ड
  • जन्म दाखला किंवा वयाचा दाखला
  • चालू मोबाईल क्रमांक
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पतीच्या मृत्यूचा दाखला (ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांच्याकडील मृत्युचा दाखला)
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ईमेल

अर्ज कसा करावा

  • अर्जदार महिला जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
  • संपर्क कार्यालयाचे नाव-जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance
  • सर्वप्रथम लाभार्थी महिलेला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल.
  • होम पेज ओपन झाल्यावर तुम्हाला Form हा पर्याय येईल.
  • क्लिक केल्यानंतर, तुम्हाला फॉर्मची यादी दिसेल.
  • यादीमध्ये तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा पर्याय निवडावा लागेल.
  • निवड केल्यानंतर, फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल. फॉर्म उघडल्यानंतर, आता तुम्ही येथून सहजपणे अर्जाची PDF डाउनलोड करू शकता.
  • येथे pdf download करू शकता
  • फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की अर्जदाराचे नाव, पत्त्याशी संबंधित माहिती इ. भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला अर्जा सोबत विचारलेल्या कागदपत्रांचे झेरॉक्स जोडावी लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा पेन्शन योजनेचा अर्ज तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया या योजनेंतर्गत पूर्ण होईल आणि तुम्हाला विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळेल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विधवा पेन्शन योजना नक्की काय आहे

लेख वाचून आपण बघितलं आहेच की ज्या कुटुंबातील महिला विधवा आहेत आणि घर चालवण्यासाठी कोणाचाही आधार नाही, अशा परिस्थितीत घर सांभाळणे अत्यंत कठीण होऊन बसते, त्यामुळेच महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. Indira Gandhi Vidhava Pension Yojana चा लाभ महिलांना त्यांची मुले 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत देण्यात येणार असून ज्या महिलांना मुली आहेत त्यांचे संगोपन व लग्नानंतरही या योजनेचा लाभ विधवा महिलांना दिला जाणार आहे. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेंतर्गत दिलेली रक्कम थेट महिलांच्या खात्यात वर्ग केली जाईल.

लाभ

  • महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ राज्यातील आर्थिकदृष्ट्या निराधार आणि असहाय्य असलेल्या विधवा महिलांना देण्यात येणार आहे
  • योजनेंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा 600 रुपये दिले जातील.
  • सर्व विधवा महिला कोणत्याही आर्थिक समस्येशिवाय आपले जीवन सहज व्यतीत करू शकतील.
  • त्यांना त्यांच्या जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहावे लागणार नाही.
  • सरकारने दिलेली पेन्शनची आर्थिक रक्कम लाभार्थी महिलेच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल.
  • महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून एखाद्या विधवा महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्यांना या योजनेतून दरमहा 900 रुपयांची आर्थिक रक्कम दिली जाईल.

Vidhava Pension Yojana Overview :

योजनेचे नावइंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना
कोणी सुरू केली भारत सरकार
योजनेची सुरुवात 9 नोव्हेंबर 2007
विभागसमाज कल्याण विभाग
श्रेणी पेन्शन योजना
लाभदरमहा 600/- रुपये
उद्देश विधवा महिलांना दरमहा आर्थिक मदत करणे आणि सक्षम बनवणे
अधिकृत वेबसाईट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/

विधवा पेन्शन योजना | indira Gandhi Vidhava Pension Yojana | Vidhava Pension Yojana | Vidhava Pension Yojana official website | इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना| vidhava pension yojana form |

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा