हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिसच्या दामदुप्पट योजनेबद्दल (Kisan Vikas Patra Interest Rate) संपुर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आता तुमची गुंतवणूक दुप्पट करा वाट कसली बघताय, संपुर्ण माहिती साठी हा लेख वाचून घ्या आणि योजनेचा लाभ घ्याआज आपण या लेखात पोस्ट ऑफीस दामदुप्पट योजना नक्की काय आहे, दामदुप्पट योजनेची ठळक वैशिष्ट्ये, योजनेपासून मिळणारे फायदे, पात्रता, Post Office Damduppat Yojana साठी अर्ज कसा करावा आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व बाबींची माहिती जाणून घेणार आहे.
मित्रांनो आजच्या काळात महागाई किती झपाट्याने वाढत आहे हे आपण सर्वजण पाहतच आहे, म्हणूनच बहुतांश लोक आहे त्या नोकरी मध्ये समाधानी नसल्याने अजून एखादा Part time Job करत आहेत, काहीजण व्यवसाय करत आहेत, कोणी स्टॉक मार्केट मध्ये पैसा गुंतवत आहे तर काहीजणांना आहे तो पैसा साठवून ठेवायचा आहे. तर मित्रांनो पैसा तुम्हाला साठवुनच ठेवायचा आहे तर पोस्ट ऑफिस तुम्हाला देत आहे दुप्पट परतावा. हो दुप्पट परतावा !!
पोस्ट ऑफीस दामदुप्पट योजना नक्की काय आहे
kisan vikas patra scheme
केंद्र सरकार नागरिकांच्या हितासाठी नवनविन बचत योजना पोस्ट खात्यामार्फत राबवत आहे, जेणेकरून नागरिकांची सुरक्षित बचत होऊन त्यांना चांगला परतावाही मिळेल. या योजनेला किसान विकास पत्र असेही म्हटले जाते ज्यातून तुमची गुंतवणूकीची रक्कम दुप्पट होईल
महिला सन्मान बचतपत्र योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
वैशिष्ट्ये
- गुंतवणूकीची किमान रक्कम रुपये 1000/- पासून सुरू होते
- या योजनेचे खास वैशिष्टय म्हणजे ही योजना एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करता येते
- तुम्हाला भरावयाची रक्कम चेक किंवा रोखीने भरता येते
- गुंतवणुक केल्यानंतर ग्राहकाला पोस्ट ऑफीस मार्फत एक किसान विकास पत्र प्रमाणपत्र प्रदान केले जाईल ज्यात ग्राहकाचे नाव, मुदत संपण्याची तारीख, मुदतीनंतर मिळणारी रक्कम या सर्वाचा समावेश केलेला असेल
- गुंतवणूकदार गुंतवलेले पैसे कधीही काढू शकतो
- जर ग्राहकाने 1 वर्षाच्या आत पैसे काढले तर कोणतेही व्याज त्यांना मिळणार नाही आणि दंड देखील भरावा लागेल
- किसान विकास पत्र योजनेचा वापर कर्ज मिळवण्यासाठी हमी म्हणुन देखील केला जातो
पात्रता
- किसान विकास पत्र योजनेच्या नावात ‘किसान’ हा शब्द जोडला म्हणजे केवळ शेतकरीच गुंतवणूक करू शकतील, असा नाही. देशातील इच्छुक नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात
- अनिवासी भारतीय (एनआरआय) किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत. खालील नागरिक किसान विकास पत्र खरेदी करू शकतात.
- प्रौढ नागरिक
- अल्पवयीन किंवा मानसिक आजारी व्यक्तीसाठी पालक म्हणून काम करणारी कोणतीही व्यक्ती
- स्वतःच्या नावावर 10 वर्षांवरील अल्पवयीन
- संयुक्त खाते म्हणून जास्तीत जास्त 3 प्रौढ
व्याजदर (Kisan Vikas Patra Interest Rate)
१ एप्रिल २०२३ पासून किसान विकास पत्रावरील व्याजदर वार्षिक ७.५ टक्के झाला आहे. या योजनेतील व्याज चक्रवाढ व्याजासह मोजले जाते
किसान विकास पत्र परिपक्वता कालावधी (Maturity Time)
नवीन नियमानुसार योजनेचा कालावधी वाढवला असून आता तो 10 वर्ष 4 महिने (124 महिने) इतका केला आहे
10 वर्ष 4 महिन्यानंतर गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट होईल
Kisan Vikas Patra | Kisan Vikas Patra 2024 | Kisan Vikas Patra Interest Rate | kisan vikas patra vyajdar | kisan vikas patra in marathi | किसान विकास पत्र मराठी | किसान विकास पात्र व्याजदर | किसान विकास पत्र 2023 | पोस्ट ऑफिस दामदुप्पट योजना | दामदुप्पट योजना | kisan vikas patra scheme | पोस्ट ऑफिस दामदुप्पट योजना 2024
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा
- सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस खात्यामध्ये भेट द्यावी लागेल
तेथून किसान विकास पत्र योजनेचा अर्ज घ्या - अर्जात विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरा
- त्यानंतर तुम्हाला सांगितलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा आणि सदर अर्ज आणि पैसे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा
- ते तुमच्या कागदपत्रांची तपासणी करून तुम्हाला प्रमाणपत्र देतील
- अशा प्रकारे तूम्ही अगदी सहज पद्धतीने किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकता
कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी एक)
- पत्त्याचा पुरावा
- वारसाचे पूर्ण नाव
- वारसाची जन्म तारीख
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
Kisan Vikas Patra Overview
योजनेचे नाव | किसान विकास पत्र योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
लाभार्थी | भारतीय नागरिक |
व्याजदर (Kisan Vikas Patra Interest Rate) | 7.5% (वार्षिक चक्रवाढ) |
गुंतवणूक कालावधी | 124 महिने |
किमान गुंतवणूक | 1000 रुपये |
जास्तीत जास्त गुंतवणूक | मर्यादा नाही |
कर लाभ | 1.5 लाख रु पर्यंत कर सूट |
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा