Pmegp Marathi | प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (Pmegp Marathi) बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आजकाल नोकरी बरोबरच तरुण पिढी मध्ये व्यवसायाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी खुप फायदेशीर आणि आनंददायी आहे. पण काही जण आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून सरकार अनेक प्रयत्न करत आहे. प्रधान मंत्री रोजगार निर्मिती योजना सारख्या व्यवसायाला चालना देणाऱ्या अनेक योजना राबवून शासन तरुण पिढीला एकप्रकारे प्रोत्साहन देत आहे त्यांच्या स्वप्नांना एक नवीन दिशा देत आहे. यामुळे देशांतील तरूणांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि त्यांचे राहणीमान सुधारेल. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना चा मुख्य हेतू देशांतील बेरोजगारी कमी करणे असा आहे

Pmegp Loan Details : आज आपण ध्येयपूर्ती वेबसाईटवर प्रधान मंत्री रोजगार निर्मिती योजना काय आहे, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना पात्रता काय आहे, योजनेतून काय लाभ मिळणार आहे, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना साठी अर्ज कसा करावा आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व बाबींची माहिती घेणार आहोत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना नक्की काय आहेPmegp चा फुल फॉर्म Pradhan Mantri Employment Generation Programme असा आहे. या योजनेला व्यवसाय कर्ज किंवा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असे देखील म्हटले जाते. या योजने अंतर्गत सरकार देशातील नागरिकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना उद्देश

  • देशातील बेरोजगारी कमी करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे
  • देशातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे
  • व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे
  • उत्पादन, सेवा आणि व्यवसाय क्षेत्रात सूक्ष्म उपक्रम स्थापन करून देशातील ग्रामीण आणि शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे
  • आर्थिक आणि इतर साहाय्य सेवा प्रदान करून सूक्ष्म उद्योग आणि लहान व्यवसायात वाढ करण्यासाठी चालना देणे
  • ग्रामीण आणि शहरी भागातील कामगारांना एकत्र आणून त्यांना त्यांच्या क्षेत्रातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
  • कामगार वर्गाचा रोजगार दर वाढवून त्यांची पैसे कमावण्याची क्षमता वाढवणे
  • सुशिक्षित बेरोजगारांमध्ये कौशल्यांचा विकास करून त्यांच्या कौशल्याचा उपयोग कुटुंबाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी करणे

फायदे

  1. क्रेडिट चा सुलभ प्रवेश – ही योजना उत्पादन, सेवा आणि व्यवसाय क्षेत्रात सूक्ष्म उद्योग करण्यासाठी क्रेडिट मध्ये सुलभ प्रवेश प्रदान करते
  2. रोजगार निर्मिती – उत्पादन, सेवा आणि व्यवसाय क्षेत्रात सूक्ष्म उपक्रम स्थापन करून देशातील ग्रामीण आणि शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे
  3. प्रकल्प खर्चावर सबसिडी – Pmegp योजना प्रकल्पावर देखील अनुदान देते जे अनुदान प्रकल्पाच्या श्रेणी आणि स्थानावर अवलंबून असते
  4. कौशल्य विकास – योजने अंतर्गत लाभार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते
  5. सर्वसमावेशक वाढ – SC/ST/OBC, महीला, अल्पसंख्यांक, भिन्न अपंग व्यक्तींना आणि इतर समाजातील दुर्बल घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देउन सर्वसमावेशक विकासाला चालना देणे
  6. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे – सूक्ष्म उद्योगांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, साधने आणि उपकरणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे
  7. साहाय्य सेवा – विपणन साहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि इतर सल्लागार सेवा यासारख्या अनेक सेवा प्रदान करून व्यवसायाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करणे

Pmegp loan साठी आवश्यक पात्रता

  • लाभार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • लाभार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असावे आणि त्याने या आधी कोणत्याही अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • सहकारी संस्था कायद्याअंतर्गत नोंदणी असलेल्या संस्था, बचत गट देखील pmegp loan साठी पात्र आहेत
  • सर्व उत्पन्न गट या योजनेसाठी पात्र आहेत म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही उत्पन्नाची अट नाही
  • आपल्याला जर एखादा १० लाखापेक्षा अधिकचा उत्पादन प्रकल्प किंवा ५ लाखापेक्षा जास्तीचा सेवा प्रकल्प सुरु करायचा असेल तर आपले शिक्षण कमीत कमी आठवी पास असले पाहिजे
  • १० लाखापेक्षा कमी रकमेचा उत्पादन प्रकल्प व ५ लाखापेक्षा कमी रकमेचा सेवा प्रकल्प सुरु करायचा असेल तर शिक्षणाची कोणतीही अट नाही

व्याजदर

PMEGP कर्ज योजनेअंतर्गत ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले आहे त्या प्रमाणे बँक आपल्या या कर्जाला व्याज लावत असतात. सरासरी बँकांचे व्याजदर ९ ते ११ टक्क्यांच्या आसपास आहेत.

कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वीज बिल
  • भाडे करार
  • जागेची कागदपत्रे (जागा स्वतःची असल्यास)
  • प्रोजेक्ट रिपोर्ट
  • खरेदी करणार असलेल्या वस्तूंची किंवा मशीनची कोटेशन
  • व्यवसाय परवाना उदा. उद्योग रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट, FSSAI, इतर परवाने
  • PMEGP पोर्टलवर केलेल्या अर्जाची प्रत
  • स्व:गुंतवणूक उपलब्ध असलेचा पुरावा
  • प्रकल्पानुसार इतर कागदपत्रे

अर्ज कसा करावा

  1. सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला (https://www.kviconline.gov.in/) भेट द्या
  2. आता तुमच्या समोर मुख पृष्ठ/ होम पेज येईल तिथे pmegp हा पर्याय येईल pmegp पर्यायावर क्लिक करा
  3. पुढे एक पेज येईल तिथे Pmegp-e- portal हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
  4. तिथे online application individual applicant हा नवीन फॉर्म ओपन होईल
  5. आता अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा आणि data save बटन वर क्लिक करा
  6. आता तुमच्या अर्जाची प्रिंट काढून जवळच्या जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या कडे दाखल करा.
  7. त्यानंतर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्र DIC किंवा खादी ग्रामोद्योग मंडळ KVIC द्वारे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल
  8. या मध्ये जर तुम्ही प्रकल्प निवडला असेल तर तो बँकेकडे पाठवला जाईल
  9. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील.यानंतर बँक तुमच्या अर्जावर प्रक्रिया करेल आणि तुमच्या प्रकल्पाच्या जागेवर तपासणी करतील.
  10. यानंतर तुम्हाला कर्ज मंजुरी देण्यात येईल.अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल

लाभ

  • या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण भागात 25 टक्के पर्यंत अनुदानाची तरतूद आहे.
  • या योजनेअंतर्गत एखाद्याला शहरी भागात व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा नागरिकांसाठी 15 टक्के पर्यंत ची तरतूद करण्यात आली आहे.
  • या उमेदवारांना स्वतःचा हिस्सा 10 टक्के गुंतवणुक करावी लागेल.
  • ग्रामीण भागातील अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, अपंग, महिला, इतर मागासवर्गीय प्रवर्ग, आणि माजी सैनिक यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 35 टक्के पर्यंत अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
  • शहरी भागातील नागरिकांसाठी 25 टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे, त्यामध्ये त्यांना 5 टक्के स्वतःची रक्कम गुंतवणूक करावी लागेल
लाभार्थी श्रेणी लाभार्थ्याला
मिळणारा वाटा
ग्रामीण
अनुदान दर
शहरी
अनुदान दर
सामान्य10 %25 %15 %
विशेष 5 %35 %25 %

PMEGP योजनेअंतर्गत येणारे उद्योग

  • दुग्धजन्य पदार्थ
  • फलोत्पादन (सेंद्रिय शेती)
  • कचरा व्यवस्थापन
  • अन्न प्रक्रिया
  • कृषी आधारित अन्न प्रक्रिया
  • वन उद्योग
  • इलेक्ट्रिकल उपकरणे
  • लहान व्यवसाय मॉडेल
  • कापड आणि पोशाख
  • कागद आणि संबंधित उत्पादने
  • सिमेंट आणि संबंधित उत्पादने
  • सेवा क्षेत्रातील उद्योग येतो
  • प्लास्टिक आणि सेवा संबंधित
  • रसायने आणि खनिजे
  • कोल्ड स्टोरेज

प्रधान मंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत येणाऱ्या वित्तीय संस्था

  • सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँका
  • खासगी क्षेत्रातील अनुसूचित व्यवसायिक बँका राज्य स्थरावर मंजूर
  • प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती
  • प्रधान सचिव उद्योग, आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली
  • राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीने मंजूर केलेल्या सहकारी बँका
  • भारतीय लघु उद्योग विकास बँक SIDBI

PMEGP OVERVIEW

योजनेचे नाव PMEGP Marathi |
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना
कोणी सुरू केली केंद्र सरकार
विभाग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
श्रेणी केंद्र सरकार
लाभार्थी देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक
लाभ देशातील बेरोजगारी कमी करून तरूणांना उद्योग
सुरू करण्यास प्रोत्साहन देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईट https://www.kviconline.gov.in/

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

pmegp Marathi | प्रधानमंत्री रोजगार योजना 2023 मराठी | PMEGP Scheme In Marathi PDF | PMEGP ऑनलाइन अप्लिकेशन | प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजना | Prime Minister’s Employment Generation Programme (PMEGP) | PMEGP Loan Apply | प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी |