हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे (Online Pan Card in Marathi) या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. सध्या कोणत्याही महत्वाच्या कामासाठी तुमची ओळख किंवा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जे काही कागदपत्र गोळा करावे लागतात त्यात आधार कार्ड सोबत पॅनकार्ड देखील फार महत्वाचे असते. अगदी शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून बँकेत अकाउंट उघडण्यापर्यंत, टॅक्स भरणे अशा अनेक कामांसाठी पॅनकार्ड अनिवार्य गोष्ट बनली आहे. तरीही अनेक लोकांकडे पॅन कार्ड नाही आणि कित्येकांना ते बनविण्याची प्रक्रिया माहित नाही. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर आज आम्ही यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पॅन कार्ड बनवणे किंवा त्यात दुरुस्त करणे या दोन्ही गोष्टी सहज करता येतात.
Pan Card Apply Online :- आज आपण घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढायचे, अर्ज कसा करायचा, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पॅन कार्ड कोण काढू शकते, पॅन कार्ड चे फायदे, आणि पॅन कार्ड विषयी काही बेसिक माहिती घेणार आहोत
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
कोण पॅन कार्ड काढू शकते
कोणीही व्यक्ती, अल्पवयीन व्यक्ती, कंपन्या, संस्था, विदयार्थी पॅनकार्ड साठी अर्ज करू शकतात. पॅनकार्ड फक्त व्यक्तींसाठीच नाही तर कंपनी आणि पार्टनरशीप फर्म पण पॅनकार्ड काढू शकतात. अशा संस्थांकडे ज्या टॅक्स भरतात, त्यांच्याकडे पॅन नंबर असणे आवश्यक असते.
Online Pan Card in Marathi
Online Pan Card Apply from mobile
अर्ज कसा करावा
- तुम्हालाही घरी बसून पॅन कार्ड साठी अर्ज करायचा असेल, तर सर्वात आधी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्या
- अधिकृत वेबसाईट
- आता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल तिथे ऑनलाइन अर्ज करा हा पर्याय येईल त्यावर क्लिक करा
- आणि फॉर्म भरा, आता तुम्हाला सांगावे लागेल की तुमच्याकडे पॅनकार्ड आहे की नाही, त्यानंतर तुम्हाला श्रेणी निवडावी लागेल, आता तुम्हाला शीर्षक निवडावे लागेल आणि नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाइल नंबर टाका
- आता terms and conditions ला Agree करा.पुढे Captcha Code एंटर करून सबमिट करा.आता तुम्ही एका नवीन पेजवर याल. येथे तुम्हाला एक acknowledgement नंबर दिसेल.
- आता पुढे तुम्हाला सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि payment करा
- आणि फॉर्म सबमिट करा, अशा प्रकारे तूम्ही घर बसल्या मोबाईल वर ऑनलाइन अर्ज करून पॅन कार्ड काढू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक, पोस्ट ऑफीस अकाउंट पासबुक, पोस्टपेड मोबाइल बील, पाणी बील, LPG किंवा पाइप्ड गॅस कनेक्शन बील, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रॉपर्टीचे कागदपत्र, इलेक्ट्रीसिटी बील, लँडलाइनचे बील किंवा ब्रॉडबँड कनेक्शन बील यापैकी एक)
- पूर्ण जन्मतारीख
- वडिलांचे पूर्ण नाव
- Mobile क्रमांक
- 2 पासपोर्ट साइज फोटो
- शुल्क
- आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक केलेला असावा
पॅन कार्ड चे फायदे
- पॅन कार्ड एक ओळखपत्र म्हणुन देखील महत्वपूर्ण भूमिका दर्शवते
- एखादा व्यवसाय किंवा एखादी कंपनी सुरू करण्यासाठी संस्थेच्या नावे पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे.
- मालमत्ता खरेदी किंवा विक्री दरम्यान पॅन कार्ड आवश्यक असते
- पॅन कार्ड आयकर विभागाला एखाद्या व्यक्तीच्या किंवा घटकाच्या आर्थिक व्यवहारांचे मूल्यांकन करण्यास मदत करते. हे कर चोरीमध्ये सामील असलेल्या लोकांना ओळखण्यात मदत करते.
- डिमॅट खाते उघडण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- भारतातील एकूण कर उत्पन्नाचे मूल्यांकन करते.
ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे | Online Pan Card Apply official Website | Online Pan Card official website | online Pan Card link | पॅन कार्ड ऑनलाइन कसे काढावे
पॅन कार्ड नंबर विषयी बेसिक माहिती
- पॅन कार्ड चा नंबर 10 अंकी असतो, आणि तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो जो आयकर विभागाने ठरवलेला आहे
- कार्ड वरील 10 अंकी नंबर पैकी पाहिले 3 अंक इंग्रजी A to Z अक्षरा पैकी असतात
- पॅन कार्ड वरील चौथे अक्षर सदर व्यक्तीचे स्टेटस दर्शवतो जसे की खालीलप्रमाणे
- A – व्यक्तींची संघटना
- B – BOI (Body of individual)
- C – कंपनी
- F – फर्म
- G – सरकार
- H – एचयुएफ (HUF) (हिंदू अविभक्त कुटुंब)
- L – स्थानिक प्राधिकरण
- J – कृत्रिम न्यायिक व्यक्ती
- P – व्यक्ती (वैयक्तिक)
- T – ट्रस्ट (AOP)
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा