Lek Ladaki Yojana | Maharashtra Lek Ladaki Yojana| लेक लाडकी योजना | महाराष्ट्रातील मुली होणार आता लखपती!!

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो ! महाराष्ट्रातील राज्य सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना (Lek Ladaki Yojana) ही नविन मुलींची योजना आणली आहे. या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती म्हणजेच लेक लाडकी योजना म्हणजे काय, योजनेची उद्दिष्टे, अर्ज कसं करावा, अर्ज कोणी करावा आणि योजनेसाठी लागणारी आवश्यक कागद पत्रे याबद्दल माहिती आपल्या ध्येयपुरती या मराठी वेबसाइट वर दिली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार आहे. या आर्थिक मदतीची सुरवात मुलगीच्या जन्मापासून केली जाणार आहे. त्यानंतर मुलगी जसजशी मोठी होत जाईल तसतशी तिला आर्थिक मदत मिळत जाईल.

Lek Ladaki Yojana– महाराष्ट्र सरकारने गरीब घरच्या मुलींना 101000/- रुपये देऊन लेक लाडकी योजना ही कल्याणकारी योजना 2023 पासून सुरू केली आहे. आणि राज्य सरकारने आता या योजनेला मंजुरी पण दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकी नंतर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेला देखील आता यामधे सामावून घेतले आहे.

आजही समजात मुलींना दुय्यम स्थान दिले जाते, मुलांपेक्षा जास्त जास्त मुलांना महत्व दिले जाते. मुलींची गर्भातच हत्या केली जाते अवढेच के मुईच्या शिक्षणालाही कमी महत्व दिले जाते , आजही राज्यात मुलींची लोकसंख्या मुलांच्या मानाने कमी आहे. मुलीना आजही ओझे समजले जाते. त्यामुळे राज्यातील मुलींच्या सर्व समस्यांचा विचार करून समाजात मुलीबद्दल असलेले नकारात्मक विचार सकरात्मकते कडे वाटचाल करण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणसाठी लेक लाडकी योजना (Lek Ladaki Yojana) 2023 रोजी सुरू करण्यात आली आहे

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना (Lek Ladaki Yojana) काय आहे

महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेल्या महाराष्ट्रातील आर्थिक आणि दुर्बल घटकातील मुलीना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी काढलेली विशेष योजना म्हणजे लेक लाडकी योजना!!

लेक लाडकी योजना सुरू करण्याची महत्वाची उद्दिष्ट

  • लक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
  • मुलींना शिक्षणाकरिता पैशासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये. या उद्देशाने लेक लाडकी या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • राज्यातील मुलींचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
  • मुलींना शिक्षणासाठी स्वतःचा पायावर उभे करने.
  • राज्यातील मुलींचा सर्वांगीण विकास करणे.
  • मुलींचे जीवनमान सुधारणे.
  • समाजात मुलींबद्दल असलेले नकारात्मक विचार बदलून त्यांच्या बद्दल सकारात्मक विचार निर्माण करने.
  • मुलींना आर्थिक दृष्टया बळकट बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

लेक लाडकी योजनेसाठी कधी आणि किती मदत मिळते

महाराष्ट्रात जर कोणत्या मुलीचा जन्म झाला तर तिच्या कुटुंबीयांना 5000/- रुपये दिले जातील. मुलगी पहीलीला जाईल तेव्हा तिच्या कुटुंबीयांना 6000/- रुपये दिले जातील. जेव्हा ती सहावीला जाईल तेव्हा तिला 7000/- रुपये मिळतील. त्यानंतर मुलीच्या 11वीच्या वर्गात गेल्यानंतर तिला 8000/- रुपये मिळतील. एवढेच नाही तर जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल तेव्हा तिला तब्बल 75000/- रुपये या योजनेतून मिळतील. अशा प्रकारे गरिबाच्या मुलीला महाराष्ट्र शासनाच्या या योजनेतून तब्बल 101000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. राज्य सरकारच्या माझी कन्या भाग्यश्री ही योजना संपुष्टात आणून लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे

कोणत्या वेळी किती रक्कम मिळेल ?

जन्म झाल्यानंतर 5000/- रुपये
पहिली त असताना 6000/- रुपये
सहावी त असताना7000/- रुपये
अकरावी त असताना 8000/- रुपये
18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75000/- रुपये

लेक लाडकी योजना साठी पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही महाराष्ट्रातील रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
  • योजनेसाठी मुलीचे कुटुंबीय पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड धारक असणे अनिवार्य आहे.
  • लेक लाडकी योजनेचा लाभ हा फक्त वंचित आणि दुर्बल घटकातील लाभार्थी मुलींना दिला जाणार असलेली माहिती महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 75 हजार रुपये मिळवायचे असतील तर सर्व शैक्षणिक कागदपत्र असणे बंधनकारक अनिवार्य आहे.

लेक लाडकी योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. मुलीचा जन्माचा दाखला
  2. मुलीचे आधार कार्ड
  3. मुलीचे रहिवाशी प्रमाणपत्र
  4. कुटुंबीयांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  5. मुलीच्या घरचे रेशन कार्ड
  6. मुलीची शैक्षणिक कागदपत्रे
  7. मोबाईल क्रमांक
  8. ईमेल आयडी
  9. मुलीचा बँक खाते पासबुक परंतु मुलीचे नसल्यास तिच्या पालकांच्या बँक पासबुकाचा तपशील

लेक लाडकी योजनेचा अर्ज

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा

लेक लाडकी योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा याविषयी मोठ्या प्रमाणावर विचारणा करण्यात येत आहे परंतु या योजना साठी कोणतीही अद्याप अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आलेली नसून कोणतीही नवीन वेबसाईट तयार करण्यात आल्यास संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचण्यात येईल. तसेच या संदर्भात सविस्तर माहिती दिली नसल्याने तसेच लेक लाडकी योजनेसाठी अधिकृत वेबसाईट किंवा कोणतीही पोर्टल सुरू करण्यात आलेली नाही याची देखील नोंद घ्यावी. अर्थसंकल्प सादर करता वेळेस केवळ लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली आहे याविषयी पुढील कोणतीही माहिती आल्यास आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर देण्यात येईल त्यामुळे वर्ष ग्रुप जॉईन करावा.

लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अथवा ऑफलाईन अर्ज कसा करावा? लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा ?अद्याप सदर योजनासंदर्भात शासनाकडून अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे, लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा, यासंदर्भातील तपशील उपलब्ध नाही.

सूचना:- महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थ संकलपत Lek Ladki Yojana In Marathi 2023 महाराष्ट्र याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्यांचा सामना करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. या योजनेची माहिती शासनाद्वारे स्पष्ट करण्यात आलेली नाही. या योजनेची 2023 च्या अर्थसंकलपात घोषणा करण्यात आली आहे.

Lek Ladaki Yojana Overview

योजनेचे नाव लेक लाडकी योजना (Lek Ladaki Yojana)
लाभार्थी राज्यमहाराष्ट्र
लाभार्थी वर्ग पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक
(गरीब कुटुंबातील मुली)
एकूण मिळणारी मदत 10100/- रुपये
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट लवकरच उपलब्ध होईल

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती करा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

lek ladaki yojana form pdf | लेक लाडकी योजना अर्ज | Lek Ladaki Yojana scheme | लेक लाडकी योजना फॉर्म| ALek Ladaki Yojana Form

Lek Ladaki Yojana