Aadhaar Pan Card link Online | आधार कार्ड पॅन कार्ड शी कसे लिंक करायचे |

Aadhaar Pan Card link Online – हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर आधार कार्ड पॅन कार्ड ला कसे लिंक करायचे याबद्दल ची संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजकाल सगळ्याच गोष्टी आपण घरबसल्या करू शकतो, आणि त्यामुळे आपण आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाचवू शकतो.

आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करणे आवश्यक आहे, करदात्यांना त्यांचे आधार त्यांच्या कायम खाते क्रमांक (पॅन) कार्ड शी लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर कर दात्यांनी त्यांचे आधार पॅन कार्ड शी लिंक केले नाही तर, 1 जुलै 2023 पासून पॅन कार्ड निष्क्रिय होतील. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करायचे असेल तर पटकन जाऊन हा लेख नक्की वाचा.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

पॅन आधार शी लिंक आहे की नाही हे कसे चेक करावे

जर तुम्हाला आधार कार्ड आणि पण कार्ड एकमेकांना लिंक आहे की नाही हे तासायचे असेल तर तर 2 मिनिटात खालील प्रकारे प्रक्रिया करून तपासा.

  • तुमचा पॅन आणि आधार लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या एसएमएस (Income Tax SMS) सुविधेचा वापर करू शकता.
  • तुम्ही तुमच्या मोबाईल वरून एसएमएस टाईप करून एका फॉरमॅटमध्ये 567678 किंवा 56161 वर पाठवावे लागेल.
  • सदर फॉरमॅट अशाप्रकारे SMS – UIDPAN (12 aadhaar=”” digit=””) (10 digit=”” pan=””) टाइप करा.
  • हा एसएमएस(SMS) 567678 किंवा 56161 वर पाठवा.
  • जर दोन्ही जोडलेले असतील तर तुम्हाला एक एसएमएस म्हणजेच (“आयटीडी डेटाबेस मध्ये पॅनशी आधीच आधार जोडलेले आहे. आमच्या सेवा वापरल्याबद्दल धन्यवाद.”(Aadhaar…is already associated with PAN..in ITD database. Thank you for using our services.) मिळेल.

आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक कसे करावे

  • सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला (www.incometax.gov.in) भेट द्या
  • आता तुमच्या समोर एक लॉगिन तपशील प्रविष्ट करण्यासाठी येईल ज्यात लॉगिन करा
  • आता एक विंडो ओपन होईल ही तुम्हाला पॅन आधार कार्ड ला लिंक करण्यास सांगेल. नसल्यास, मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘आधार लिंक करा’ वर क्लिक करा.
  • पॅन वरील माहितीनुसार नाव जन्मतारीख आणि लिंग यासारखे तपशील आधीच नमूद केले जातील.
  • तुमच्या आधार कार्डावर नमूद केलेल्या पॅन तपशीलांसह स्क्रीनवर पडताळणी करा.
  • जर काही जुळत नसेल, तर तुम्हाला कागदपत्रांमध्ये ते दुरुस्त करुन घ्यावे लागेल. तपशील जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक टाका आणि “आता लिंक करा” बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला एक संदेश कळवेल की तुमचा आधार तुमच्या पॅन शी यशस्वीरित्या लिंक झाला आहे.
  • अशा प्रकारे तूम्ही घर बसल्या तुमचे आधार पॅन ला लिंक करू शकता.

एसएमएस द्वारे आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करण्याची प्रक्रिया

  • सर्वात आधी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा.
  • जर तुमचा आधार क्रमांक 42456446778 असेल आणि तुमचा पॅन ABCDE2345F असेल तर तुम्हाला UIDPAN 42456446778 ABCDE2345F टाइप करावा लागेल आणि हा संदेश 567678 किंवा 56161 वर पाठवावा लागेल.
  • अशा प्रकारे एसएमएस द्वारे आधार कार्ड पॅन ला दोन मिनिटात लिंक करून घ्या.

घरबसल्या काढा तुमचे पॅन कार्ड 5 मिनिटात

Aadhaar Pan Card Link Online

Adhar card pan card link Online | aadhar card pan card link | adhar pan link | आधार कार्ड पॅन कार्ड लिंक ऑनलाइन | yojana in marathi | aadhar card pan card link status | How to Link aadhar to pan online | how to link adhar pan | aadhar pan link Online website | How to Link aadhar card to pan |