Tractor Subsidy Yojana 2023 | Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर सबसिडी योजना 2023 | ट्रॅक्टर अनुदान योजना |

नविन ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार 50% सबसिडी

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या धेयपूर्ती या मराठी वेबसाईट वरती ट्रॅक्टर सबसिडी योजना म्हणजेच ट्रॅक्टर अनुदान योजने बद्दल (Tractor Subsidy Yojana 2023) संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी या सबसिडी ची सर्व माहिती घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा. यामधे आपण ट्रॅक्टर सबसिडी योजना साठी मिळणारे अनुदान, योजनेची वैशिष्ट्ये/ उद्दिष्ट्ये, योजनेचा कोण लाभ घेऊ शकते, योजनेत किती अनुदान मिळेल , यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अटी व शर्ती याबदल ची संपूर्ण माहिती आपण सविस्तर दिली आहे

Tractor Subsidy Yojana 2023/ Tractor Anudan Yojana – भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या कल्याण आणि विकासा साठी विविध प्रकारच्या योजनांची सुरुवात केली आहे. देशातील शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी बराच शेतकरी वर्ग हा पारंपरिक पद्धतीच्या शेतीमुळे अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन शेती ची वाटचाल आधुनिकतेकडे करण्यासाठी सरकारने ही महत्वूर्ण योजना अमलात आणण्याचे धोरण आखले आहे.

काय आहे ट्रॅक्टर अनुदान योजना ?

ही एक भारत सरकारची ट्रॅक्टर सबसिडी योजना आहे ज्यातून ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्याची इच्छा आहे ते ट्रॅक्टर सबसिडी योजनेचा वापर करून आपले 20 ते 50 % पर्यंत पैसे वाचवू शकतात.

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता काय आहे ?

ट्रॅक्टर सबसिडी योजनेस कोणते व्यक्ती पात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण खाली बघुया

 1. शेतकऱ्याच्या जवळ असलेली जमीन शेती करण्यायोग्य असणे बंधनकारक आहे
 2. शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे
 3. शेतकऱ्याजवळ आधी ट्रॅक्टर नसावा
 4. एका शेतकऱ्याला एकच ट्रॅक्टर खरेदी वर सबसिडी मिळेल
 5. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
 6. बँक खाते आधार कार्ड आणि पॅन कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे

अर्ज कसा करावा (Tractor Anudan Yojana/Tractor subsidy Yojana 2023)

अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येईल

 • ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :
 1. अर्जदाराला प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर (http://mahadbt.maharashtra.gov.in/)जावे लागेल
 2. नविन अर्ज नोंदणी वर क्लिक करा
 3. त्यामधे तुमची सर्व माहिती जसे की नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, पासवर्ड टाकून तुमचे रजिस्टर करा
 4. आता लॉग इन वर क्लिक करून पासवर्ड टाकून लॉगिन करा
 5. लॉगिन झाल्यावर My Scheme या ऑप्शन वर जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजना 2022-23 पर्यायावर क्लिक करून Apply बटन वर करा
 6. तिथे तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करा
 7. आणि फॉर्म सबमिट करा , अश्या प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येईल
 • ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत :
 1. अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या गावाच्या प्रमुख जिल्हा कार्यालयाला जावे लागेल
 2. तेथील कृषि अधिकारी यांच्याकडून ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घेणे
 3. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून, सर्व कागदपत्रे त्याला जोडवित आणि सादर फॉर्म अधिकाऱ्यांकडे जमा करावा
 4. अश्या प्रकारे ऑफलाईन अर्ज करता येईल

वाट कसली बघताय मग आजच करा अर्ज !!

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • अनुसूचित जातीचा असल्यास जात प्रमाणपत्र
 • 7/12 उतारा 8अ दाखला
 • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 • स्वयंघोषणा पत्र
 • राष्ट्रीयीकृत बँके चे पासबुक
 • पासपोर्ट साईझ फोटो

ट्रॅक्टर अनुदान योजना वैशिष्ट्ये/उदिष्ट्ये :

 • पारंपरिक शेती कडून आधुनिक शेतीकडे वाटचाल करणे
 • शेतकऱ्याना कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करणे
 • शेतीचा विकास करणे
 • शेतीला उपयुक्त अवजारे कमी पैशात शेतकऱ्याना उपलब्ध करून देणे
 • शेतकऱ्याना जास्तीत जास्त आत्मनिर्भर आणि सशक्त बनवणे

अटी व शर्ती :

 1. शेतकरी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
 2. त्याला 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
 3. जर शेतकरी अनुसूचित जातीचा असल्यास जातीचे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
 4. एक शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टर चा लाभ घेता येईल
 5. या योजनेचा लाभ फक्त एकाच औजारासाठी घेता येईल
 6. जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने औजारसाठी लाभ घेतला असेल टर त्याला त्या ओजारासाठी परत कमीतकमी 10 वर्षे लाभ घेत येणार नाही
 7. एका शेतकऱ्याने जर या आधी कोणत्या कृषि योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेत येणार नाही
 8. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वत: च्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे
 9. शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांना लिंक असणे आवश्यक आहे
 10. राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असणे अनिवार्य आहे
 11. शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे
 12. ज्या शेतकऱ्याना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे आधी ट्रॅक्टर नसावा

ट्रॅक्टर अनुदान योजने अंतर्गत किती अनुदान मिळते

ट्रॅक्टर अनुदान योजने अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या शेतकरी वर्गाला 50 टक्के सबसीडी मिळते तसेच खुल्या प्रवर्गातील शेतकरी वर्गाला 40 टक्के अनुदान/ सबसिडी मिळते

योजने अंतर्गत कोणकोणत्या औजारांसाठी अनुदान मिळते

ट्रॅक्टर अनुदान योजने अंतर्गत जमीन मशागत यंत्र, जमीन सुधारणा पूर्व मशागत औजारे, आंतर मशागत यंत्र पेरणी व लागवड यंत्रे पीक संरक्षण अवजारे, काढणी व मळणी अवजारे इ. अवजारांसाठी अनुदान दिले जाते

Tractor Anudan Yojana Overview/ Tractor Subsidy Yojana :

योजेनचे संपूर्ण नाव ट्रॅक्टर अनुदान योजना/ ट्रॅक्टर सबसीडी योजना
राज्य महाराष्ट्र सरकार राज्य
विभाग कृषि विभाग
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ शेतीसाठी ट्रॅक्टर आणि संबंधित अवजारासाठी अनुदान
श्रेणी राज्य सरकारी योजना 2023
उद्देश यांत्रिकीकरनातून शेतीचे उत्पन्न वाढवणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिति सुधारणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन किंवा ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट http://mahadbt.maharashtra.gov.in/

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जेल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइट ला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज