Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम इन मराठी

पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवून मिळवा महिन्याला व्याज

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्या साठी पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) योजनेची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि मासिक पागरासारखे व्याज घेण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा. या लेखात आपण पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम नक्की काय आहे, याचे काय फायदे आहेत, व्याजदर काय मिळेल, पात्रता, अटी नियम आणि अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे अश्या तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेणार आहे.

Post Office Monthly Income Scheme – भारत सरकार लोकांनी दैनंदिन जीवनातून आणि वाढत्या महागाईतून थोडीफार पैशाची बचत करावी म्हणून नवनवीन योजना राबवत असते. अश्याच हेतूने सरकारने पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम सारखी भन्नाट योजना सुरू केली आहे. आत्तापर्यंत पोस्ट ऑफीस क्या अनेक योजना होत्या किंवा आहेत ज्यातून ठराविक काळ गेल्यानंतर म्हणजेच 1/2/3/.. किंवा 5 वर्षे झाल्यानंतर तुम्हाला व्याजासहित रक्कम मागे मिळते. पण पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही एक वेगळी योजना आहे कारण त्यातून तुम्हाला महिन्याला व्याज मिळणार आहे. आणि हेच या योजनेचे विशेष वैशिष्टय आहे, असे म्हणायला हरकत नाही.

POMIS Interest Rate | पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम संपूर्ण माहिती मराठी | POMIS | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना |

Post Office Monthly Income Scheme

POMIS किंवा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम नक्की काय आहे ?

वर सांगितल्याप्रमाणे ही योजना जास्त दिवसाने व्याज देणारी नसून मासिक/महिन्याला व्याज देणारी योजना आहे. ही एक गुंतवणूक योजना असून गुंतवणूकदारांना वार्षिक 7.4 टक्के दराने परताव्याची हमी मिळते. आणि तुमचे हे व्याज महिन्याला दिले जाते. जसा आपला महिन्याला, आठवड्याला किंवा दिवसाला पगार होतो त्याप्रमाणे तुम्हाला हा व्याजाचा एक मासिक पगार च चालू करता

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत

  • एका वेळी गुंतवणूकदार अनेक खाती उघडू शकतात
  • मुदत संपल्यावर तीच रक्कम आपण पुन्हा गुंतवू शकतो
  • POMIS परिपक्वता म्हणजेच योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे , पाच वर्षांनी तुम्हाला तुम्ही गुंतवले ली रक्कम मिळेल किंवा तीच रक्कम तूम्ही पुन्हा नव्याने गुंतवू शकता
  • MIS योजनेतून तुमचा 5 वर्षाचा महिन्याचा पगार निश्चित होतो
  • Post Office Monthly Income Scheme ही योजना आपण विनामुल्य एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये ट्रान्स्फर करू शकतो

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना फायदे/ लाभ

  • तुम्हाला तुमच्याच गुंतवणुकीतून एक स्थिर मासिक उत्पन्न मिळेल
  • कमीत कमी गुंतवणूक रक्कम 1000 आहे आणि त्यामुळे तुम्ही अगदी कमी गुंतवणूकी पासून देखील सुरुवात करू शकता
  • गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर रक्कम वारसाला मिळेल
  • मिळालेले मासिक व्याज तुम्ही इक्विटी फंड, शेअर मार्केट सारख्या उच्च नफा उत्पादक योजनेत गुंतवू शकता पण हे गुंतवणूकीचे मार्ग धोकादायक आहेत याची काळजी घ्या आणि त्यामुळेच ते व्याज तुम्ही पोस्टाच्या च थोडे कमी व्याज पण सुरक्षित योजनेत गुंतवा आणि व्याजातून व्याज मिळवा

योजना सुरू करण्यासाठी पात्रता

जे गुंतवणूकदार निश्चित मासिक उत्पन्न शोधत आहेत, किंवा ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करायची आहे अश्या लोकांनी पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) सारख्या योजनेत गुंतवणूक करायला हवी, शिवाय यासाठी काही ठराविक पात्रता आहेत त्या खालील प्रमाणे

  • गुंतवणूक करणारा व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे व्यक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत
  • 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे खाते पालक उघडू शकतात
  • जास्तीत जास्त 3 व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात

जास्तीतजास्त किती रक्कम गुंतवता येते

व्यक्तींच्या खात्यांच्या बाबतीत मर्यादा नसल्या तरी सर्व POMIS खात्यामध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेवर मात्र मर्यादा आहेत . एकमेव ऑपरेटर खात्यासाठी (single MIS) जास्तीत जास्त 9लाख रुपये ची अनुमती आहे. संयुक्त ऑपरेटर (Joint MIS) खात्यासाठी जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवण्याची अनुमती आहे

नोव्हेंबर 2023 च्या व्याजदर दुसार मी तुम्हाला काही उदाहरणे सांगते.

जर तुम्ही 2 लाख गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षासाठी महिन्याला 1233/- रूपये इतकी रक्कम मिळते, जर तुम्ही 5 लाख रुपये ठेवले तर तुम्हाला 3083/- रुपये इतके मासिक उत्पन्न 5 वर्षासाठी प्राप्त होते.

खाते कधी बंद/ परिपक्व/ Mature होते

  • खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्ष पूर्ण झाले की संबंधित पोस्ट ऑफीस मध्ये खाते बंद करण्याचा फॉर्म पासबुक सहित जमा करावा म्हणजे खाते बंद होईल आणि तुमची गुंतवलेली रक्कम मिळेल
  • ज्या महिन्यात परतावा केला जाईल त्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज दिले जाईल

POMIS खात्यासाठी अर्ज कसा करावा

POMIS खाते कसे उघडायचे याची माहिती खाली दिली आहे

  • सर्वात आधी पोस्ट ऑफिस ची बचत खाते (Saving Account) उघडा
  • संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये POMIS चा अर्ज घ्या
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती बिनचूक आणि काळजीपूर्वक भरा
  • डाउन पेमेंट रोखीने किंवा चेकने भरा
  • सांगितलेली सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा
  • अर्ज आणि पैसे संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा
  • अशा रीतीने अगदी सहज तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) साठी खाते उघडू शकता

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

MIS खाते उघडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

  • POMIS अर्ज
  • ओळखीचा पुरावा-(आधार कार्ड/मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट )
  • पत्त्याचा पुरावा- (पॅन कार्ड/पासपोर्ट/नविनतम यूटिलिटि बिले
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

MIS योजनेचे तोटे

  • जर मासिक व्याज काढले नाहीत तर ते निष्क्रिय बसतात आणि कोणतेही व्याज मिळत नाही
  • पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम वर कोणतेही टीडीएस लागू हॉट नाही परंतु व्याजाचे उत्पन्न करपात्र आहे
  • पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना कलम 80 क अंतर्गत कोणतीही कर सवलत देत नाही

Overview

योजेनचे संपूर्ण नाव पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम योजना
कोणी सुरू केली भारतीय पोस्ट ऑफिस
विभाग पोस्ट ऑफिस
लाभार्थी भारतीय नागरिक
लाभ उच्च व्याजदर (7.4 टक्के)
श्रेणी पोस्ट ऑफिस योजना
उद्देश लोकाना स्थिर मासिक उत्पन्न मिळवून देणे आणि पैशाची बचत करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट http://indiapost.gov.in/

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज