Ramai Awas Yojana 2024 | रमाई आवास योजना 2024 |

घर बांधण्यासाठी मिळणार अनुदान

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण रमाई आवास योजना (Ramai Awas Yojana 2024) बद्दल संपुर्ण माहिती आपल्या ध्येयपूर्ती वेबसाईट वर घेणार आहोत. आपल्या देशात अजूनही खुप लोक दारिद्र्येषेखालील आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासन वारंवार गरीब वंचित लोकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते ज्यातून अनेक गरीब कुटुंबांना फायदा होऊन त्यांचा उदय झाला आहे. त्यांचे जीवनमान सुधारले आहे. त्यांची प्रगती होत आहे. माणसाच्या 3 मजबूत गरजा आहेत त्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. पण या 3 मूलभूत गरजा देखील आज खुप नागरिकांकडे नाहीत. नागरिकांना राहण्यासाठी घर नाही. काहिजणाकडे घर आहे पण ते कच्चे घर आहे. ज्यातून त्यांचे पाऊस, उन, माकडे यापासून देखील संरक्षण होत नाही. राज्यांतील बहुसंख्य लोकांना या अशा अनेविध परिस्थितीला सामोरे जावे लागते

त्यामुळे अशा लोकांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने रमाई आवास योजना (Ramai Awas Yojana) सुरू करण्याचा निर्णय घेतला ज्यातून लोकांना स्वतःचे हक्काचे घर मिळेल. त्यांचे राहणीमान उंचावेल तसेच जीवनमान सुधारण्यास मदतच होईल. Ramai Awas Yojana 2024 रमाई आवास योजना, ही योजना एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना आहे. या लेखात आपण रमाई आवास योजनेची वैशिष्ट्ये, यापासून मिळणारा लाभ, यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, रमाई आवास योजना साठी अर्ज कसा करावा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

वैशिष्ट्ये

  • सर्व साधारण क्षेत्रासाठी 1,32,000/- रुपये अनुदान दिले जाते.
  • शहरी भागातील घर बांधकाम साठी 2,50,000/- रुपये अनुदान दिले जाते.
  • नारेगा अंतर्गत लाभार्थ्यास 90 दिवसाचा रोजगार उपलब्ध केले जाते त्यासाठी लाभार्थ्यास 18,000/- रुपये दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवर्गातील जे अपंग लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील नाहीत व त्यांचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा अधिक आहे त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.
  • राज्यातील काही बेघर नागरिकांकडे स्वतःचा मालकीची जागा नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेणे अशक्य होते. या करिता शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी 50,000/- रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
  • ज्या व्यक्तीला रमाई आवास योजनेचा लाभ घेता आहे ते घर बसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर क्या साहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Ramai Awas Yojana 2024 Purpose | Ramai Awas Yojana in Marathi |

रमाई आवास योजना उद्देश

  • राज्यातील ज्या नागरिकांना राहायला स्वतःचे घर नाही अशा कुटुंबांना रमाई आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देणे

लाभार्थी

  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील ज्यांचे स्वतःचे घर नाही अशा नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • ज्या व्यक्ती गरीब असून त्यांच्या जवळ स्वतःचे पक्के घर बांधायला पैसे नाहीत अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्यात येते.
  • महाराष्ट्रात राहणारी आर्थिक दृष्ट्या गरीब व कमजोर कुटुंबे ज्यांच्या जवळ राहायला स्वतःचे घर नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच पडीक झोपडीत राहणारे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभ

  • जर तुम्हाला शहरी भागात घर बांधायचे असेल तर घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते
  • सर्वसाधारण भागातील क्षेत्रासाठी घर बांधणीसाठी 1.3 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • रमाई आवास घरकुल योजना या योजनेअंतर्गत डोंगराळ भागात घर बांधण्यासाठी 1.42 लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
  • तसेच योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांची तरतूद देखील केली गेली आहे.

