Solar Rooftop Yojana 2023 l सोलार रुफटॉप सबसिडी योजना |

एकदाच खर्च करा आणि 25 वर्षे मोफत वीज मिळवा !!

हाय हेलो नमस्कार मित्रानो, आज आपण ध्येयपूर्ती या मराठी वेबसाइट वर Solar Rooftop Yojana 2023 बद्दल सर्व सविस्तर माहिती दिली आहे. केंद्र सरकार सोलार रुफटॉप सबसिडी योजना सुरू करून एक विशेष उपक्रम राबवत आहे. प्रत्येकालाच अस वाटत असत की आपल विजेच बिल कमी याव, आणि आता आपली हीच इच्छा पूर्ण होणार आहे कारण सोलार रुफटॉप सबसिडी योजना 2023 आता आपल्याला देत आहे मोफत वीज वापरण्याची संधी !

मित्रानो आपण या लेखात Solar Rooftop Yojana 2023 या योजने बद्दल ची सर्व माहिती जसे की योजना साठी मिळणारे अनुदान, योजनेची वैशिष्ट्ये/ उद्दिष्ट्ये, योजनेचा कोण लाभ घेऊ शकते, योजनेत किती अनुदान मिळेल , यासाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची पद्धत तसेच अटी व शर्ती याबदल ची संपूर्ण माहिती आपण सविस्तर दिली आहे

सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक स्थिती मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पण अशा योजनाचा लाभ घेऊन तुम्ही तुमचं खर्च कमी किंवा किमान नियंत्रणात आणू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला सुरवातीला थोडा खर्च करावा लागेल आणि हा खर्च एकदाच करावा लागेल . आता तुम्ही पावसाळ्यात असलेल्या कमी सौरऊर्जेच्या चिंतेत असाल तर आता तुमची ती चिंता पण मिटली आहे कारण आज बहुतेक सोलार सिस्टिम बॅटरी बॅकअप वापरतात ज्यामुळे सिस्टिम चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन दिवसापेक्षा जास्तीची ऊर्जा स्टोरेज किंवा साठवून ठेवता येते.

Solar Rooftop Subsidy Yojana 2023

Solar Rooftop Yojana 2023

काय आहे सोलार रुफटॉप सबसिडी योजना ?

What Is Solar Rooftop Yojana 2023

ही एक अशी योजना आहे ज्याच्या माध्यमातून आपण निवासी कल्याणकारी संस्था, गृहनिर्माण संस्था तसेश घरगुती आणि सोसायत्या यांच्या छतावर सोलार ऊर्जेच्या मदतीने वीज निर्मिती करणारी सिस्टिम बसवून शासन किंवा सरकारकडून 40 टक्के पर्यंत सबसिडी किंवा अनुदानाचा देशातील सर्व नागरिकांना लाभ मिळेल.

सोलार रुफटॉप सबसिडी योजने साठी पात्रता काय आहे ?

सोलार रुफटॉप योजनेस कोणते व्यक्ती पात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण खाली बघुया

  1. भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो
  2. फक्त तो नागरिक संबंधित राज्याचा 15 वर्षे रहिवाशी असणे अनिवार्य आहे

अर्ज कसा करावा (Solar Rooftop Yojana 2023)

सोलार रुफटॉप सबसिडी योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल

  • ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :
  1. अर्जदाराला प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच तुम्हाला http://solarrooftop.gov.in या साइट वर जावे लागेल
  2. प्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागेल, राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा
  3. जिथे सोलार रुफटॉप बसवायचे आहे त्या पत्त्याच्या वीज बिल ग्राहक खाते क्रमांक निवडा
  4. त्यानंतर मोबाइल वर SANDESH APP QR कोड नावाचे अप डाउनलोड करा
  5. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून OTP येईल तो टाकून नोंदणी करा
  6. आता लॉग इन वर क्लिक करून ग्राहक खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा
  7. लॉगिन झाल्यावर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा
  8. तिथे तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करा
  9. आणि फॉर्म सबमिट करा , अश्या प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येईल

वाट कसली बघताय मग आजच करा अर्ज !!

