new ration card apply online | रेशन कार्ड ऑनलाइन महाराष्ट्र |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर ऑनलाइन रेशन कार्ड कसे काढावे (new ration card apply online) याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका हे भारतातील अनेक कुटुंबांसाठी जीवनरेखा म्हणून काम करते, ज्यामुळे सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूंचा प्रवेश सुनिश्चित होतो. खाद्यतेल खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानावर हे कार्ड दाखविले जाते. सरकारच्या शिधा संबंधीच्या योजने दरम्यान हे कार्ड दाखवावे लागते.

Apply Online for Ration Card – आज आपण या लेखात नवीन रेशन कार्ड ऑनलाइन कसे काढावे, त्यासाठी अर्ज कसा करावा, रेशन कार्ड चे उपयोग आणि रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याबद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड उपयोग

 1. शिधापत्रिका हा ओळखीचा आणि निवासाचा महत्त्वाचा पुरावा म्हणून देखील वापरला जातो
 2. अनेक सरकारी कल्याणकारी योजना आणि अनुदाने शिधापत्रिकेशी जोडलेली आहेत.
 3. रेशन कार्ड सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या रास्त भाव दुकानांद्वारे परवडणाऱ्या किमतीत जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या प्रवेशाची हमी देते
 4. बँकेत खाते उघडण्यासाठी, शाळा, महाविद्यालयात घराच्या पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डचा आजही वापर केला जातो.

रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मतदान कार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • लाईट बिल
 • बँक पासबुक
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • जॉब कार्ड
 • ड्रायविंग लायसन्स
 • अर्जदाराच्या नावावर चालू टेलिफोन बिल
 • अर्जदाराच्या नावावर एलपीजी(LPG)

नवीन रेशन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

new ration card apply online in Marathi

 • सर्वात आधी शासनाच्या NFSE च्या वेबसाईट वर (https://rcms.mahafood.gov.in/) भेट द्या
 • जर तुम्ही आधी कधी रजिस्ट्रेशन केले नसेल तर सर्वात आधी registration प्रक्रिया पूर्ण करून घ्या, त्यासाठी
  • उजव्या बाजूला sign in / register पर्याय दिसेल त्यावर जाऊन Public Login हा पर्याय निवडायचा आहे.
  • आता “New user, sign up here” हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करावे
  • नंतर “Register new ration car user” ची पॉपअप ओपन होईल त्यातील “I want to apply for new ration card” या पर्यायाची निवड करावी.
  • आता फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमची अचूक माहिती टाकून घ्यावी.जसे कि नाव मायबोली मध्ये व नाव इंग्रजी मध्ये, आधार क्रमांक, जेंडर, मोबाईल नंबर, ई-मेल ऍड्रेस टाका
  • एक लॉगिन आई-डी व पासवर्ड तयार करा आणि Get OTP वर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाइलला नंबर वरती एक OTP येईल तो प्रविष्ट करा, नंतर लॉगिन आई-डी व पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन व नवीन रेशन कार्ड साठी Apply करा.
 • आता लॉगिन आई-डी व पासवर्ड टाकून लॉगिन करा, तिथे मुख्यपृष्ठावर “रेशन कार्ड सेवा” किंवा तत्सम पर्याय येईल
 • “नवीन शिधापत्रिका” अर्ज निवडा आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा
 • आता तुम्हाला सांगितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, आणि फॉर्म सबमिट करा
 • यशस्वी सबमिशन केल्यावर तुम्हाला एक पोचपावती किंवा संदर्भ क्रमांक प्राप्त होईल. हा क्रमांक तुमच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
 • अशाप्रकारे तुम्ही रेशन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करू शकता

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज व वरील नमूद केलेली सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळील स्वस्त धान्य दुकान किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते कागदपत्रे जमा करावी लागतील.

नवीन नाव नोंदणी करण्याची ऑनलाइन प्रक्रिया

 • सर्वात आधी राज्याच्या अन्न पुरवठा अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.
 • त्यानंतर Login करा, आणि होम पेजवर नव्या सदस्याचं नाव जोडण्यासाठीचा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा.
 • इथे समोर नवा फॉर्म दिसेल त्यात कुटुंबातील नव्या सदस्याची माहिती भरा
 • फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे आणि सॉफ्ट कॉपीही अपलोड करा
 • फॉर्म सबमिट केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
 • यामुळे याच पोर्टलवर तुम्ही आपला फॉर्म चेक करू शकता.
 • अर्ज आणि कागदपत्रे अधिकारी चेक करतील. योग्य माहिती असल्यास तुमचा अर्ज स्विकारला जाईल.
 • त्यानंतर पोस्ट द्वारे रेशन कार्ड तुमच्या घरी येईल.

नवीन नाव नोंदणी करण्याची ऑफलाईन प्रक्रिया

 • सर्वात आधी आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जा.
 • इथे नव्या सदस्याचं नाव जोडण्यासाठी अर्ज भरावा लागेल.
 • अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरुन कागदपत्रांसह अर्ज जमा करा.
 • इथे काही अर्जसाठी फी देखील भरावी लागेल.
 • अर्ज जमा झाल्यानंतर अधिकारी तुम्हाला एक रिसिप्ट देतील, या रिसिप्टद्वारे तुम्ही अर्जाचं ऑनलाइन स्टेटस तपासू शकता.
 • अधिकारी फॉर्मची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील आणि कमीत-कमी 2 आठवड्यात रेशन कार्ड घरी पाठवलं जाईल.

ration card apply online | ration card new name add | how to apply online for ration card | ration card application form online | राशन कार्ड ऑनलाइन | ration card apply online maharashtra | रेशन कार्ड कसे काढावे | रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी | रेशन कार्ड ऑनलाइन महाराष्ट्र |

new ration card apply online

how to apply online for ration card Marathi | ration card apply online marathi