पहिला हप्ता == जेव्हा तुम्ही घराचे बांधकाम सुरू करता तेव्हा घरकुलाचे 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल

दुसरा हप्ता == जेव्हा तुम्ही 50 टक्के अनुदान वापर करता तेव्हा 50 टक्के निधी वापराचे प्रमाणपत्र सादर करावे लागते आणि पुढील 40 टक्के अनुदान देण्यात येते

तिसरा हप्ता == घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर घराचा ताबा घेताना आणि सक्षम अधिकाऱ्यांनी घराचे काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्या नंतर उरलेले 10 टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते

निवड कशाप्रकारे केली जाते

  • लाभार्थ्यांची निवड करताना ग्राम सभा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून यांच्या मार्फत मंजुरी देण्यात येते.
  • शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका यांच्या व्दारे मंजुरी देण्यात येते.
  • योजनेअंतर्गत लाभार्थी निवडी मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थ्यांना 3 टक्के घरकुल देणे बंधनकारक आहे.
  • या योजनेअंतर्गत जमा झालेल्या अर्जामधून लॉटरी पद्धतीने लाभार्थींची निवड करण्यात येते.
  • लाभार्थ्यांची निवड ही सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 नुसार पारदर्शक पने केली जाते.

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • मतदान कार्ड
  • कुटुंबाचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
  • BPL प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षाचे रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र
  • घर टॅक्स पावती
  • लाभार्थी ज्या जातीत आहे त्या जातीचे प्रमाणपत्र
  • असेसमेंट पावती
  • लाभार्थ्यांचे बँके मध्ये जॉइंट अकाउंट असणे अनिवार्य आहे ( नवरा बायको )
  • पूर ग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • 100/- रुपये च्या स्टॅम्प पेपरवर टंकलिखित प्रतिज्ञापत्र
  • रेशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे
  • घर बांधायचे जागेत हिस्सेदारी असल्यास त्यांचे संमती पत्र
  • जन्माचा दाखला
  • लाभार्थी पीडित असल्यास त्याचा दाखला

अर्ज कसा करावा

अर्ज करण्याची ऑनलाइन पद्धत

  • सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईट (https://pmayg.nic.in) वर भेट द्या
  • आता तुमच्या समोर मुख पृष्ठ येईल त्यात तुम्हाला तूमची नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडायची आहे
  • त्यानंतर तुम्हाला रमाई घरकुल योजनेवर क्लिक करा
  • आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती जसेकि तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, ईमेल आयडी इत्यादी भरा
  • त्यानंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करा
  • आता तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर रमाई आवास योजना फॉर्म उघडेल त्या मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अशाप्रकारे तुम्ही रमाई आवास योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

रमाई आवस योजना अर्जासाठी येथे क्लिक करा

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वात आधी तुमच्या क्षेत्राच्या ग्रामपंचायत कार्यालयात, नगरपालिका कार्यालयात किंवा महानगरपालिकेत जाऊन या योजनेचा अर्ज घ्या.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून व लागणारी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सदर कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा

नियम

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • अर्जदार हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्क्या स्वरूपाचे घर नसावे.
  • आधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्ज करण्यासाठी व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवर्गातील असणे आवश्कच आहे, त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.
  • ग्रामीण भागात राहत असलेल्या अर्जदाराचे उत्पन्न 1 लाख 20 हजार पर्यंतच असणे आवश्यक आहे
  • नगर परिषद भागात राहत असलेल्या अर्जदाराचे उत्पन्न 1 लाख 50 हजार पर्यंत असणे गरजेचे आहे
  • महानगर पालिका क्षेत्रात, मुंबई सारख्या क्षेत्रात राहत असणाऱ्या अर्जदाराचे उत्पन्न 2 लाख पर्यंत असावे
  • अर्जदार व्यक्तीचा कुटुंबातील जर कोणी व्यक्ती सरकारी सेवेत असेल तर त्या अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Ramai Awas Yojana 2024 | ramai Awas Yojana official website | ramai awas yojna list | रमाई आवास घरकुल योजना फॉर्म PDF | रमाई आवास योजना अर्ज | ramai Awas Yojana amount | ramai awas Yojana apply online | ramai Awas Yojana online registration | घरकुल योजना | रमाई आवास योजना कागदपत्रे | घरकुल योजना मराठी | घरकुल योजना यादी |

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा