Udyogini Yojana Scheme | महिला उद्योजिनी योजना |

महिलाना उद्योगासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज

हाय हेलो नमस्कार मित्रानो, आज आपण आपल्या ध्येयपुरती या मराठी वेबसाइट वर Udyogini Yojana Scheme या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. तरी महिला उद्योजिनी योजनेची सर्व माहिती घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा. यामधे आपण महिला उद्योजिनी योजना साठी मिळणारे फायदे, योजनेची वैशिष्ट्ये/ उद्दिष्ट्ये, योजनेचा कोण लाभ घेऊ शकते, योजनेत किती कर्ज मिळेल त्यावर व्याज असेल का ? , यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अटी व शर्ती याबदल ची संपूर्ण माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत

Udyogini Yojana Scheme – भारत सरकारच्या महिला विकास विभागाकडून सुरू कण्यात आलेली महिला उद्योजिनी योजना ही महिलांच्या विकासासाठी आणि त्याना आत्मनिर्भर बनवण्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे. या योजनेतून महिलाना सुलभ आणि अगदी माफक दरात कर्ज उपलब्ध करून देऊन महिलांचे आर्थिक स्थिरिकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिला पुरुषाच्या जोडीने काम करत आहेत असे जरी आपण म्हणत असलो तरी आर्थिक स्थितीमुळे त्या अजूनही खूप मागे पडत आहेत. त्यांना नवनवीन उद्योग करण्याची इच्छा असूनही त्या आर्थिक स्थितीमुळे मागे पडत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक मदत करून त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी Udyogini Yojana Scheme ही योजना महिला विकास विभागाने सुरू केली आहे.

आत्तापर्यंत 48000 महिलानी या योजनेचा लाभ घेतला असून त्या लघु उद्योजक म्हणून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. त्यांनी आता त्यांच्या उत्पन्नाचे साधन बळकट केले आहे फक्त महिला उद्योजिनी योजनेतुन (Udyogini Yojana Scheme)

महिला उद्योजिनी योजना नक्की काय आहे ?

हे एक भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली महिलांसाठीची खास आणि फायदेशीर योजना आहे ज्यातून महिलाना 3 लाखा पर्यंत उद्योगासाठी कमी व्याजाने किंवा बिनव्याजी कर्ज मिळवून देणार आहे. ज्यातून महिलाना आर्थिक सहाय्य मिळून उद्योग करण्यास चालना मिळणार आहे. नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

महिला उद्योजिनी योजनेसाठी पात्रता काय आहे ?

योजनेस कोणते व्यक्ती पात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण खाली बघुया

  1. लाभार्थी भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे
  2. या योजनेसाठी महिलांचे वय 18 ते 55 वर्षे असणे गरजेचे आहे
  3. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा क्रेडिट स्कोर मजबूत असायला हवे
  4. Udyogini Yojana Scheme या योजनेचा लाभ फक्त महिला वर्गासाठी आहे
  5. अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे
  6. दिव्यांग महिला, विधवा महिलांसाठी उत्पनांची अट नाही

अर्ज कसा करावा (Udyogini Yojana Scheme)

महिला उद्योजिनी योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल

  • ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत :
  1. अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळच्या बँकेत जाऊन संपर्क साधावा लागेल
  2. बजाज फायनॅन्स सारख्या खाजगी वित्तीय संस्था देखील Udyogini Yojana Scheme या योजनेसाठी कर्ज देतात
  3. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून, सर्व आवश्यक कागदपत्रे त्याला जोडवित आणि सादर फॉर्म बँकेत जमा करावा
  4. अश्या प्रकारे ऑफलाईन अर्ज करता येईल
  5. काही दिवसातच तुमचे कर्ज मंजूर होईल
  6. अधिक तपशीलसाठी महिला खालील ठिकाणी संपर्क साधू शकतात
  • उद्योगिनी D-17 तळघर, साकेत, नवी दिल्ही -110017, फोन नंबर: 011-45781125 ईमेल:mail@udyogini.org

वाट कसली बघताय मग आजच करा अर्ज !!

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • रेशन कार्ड (दारिद्र्य रेषे खालील किंवा BPL)
  • बँकेचे पासबुक
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • पत्याचा पुरावा

महिला उद्योजिनी योजना वैशिष्ट्ये/उदिष्ट्ये :

  • महिलाना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी वित्तीय मदत करते
  • महिलाना उद्योजक व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभ राहायला मदत करणे
  • महिला स्वत: व इतर महिलाना देखील रोजगरची संधी मिळवून देतील
  • त्यांचे जीवनमान सुधारेल
  • त्या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनतील
  • महिलाना जगण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही
  • अश्याप्रकारे महिलाना Udyogini Yojana Scheme या योजेनेतून फायदाच होईल

अटी व शर्ती :

  1. लाभार्थी भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे
  2. Udyogini Yojana Scheme या योजनेचा लाभ फक्त महिला वर्गासाठी आहे
  3. अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे
  4. दिव्यांग महिला, विधवा महिलांसाठी उत्पनांची अट नाही
  5. या योजनेसाठी महिलांचे वय 18 ते 55 वर्षे असणे गरजेचे आहे
  6. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा क्रेडिट स्कोर मजबूत असायला हवे

महिला उद्योजिनी योजने अंतर्गत किती अनुदान मिळते

  • या योजनेअंतर्गत लाभार्थीना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते
  • कृषि क्षेत्रातील महिलाना बींवयाजी कर्ज दिले जाते
  • या योजनेतुन 88 लघु उद्योगाना कर्जाचा लाभ दिला जातो
  • सोबतच महिलाना उद्योग करण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते
  • भविष्यात महिलाना दिलेल्या कर्जावर 30 टक्के सबसिडी देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे

Udyogini Yojana Scheme Overview:

योजेनचे संपूर्ण नाव महिला उद्योजिनी योजना (Udyogini Yojana Scheme)
राज्य महाराष्ट्र
विभाग महिला विकास विभाग, भारत सरकार
लाभार्थी महिला उद्योजिका
लाभ 3 लाख रुपये पर्यंत
उत्पन्नाची अट 1.5 लाख रुपये
श्रेणी केंद्र सरकारी योजना 2023
उद्देश देशातील महिलाना वित्तीय मदत करून त्यांना उद्योजक बनवण्यास प्रोत्साहित करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
ईमेल mail@udyogini.org
फोन नंबर 011-45781125

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जेल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइट ला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज