Krushi Drone Yojana | किसान ड्रोन योजना |

किसान ड्रोन सबसिडी योजना

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण शेतीच्या उपयोगी असणारी कृषी ड्रोन योजना (Krushi Drone Yojana) काय आहे याबाबत सर्व माहिती घेणार आहोत. आजकाल तुम्ही पारंपरिक पद्धतीच्या शेतीचा आधुनिकतेकडे जाणारा वाढता कल बघतच आहात. आणि ही गोष्ट आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि कृषिप्रधान देशासाठी खूप आंनददायी आणि फायदेशीर आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे शेतीतील अवघड पद्धतीची कामे आता सोप्या पद्धतीने करणे शक्य झाले आहे. अशा तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा शेतीचा विकास करावा म्हणुन सरकार कृषी ड्रोन सारख्या योजना राबवत आहे.

Krushi Drone Yojana : शेती शेतकरी बांधव या दोन्हींचा विकास व्हावा म्हणुन सरकारने सुरु केलेली कृषी ड्रोन योजना (Krushi Drone) नक्की काय आहे, कृषी ड्रोन योजनेची ठळक वैशिष्ट्ये/उद्दिष्ट्ये, आवश्यक पात्रता, नियम, Krushi Drone Yojana पासून मिळणारे लाभ, तसेच अर्ज कसा आणि कुठे करायचा, आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

कृषी ड्रोन योजना नक्की काय आहे

कृषी क्षेत्रामध्ये किड आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी किंवा ते नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी मोठया प्रमाणावर किटकनाशकांची फवारणी करतात. परंतु फवारणी करत असताना योग्य काळजी न घेतली गेल्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना यातून विषबाधा होण्याची शक्यता असते, आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात, काहीवेळेस तर त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागतो. त्यामूळे शेतकरी बांधवांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने कृषी ड्रोन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. योजने अंतर्गत शेतकरी बंधूंना ड्रोन खर्चाच्या 50 टक्के अनुदान मिळते.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी ड्रोन योजना वैशिष्टये

Krushi Drone Yojana

  • ड्रोन (drone) मध्ये पाहिलं तर मल्टी स्पेक्टर आणि फोटो कॅमेरे (camera)असे बऱ्याच सुविधा आहेत.
  • काही मिनिटांमध्ये हे यंत्र एकरभर पिकांवरती औषध फवारणी करू शकते.
  • रोपांची वाढ (growth of plant ), पिक निरीक्षण( observation of field), त्याचबरोबर कीटकनाशके, बुरशीनाशके, खते आणि पाणी ( water) शिंपडणे असा या ड्रोनचा शेतीमध्ये अनेक गोष्टींमध्ये वापर करता येतो.या ड्रोन मुळे शेतक शेतकऱ्यांना अजूनच सोप्या पद्धतीने शेती करता येईल.
  • एका जागेवर उभे राहून एक किलोमीटर अंतरावर ती फवारणी करता येते.
  • ड्रोन द्वारे फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याला काम करण सोपं जातं.
  • पिकांवर फवारणी केलं जाणार औषध कीटकनाशक याची बचत होते.
  • जुने यंत्र घेऊन काम करताना शेतकऱ्यांना विषबाधा होत असे मात्र ड्रोन द्वारे हा धोका टाळता येतो.
  • जुने यंत्राच्या तुलनेत यामध्ये वेळ कमी लागतो.

लाभ

यांना मिळेल 100% सबसिडी(रु. 10 लाखांपर्यंत)

  • भारतीय कृषी संशोधन परिषद
  • कृषी विज्ञान केंद्रे
  • राज्य कृषी विद्यापीठे
  • राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी संस्था
  • विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम

यांना मिळेल 50% सबसिडी (5 लाखांपर्यंत)

  • कृषी सानुकूल भरती केंद्र बनवणारे पदवीधर
  • शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टोळी
  • महिला आणि पूर्वोत्तर राज्य शेतकरी

यांना मिळेल 40% सबसिडी (रु. 4 लाखांपर्यंत)

  • शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेच्या अंतर्गत कस्टम हायरिंग सेंटरए
  • फपीओ आणि ग्रामीण उद्योजक
  • महिला आणि ईशान्येकडील राज्य शेतकरी वगळता इतर शेतकरी

कृषी ड्रोन योजनेचे फायदे

  • कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.
  • इयत्ता १०वी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही व्यक्तीला ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
  • कीटनाशक फवारणी करताना शेतकऱ्याना विषबाधेचा होणारा धोका टळणार आहे.
  • ड्रोन योजनेअंतर्गत कृषी पदवीधरांना ५ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि सहज शेती विषयक विविध कामे केली जाऊ शकतील.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
  • ड्रोन मुळे फवारणीची कामे जलद गतीने करता येतील.

Krushi Drone Subsidy Yojana

कृषी ड्रोन योजना अर्ज कसा करावा

  • सर्वात आधी कृषी विभाग ला भेट देऊन तिथे कृषी ड्रोन योजनेचा अर्ज/ फॉर्म घ्या
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा आणि सोबत सांगितलेले सर्व कागदपत्रे जोडा
  • आणि अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा
  • अशा प्रकारे तुम्हाला कृषी ड्रोन योजनेसाठी अर्ज करता येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड/ओळखीचा पुरावा
  • राशन कार्ड
  • पूर्व संमतीपत्र
  • स्वयं घोषणापत्र
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची प्रत / रद्द केलेला धनादेश
  • खरेदी करावयाच्या ड्रोन चे कोटेशन/विक्रेत्याची संपूर्ण माहिती
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • कृषी पदवी
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • अधिकृत रिमोट पायलट ट्रैनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील
  • संस्थेशी संबंधीत व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधीकृत केले असल्यास प्राधीकृत केल्याचे पत्र.
  • अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशिल

कृषी ड्रोन योजना माहिती pdf

Krushi Drone Yojana Overview :

योजनेचे नावकृषी ड्रोन योजना / Krushi Drone Subsidy Yojana /
ड्रोन सबसिडी योजना
कोणी सुरू केली केंद्र शासन
योजनेची सुरुवात2022
विभागकृषी विभाग
लाभार्थीदेशातील शेतकरी
लाभ 100, 50, आणि 40 टक्के पर्यंत अनुदान
उद्देशशेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या
विकासासाठी अनुदान देऊन आर्थिक साहाय्य करणे
श्रेणी केंद्र सरकारी योजना
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
Krushi Drone Yojana

कृषी ड्रोन योजना | Krushi Drone Subsidy Yojana | कृषी ड्रोन योजना अनुदान | Drone Subsidy Yojana |कृषी ड्रोन सबसिडी योजना | ड्रोन योजना | Drone Yojana | कृषी ड्रोन योजना सबसिडी | Krushi Drone Subsidy |

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा