New Ration Shop License | नवीन राशन दुकान परवाना |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वर नवीन राशन दुकान परवाना (New Ration Shop License) बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. नवीन राशन धान्य दुकान परवाना अर्ज सुरू करायचे असेल, जर तुम्हाला नवीन स्वस्त रास्त भाव दुकानदार व्हायचे असेल तर तुम्हाला रास्त भाव दुकान टाकण्यासाठी रास्त भाव दुकानदार परवाना मिळवावा लागतो. हा परवाना मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावांमध्ये रास्त भाव दुकान टाकून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता.

New Ration Shop Licence : आपण आज आपल्या लेखात नवीन राशन दुकान परवाना कसा काढता येईल, नवीन राशन दुकान परवाना वैशिष्टये, यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, नवीन राशन दुकान परवाना साठी अर्ज कसा करावा आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

New Ration Shop License in Marathi

पात्रता

 • अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
 • अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
 • अर्जदार हा ज्या भागात शॉप सुरु करण्यासाठी रिक्त पद सूचित केले आहे त्या भागाचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
 • अर्जदार हा रेशन दुकान संबंधित पुस्तके आणि खात्याची देखभाल करण्यास सक्षम असला पाहिजे.
 • रिक्त स्थानाची अधिसूचना ज्या जागेवर आहे त्या जागेवर अर्जदारास वैध अधिकार असायला हवा.
 • राशन दुकान आवारात 15 फुटांचा रस्ता आणि मध्यभागी नागरिक प्रवेश करू शकायला हवे.
 • प्रस्तावित आवारात 5 मीटर लांबीचा आणि 3 मीटर रुंदी आणि 3 मीटर उंचीवर असणे अनिवार्य आहे.
 • अनिवार्य कोमोडीजिट ॲक्ट 1995 च्या अंतर्गत अर्जदाराला दोषी ठरवू नये.अवेदक स्वतःचा अर्जदाराने चालवावा.

स्वस्त धान्य दुकान परवाना | नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना |

आवश्यतेनुसार कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • घर टॅक्स पावती/सातबारा/मालकी पत्र
 • गटाचे वार्षिक लेखे तपासणी केल्याचा अहवाल
 • ग्राम सभेचा ठराव दुकान मागणी पत्र
 • गट स्थापन केल्याचे नोंदणी पत्र
 • गुन्हा दाखल नसल्या बाबत शपथपत्र

वरील कागद पत्रांमध्ये तुमच्या जिल्हा नुसार बदल असू शकतात. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करत आहात त्यावेळेस त्या अर्जामध्ये दाखविलेली कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागेल.

Ration Shop License | Ration Shop License in Marathi

नवीन राशन दुकान परवाना पद्धत |

अर्ज कसा करावा

 • सर्वात आधी नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्या.
 • तिथे नवीन राशन दुकान परवाना चा अर्ज घ्या
 • जर तुम्हाला राशन दुकान परवाना अर्ज ऑनलाइन पद्धतीने मिळवायचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याच्या ऑफिसियल वेबसाइट वर भेट देऊन तो अर्ज डाउनलोड करा
 • सदर अर्ज बिनचूक भरा, आणि त्यासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा.
 • आणि New Ration Shop License चा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा
New Ration Shop License

Ration shop Licence नवीन राशन दुकान परवाना वैशिष्टये

आजच्या जगात पैसा किती महत्वाचा आहे हे तर आपल्या सर्वांना खुप जवळून माहिती आहे. सामान्य वर्गातील कुटुंबांना त्यांच्या काही सामान्य गरजांसाठी देखील आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात आपली सगळ्यात जास्त मूलभूत गरज म्हणजे अन्न ज्याशिवाय आपण राहू शकत नाही. पण ते सुद्धा अनेक कुटुंबांना मिळत नाही. त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशा साठी खुप आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामूळे अशा वर्गाचा विचार करून शासनाने माफक / मोफत दरात राशन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ज्यातून अनेकजण आपले पोट भरू शकतील.

Ration Shop License साठी लाभार्थ्यांची निवड कशी होईल

 • तुम्ही नवीन राशन दुकान किंवा स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज केल्या नंतर परवाना समितीकडे जेवढे अर्ज प्राप्त झाले असतील त्या अर्जाची सर्वप्रथम प्राथमिक तपासणी केली जाते.
 • त्या नंतर अर्जाची छाननी करण्यात येते, त्या नंतर जागेची तापासणी केली जाईल आणि इतर आवश्यक तपासण्या होतील
 • नंतर पात्र लाभार्थ्यांना परवाना देण्यात येत असतो आणि ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा


अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti.com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

Leave a comment