Maratha Kunbi Caste Certificate 2024 | मराठा कुणबी जात प्रमाणपत्र |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर मराठा कुणबी जात प्रमाणपत्र ( Maratha Kunbi Caste Certificate 2024) याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठवाड्यात ज्यांच्याकडे महसूल व इतर निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मोठे आंदोलन केले आहे. जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर ला सरकारच्या आश्वासनानंतर आपले उपोषण स्थगित केले. मराठवाड्यात ज्यांच्याकडे महसूल व इतर निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. सुरुवातीला फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी होती, परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी आहे.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

कुणबी जात प्रमाणपत्र नेमके कसे काढता येणार?

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची सोपी पद्धत

  • कुणबी जात प्रमाणपत्र बनवण्यासाठी 13 ऑक्टोंबर 1967 रोजी किंवा त्याआधी जन्म झालेल्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजेच तुमचे वडील, आत्या, चुलते, आजोबा, पणजोबा, वडिलांचे चुलते, वडिलांच्या आत्या, वडिलांचे पणजोबा, खापर पणजोबा, खापर पणजोबा, चुलते यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे अनिवार्य आहे.
  • रक्त नातेसंबंधातील प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावरती कुणबी अशी नोंद आहे का ते तपासा
  • रक्त नातेसंबंधातील नातेवाईक यांनी जर अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर, त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाजकल्याण खात्याच्या छाननी समितीने वैद्य ठरवलेले त्यांचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुधा जातीचा पुरावा म्हणून चालेल.
  • रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.
  • आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंद 6ड नोंदी, जमीन वाटप नोंदी, सात बारा 8 अ, फेरफार, भाडेपट्टी, खरेदीखत, सातबारा अंमलात येण्याआधी असणारे क ड ई पत्र सुडपत्र ,खासरा पत्रक, हक्कपत्र किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातींचा उल्लेख आहे का ते शोधावे आणि कागदपत्रे काढून घ्यावी

स्वतंत्र काळात आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या जन्म व मृत्यू ची नोंद कोतवाल वही किंवा गाव नमुना नं .14 मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालय मध्ये पाठवल्या जात असे. 1 डिसेंबर 1963 पासून कोतवाल हे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले व हे काम ग्राम पंचायतच्या ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आले.

कुणबी मराठा जात प्रमाणपत्र

| कुणबी आडनावे | कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे |

| कुणबी जात प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे | Kunbi maratha records |

Maratha Kunbi Caste Certificate 2024

लेक लाडकी योजनेचा अर्ज