नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Sbi Home Loan In Marathi एस बी आय होम लोन बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.
मित्रानो, Sbi Home Loan In Marathi सर्वांचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर आले पाहिजे, पण हल्लीच्या काळात जागा सोबतच घर बांधकाम करिता लागणाऱ्या सर्व सामग्री महाग होत चालेल्या दिसत आहेत. याकरिता एस बी आय ने सर्व सामान्य नागरिकांना होम लोन देण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. या होम लोण द्वारे तुम्ही तुमचे स्वप्नांचे घर बांधण्याचे काम पूर्ण करू शकता.
Sbi Home Loan In Marathi 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर मधील देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँक मधून त्यांच्या ग्राहकांना कमी व्याज दरात वयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, होम लोन म्हणजेच गृह कर्ज अशा वेगवेगळ्या प्रकारची कर्जे उपलब्ध करून देते. या कमी व्याजाच्या कर्जामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. बहुतांश नागरिक या कर्जाचा लाभ घेताना दिसत आहेत.
उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 5 लाखांचे कर्ज, येथे क्लिक करा
- विशेष म्हणजे सबियाय त्यांच्या ग्राहकांना सर्वात कमी व्याज दरात होम लोन उपलब्ध करून देत आहे.
- SBI कडून मिळालेल्या माहिती नुसार बँक 8.6% व्याज दरात गृह कर्ज पुरवठा करते.
- मात्र काही प्रसंगी हे गृह कर्ज व्याज दर वाढू शकते.
- व्याजदर हे व्येकतीच्या सीबील स्कोअर आणि इतर गोष्टींवर अवलंबून राहणार आहे.
20 लाखांच्या होम लोन करिता किती हप्ता येईल?
- जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 8.6% व्याज दराने 20 लाख रुपये होम लोन घेतले,
- आणि त्या कर्जाची परतफेड ही 20 वर्षांची ठेवली तर तुम्हाला 17,483 रुपयांचा मासिक हप्ता भरवागनार आहे.
- या सर्व कालावधीत तुम्हाला 21 लाख 95 हजार 981 रुपये व्याज भरावे लागणार आहे.
म्हणजेच तुम्ही घेतलेले कर्ज 20 लाख रुपये आणि त्याचे व्याज 21 लाख 95 हजार 981 रुपये असे एकूण 41 लाख 95 हजार 981 रुपये रक्कम भरावी लागणार आहे. याचा कालावधी 20 वर्ष एवढा राहील.
अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
SBI कडून गृह कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
SBI Home Loan Documents
- ओळखीचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक कागदपत्र
- पत्याचा पुरावा.
- होम लोन करिता मालमत्तेची कागदपत्रे सुद्धा लागतात.
- यासोबतच बांधकाम परवानगी लागते.
- अर्जदाराच्या बँक खात्याचे मागील 6 महिन्यांचे तपशील म्हणजेच स्टेटमेंट.
- नोकरदार असेल तर वेतन स्लीप किंवा 3 महिन्यांचे वेतन प्रमाणपत्र.
- मागील 2 वर्षाच्या फॉर्म 16 ची प्रत किंवा मागील 2 आर्थिक वर्षाच्या आयटी रिटर्नची प्रत ही तुम्हाला होम लोन करिता लागणार आहे.
- पगारदार अर्जदार/ सह अर्जदार/ हमिदारासाठी उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागू शकतो.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे SBI च नव्हे ते सर्व बँक मध्ये जवळपास हीच असतात.
- परंतु अर्जदाराला यापेक्षा अधिक सुद्धा कागदपत्रे लागू शकतात,
- त्यासोबतच अर्जदाराचा सीबील स्कोअर चांगला असणे अनिवार्य आहे.
- जर तुम्हांला कमी व्याजदरात होम लोन पाहिजे असेल तर तुमचा सीबील स्कोअर 700 च्या वरती असणे आवश्यक आहे.
आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
Sbi Home Loan In Marathi | sbi Home Loan Interest Rate | sbi Home Loan cibil | sbi Home Loan Eligibility calculator | sbi Home Loan emi calculator