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • लाभार्थीचा मोबाइल क्रमांक
  • अर्जदाराच्या घरचे मालकी हक्क कागदपत्रे
  • चालू/वर्तमान विजेचे बिल
  • अर्जदारच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • स्वयंघोषणा पत्र
  • बँके चे पासबुक
  • पासपोर्ट साईझ फोटो

सोलार रुफटॉप सबसिडी योजना वैशिष्ट्ये/उदिष्ट्ये :

  • सौर ऊर्जा हा उर्जेचा अक्षय स्त्रोत आहे आणि तो पर्यावरणाशी अत्यंत फायदेशीर आहे म्हणजेच टी ईको फ्रेंडली आहे
  • आपल्या सभोवतालचा परिसर निरोगी आणि सुरक्षित राहील
  • या यंत्रणेद्वारे कोणतेही वायु प्रदूषक किंवा हानिकारक उत्सर्जक उत्सर्जित होत नाहीत
  • आपल्या घरगुती वीज बिलाची मोठी बचत होईल
  • बॅटरी बॅकअप मुळे सिस्टिम चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन दिवसापेक्षा जास्तीची ऊर्जा स्टोरेज किंवा साठवून ठेवता येते.
  • सौर ऊर्जा प्रकल्प कुठेही बसवता येतो
  • सौर उर्जेचा वापर केल्याने नैसर्गिक सांसाधाने कमी होत नाहीत ज्यामुळे भविष्यासाठी एक शास्वत उपाय आहे
  • पारंपरिक ऊर्जा स्त्रोतच्या तुलनेत कमी खर्च येतो

अटी व शर्ती :

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापासूनचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे

सोलार रुफटॉप सबसिडी योजने अंतर्गत किती सबसिडी/अनुदान मिळते

  • घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलो वॅट वीज निर्मितीसाठी साठी 40 टक्के अनुदान देण्यात येते
  • तसेच घरगुती ग्राहकांसाठीच 3 किलो वॅट आणि त्यापेक्षा जास्त 10 किलो वॅट पर्यंत विद्युत निर्मितीसाठी साठी 20 टक्के अनुदान देण्यात येते
  • सामुदायिक लाभार्थी साठी 500 किलो वॅट वीजनिर्मिती साथी 20 टक्के अनुदान मिळेल
  • गृहनिर्माण संस्था किंवा निवासी कल्याणकारी संस्था यामध्ये राहणाऱ्या लाभार्थीना त्यांच्या प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विजेसाठी शासन 20 टक्के अनुदान देणार आहे

थोडक्यात गणित बघा !

  • जर एका किलोवॅट विजेसाठी जर आपल्याला 41,400 रुपये खर्च येत असेल तर 3 किलोवॅट साथी लागणारा खर्च
  • 3 X 41400 = 124200 रुपये
  • आणि यावर आपल्याला 40 टक्के सब्सिडि मिळेल म्हणजेच 124200 चे 40 टक्के ==49680 रुपये मिळतील
  • आपल्याला फक्त 124200-49680==74520/- रुपये खर्च येईल

Solar Rooftop Subsidy Yojana 2023 Overview

योजेनचे संपूर्ण नाव सोलार रुफटॉप सबसिडी योजना (Solar Rooftop Yojana 2023)
सुरू करणारे सरकार केंद्र सरकार
विभाग नवीन आणि नविणीकरण ऊर्जा मंत्रालय
लाभार्थी संपूर्ण देशातील नागरिक
लाभ सोलार रुफटॉप यंत्रणेसाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य
श्रेणी सबसिडी योजना 2023
उद्देश पारंपरिक विजेचा वापर कमी करून अक्षय सौर उर्जेचा वापर जास्तीतजास्त वाढवणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन किंवा ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट http://solarrooftop.gov.in

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जेल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइट ला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज