Free Tablet Yojana | महाज्योती फ्री टॅबलेट योजना

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब तेही रोज

6GB डेटा इंटरनेट सुविधेसह

हाय हॅलो नमस्कार विदयार्थी मित्रांनो, आज आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजना (Free Tablet Yojana) याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्वांनी हा लेख काळजीपूर्वक वाचा. महाराष्ट्रात महाज्योती कडून MH CET/JEE/NEET 2023 या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी फ्री टॅबलेट FREE TABLET SCHEME मार्फत देण्यात येत आहेत. दहावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेडिकल साठी तयारी करण्याची इच्छा असते. मात्र बऱ्याच मुलांना आर्थिक स्थिती मुळे महागडे क्लासेस किंवा ट्यूशन लावणे शक्य होत नाही. अशाच गरीब विद्यार्थ्यांना महाज्योती टॅब देऊन त्यांचे इंजिनिअर किंवा मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पुर्ण करण्यास मदत करत आहे

Free Tablet Yojana – या लेखात महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. जसे की फ्री टॅबलेट योजना नककी काय आहे, योजनेची वैशिष्ट्ये/ उद्दिष्ट्ये, कोण लाभ घेऊ शकते, योजनेत काय लाभ मिळतो, पात्रता, अटी शर्ती, महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी लागणारी कागदपत्रे या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील. तरी सर्व महिती वाचून घ्या आणि पात्र विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्या

महाज्योती फ्री टॅबलेट योजना नक्की काय आहे

ही एक अशी योजना आहे ज्यातून महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना टॅबलेट च्या साहाय्याने त्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने शिकता येईल. म्हणजेच MHT CET/JEE /NEET यासारख्या परीक्षांचा अभ्यास विदयार्थी घरबसल्या ऑनलाइन पुर्ण करू शकतील. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) ही योजना 10वी उत्तीर्ण मुलांसाठी सुरू केली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना सहज आणि सोयस्कर ऑनलाइन कोचिंग द्वारे अभ्यास करता येईल. आणि त्यांची पुढची स्वप्ने पुर्ण होण्यास मदत होईल.

योजेनेची उद्दिष्ट्ये (Free Tablet Scheme)

महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2023 ची उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत

  • महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी 10 वी नंतर 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांना टॅब द्वारे ऑनलाइन प्रशिक्षण देऊन अभ्यासात मदत करणे
  • डिजिटल शिक्षणाला जस्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे हा महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा मुख्य उद्देश आहे
  • विद्यार्थ्यांना जेईई, निट, सीईटी या परीक्षांचे मोफत मार्गदर्शन मिळवून देणे
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करणे
  • विद्यार्थ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे
  • त्यांचे जीवनमान सुधारण्याचा आणि त्यांची प्रगती करण्याचा प्रयत्न करणे
  • गरीब विद्यार्थ्यांना डिजिटल जगासोबत जोडणे
  • गरीब विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पुर्ण करण्यास मदत करणे

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता

Free Tablet Scheme साठी लागणारी आवश्यक पात्रता काय आहे हे खाली नमूद केले आहे

  • सर्वप्रथम विदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याने यावर्षी 10 वी परीक्षा उत्तीर्ण करुन 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेला असावा
  • शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे
  • ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे
  • ओबीसी, भटक्या जाती जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना च फ्री टॅबलेट स्कीम या योजनेचा लाभ घेता येईल

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज कसा करावा

  1. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी महाज्योतीच्या अधिकृत official वेबसाईटला (www.mahajyoti.org.in) भेट द्या
  2. तिथे होम पेज वर upcoming events मध्ये MHT-CET/JEE/NEET परीक्षेसाठी नोंदणी च्या खाली read more ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
  3. पुढे तुम्हाला Click here for Registration हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
  4. त्यामध्ये तुम्हाला सांगितलेली सर्व कागदपत्रे अचूक अपलोड करून अपलोड या बटणावर क्लिक करा
  5. आता तुम्हाला विचारलेली सर्व शैक्षणिक माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
  6. पुढे Print this form हा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करून तुमचया अर्जाजी प्रिंट/प्रत काढून घ्या
  7. अशाप्रकारे महाज्योती फ्री टॅबलेट योजना चा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
  8. जर तुम्ही पात्र असला तर महाज्योती कडून तुम्हाला संपर्क साधला जाईल आणि तुम्हाला फ्री टॅबलेट चा लाभ दिला जाईल

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • दहावीचे गुणपत्रक
  • 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेतल्यासंबंधी कागदपत्रे
  • ओबीसी, भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल क्रमांक

योजनेपासून मिळणारा लाभ

  • योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोफत टॅब्लेट मिळेल
  • ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज 6 GB इंटरनेट सेवा मोफत दिली जाईल
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाइन शिक्षण आणि कोर्सेस पूर्ण करू शकतील
  • अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके दिली जातील
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल
  • विद्यार्थ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील
  • डिजिटल माध्यमामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी जास्त वाढेल

Free Tablet Yojana Overview :

योजेनचे संपूर्ण नाव महाज्योती फ्री टॅबलेट योजना (Free Tablet Scheme)
राज्य महाराष्ट्र
विभाग महात्मा फुले प्रशिक्षण संस्था
लाभार्थी 10 वी उत्तीर्ण होऊन 11 वी सायन्स साठी प्रवेश घेतलेले ओबीसी, भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी
लाभ टॅबलेट आणि दररोज 6 GB इंटरनेट सुविधा
श्रेणी राज्य सरकारी योजना 2023
उद्देश महाराष्ट्रात महाज्योती कडून MH CET/JEE/NEET 2023 या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी टॅब द्वारे मार्गदर्शन करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट www.mahajyoti.org.in

या योजनेसाठी काही शंका असेल तर तुम्ही खालील मध्यमातून संपर्क साधू शकता

  • पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, MA/15/1, S अंबाजारी रोड वसंत नगर, नागपूर महाराष्ट्र 440020
  • फोन नंबर : 07122870120, 07122870121, 8956775376
  • ईमेल : mahajyotingp@gmail.com , mahajyotimpsc21@gmail.com

महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Free Tablet Scheme | Mahajyoti Free Tablet Yojana | फ्री टॅबलेट योजना मराठी | Mahajyoti Free Tablet Yojana 2023 | Free Tablet Yojana

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जेल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइट ला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज