Pradhanmantri Mudra Yojana | प्रधानमंत्री मुद्रा योजना |

आता सरकार देणार 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज कोणत्याही हमी शिवाय

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhanmantri Mudra Yojana) याबद्दल सविस्तर माहिती. देशात तरुण पिढीला व्यवसाय करण्यासाठी चालना देण्यासाठी त्यांना सहज आणि तात्काळ कर्ज पुरवठयासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे. देशातील अनेक तरुणांचे स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न आहे जे आर्थिक परिस्थिती मुळे अर्धवट राहिले आहे. त्यांचे हेच स्वप्न पुर्ण करण्यासाठी सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे ज्यातून त्यांना कोणत्याही हमी शिवाय कर्ज मिळेल. Pradhanmantri Mudra Yojana ही एक कर्ज मिळवून देणारी खास योजना आहे. जर तुम्ही स्वतः चा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर प्रधानमंत्री मुद्रा योजना चा लाभ नक्की घ्या.

Pradhanmantri Mudra Yojana – आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वर प्रधानमंत्री मुद्रा योजना याबद्दल ची संपुर्ण माहिती म्हणजेच मुद्रा योजना नक्की काय आहे, योजनेची ठळक वैशिष्ट्ये किंवा उद्दिष्टे, योजनेसाठी लागणारी पात्रता, यापासून मिळणारा लाभ आणि फायदे, यासाठी अर्ज कसा करायचा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून तुम्हाला मिळणार आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा योजना नक्की काय आहे

Pradhanmantri Mudra Yojana ही एक अशी योजना आहे ज्यातून तुम्हाला कोणत्याही हमी शिवाय 10 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. जर तुमच्या डोक्यात कोणता व्यवसाय, बिझनेस करायचे असल्यास आणि तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणुन तुम्ही थांबला असाल तर थांबु नका कारण प्रधानमंत्री मुद्रा योजना तुम्हाला देत आहे अगदी सहज कर्ज आणि तेही 10 लाखांपर्यंत!! केंद्र सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली असून या अंतर्गत सरकारला 50000 ते 10 लाखापर्यंत कर्ज कोणत्याही हमी शिवाय द्यावे लागते. तसेच यासाठी तुम्हाला कोणतीही एक्स्ट्रा फी म्हणजेच प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. या योजनेचा व्याजदर 7.30% p.a. पासून सुरू होतो. वेगवेगळ्या बँक किंवा संस्था साठी वेगवेगळा आहे

Pradhanmantri Mudra Yojana

मुद्रा योजनेचे एकूण 3 प्रकार आहेत

  • पहिली श्रेणी म्हणजे शिशु कर्ज. याअंतर्गत जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचा व्यवसाय सुरू करता तेव्हा सरकार तुम्हाला 5 वर्षापर्यंत 50000 पर्यंतचे कर्ज विना हमी देते.
  • दुसरी श्रेणी म्हणजे किशोर कर्ज श्रेणी. आधीच व्यवसाय असणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी 50000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते
  • तिसरी श्रेणी म्हणजे तरुण कर्ज श्रेणी. या श्रेणी अंतर्गत सरकार व्यवसायाच्या विस्तारासाठी 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना : काही बँक कव्हर

सार्वजनिक क्षेत्रखाजगी क्षेत्रप्रादेशिक ग्रामीण बँका सहकारी बँका
स्टेट बँक ऑफ इंडियाअक्सिस बँकचैतन्य गोदावरी ग्रामीण बँक गुजरात स्टेट को ऑप लि.
बँक ऑफ बडोदासीटी युनियन बँक ली.डेक्कन ग्रामीण बँक मेहसाणा अर्बन को. ऑप लि.
बँक ऑफ महाराष्ट्रकेथोलिक सीरियन बँक लि.आंध्र प्रगती ग्रामीण बँक राजकोट नागरी सह बँक
बँक ऑफ इंडियाD.C.B. बँक लि.बिहार ग्रामीण बँक
कॅनरा बँकHDFC बँक लि.सप्तगिरी ग्रामीण बँक
कॉर्पोरेशन बँकफेडरल बँक लि.

Pradhanmantri Mudra Yojana साठी आवश्यक पात्रता

  1. मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर व्यक्ती भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे
  2. लाभार्थी व्यक्तीचे वय कमीतकमी 24 आणि जास्तीत जास्त 70 वर्ष असणे गरजेचे आहे
  3. अर्जदार बँक डिफॉल्टर नसावा
  4. उत्पादन, प्रक्रिया, व्यापार किंवा सेवा क्षेत्र यासारख्या व्यवसायासाठी मुद्रा योजना पात्र

अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला (http://www.mudra.org.in/) भेट द्या
  2. तिथे तुम्हाला तीन श्रेणी म्हणजेच शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज दिसतील
  3. आता ज्या श्रेणीसाठी तुम्ही पात्र आहात त्यावर क्लिक करा
  4. आता तुमच्या श्रेणीचा Application form डाऊनलोड करा
  5. डाऊनलोड केलेल्या फॉर्म ची झेरॉक्स प्रत काढून घ्या
  6. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती बिनचूक आणि काळजीपूर्वक भरा
  7. सोबत सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्मला जोडा
  8. आवश्यक सर्व कागदपत्रे खाली दिली आहेत
  9. सदर फॉर्म तुमच्या स्थानिक बँक कडे पाठवला
  10. आता तुमच्या फॉर्मची तपासणी आणि verification होईल आणि मंजुरीनंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला कर्ज मिळेल

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत

  1. पीएम लोन अंतर्गत स्वारस्य प्राप्तकर्ते यांच्या जवळच्या स्टेट बँक, खाजगी संस्था, ग्रामीण बँक किंवा व्यावसायिक बँकेत कागदपत्रांसह अर्ज जमा करू शकतो. तुम्हाला जी बँक किंवा संस्था सोयीस्कर आहे तिथे अर्ज करा
  2. अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडा
  3. आता बँक तपासणी करून मंजुरी देईल
  4. मंजुरीनंतर बँक तुम्हाला कर्ज देईल

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Pradhanmantri Mudra karj Yojana साठी खालीलप्रमाणे कागदपत्र लागतील

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • कायमस्वरूपी अर्जाचा पत्ता
  • पासपोर्ट साइज फोटो
  • व्यवसायाचा पत्ता
  • मालकीचा पुरावा
  • 3 वर्षांचा ताळेबंद
  • इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ असेसमेंट रिटर्न
  • व्यवसायासाठी लागणारी यंत्र सामुग्री किंवा मटेरियल यांचे कोटेशन किंवा बिल

प्रधानमंत्री मुद्रा योजनेपासून मिळणारे फायदे

  • देशातील कोणतेही व्यक्ती ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे किंवा ज्यांचा आधीच व्यवसाय आहे आणि त्याचा विस्तार किँवा वाढ करायची आहे असे सर्व व्यक्ती या PMMY योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थींना कोणत्याही हमी शिवाय कर्ज दिले जाते
  • PMMY अंतर्गत कर्ज देण्यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही
  • प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजने अंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो
  • लाभार्थीला मुद्रा कार्ड दिले जाते ज्यातून व्यावसायिक गरजांसाठी लाभार्थी ला खर्च करता येईल

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (PMMY) Overview

योजेनचे संपूर्ण नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhanmantri Mudra Yojana )
कोणी सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थी लहान व मध्यम उद्योजक
लाभ देशातील नगरीकाना व्यवसायासाठी किंवा व्यवसायाच्या वाढ आणि विकास साठी कर्ज उपलब्ध करून देणे
श्रेणी केंद्र सरकारी योजना 2023
उद्देश बेरोजगारी कमी करून जास्तीत जास्त व्यवसाय करण्यास प्रेरित करणे आणि देशाचा विकास करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन किंवा ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/

Pradhanmantri Mudra karj Yojana Marathi | प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी | Pradhanmantri Mudra Yojana | प्रधानमंत्री मुद्रा योजना | How to apply for Pradhanmantri Mudra Yojana | Mudra Yojana | PMMY | मुद्रा योजना | मुद्रा loan | mudra loan |

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज