Maha Us Nondani App | महा ऊस नोंदणी ॲप लॉन्च ; आता घरबसल्या ऊस नोंदणी करा |


हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत एका भन्नाट ॲप ची माहिती म्हणजेच महा ऊस नोंदणी ॲप ची माहिती ( Maha Us Nondani App). या ॲप पासून तुम्हाला खुप फायदा होणार आहे कारण तुम्हाला घरबसल्या ऑनलाइन मोबाईल वरून तुमच्या उसाची नोंद करता येईल. महा ऊस नोंदणी ॲप हे साखर आयुक्तालय मार्फत सुरू करण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला उसाची नोंद करण्यासाठी आता कारखान्यात जाऊन वाट बघावी लागणार नाही, तसेच तुम्हाला त्यासाठी लागणारी कागदपत्रे जसे की सातबारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स यांची देखील गरज भासणार नाही. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने महा ऊस नोंदणी ॲप (Maha Us Nondani App) वर जाऊन आपल्या ऊसाची नोंदणी करायची आहे.

Maha Us Nondani App – शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही नोंदणी कशी करायची, यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल, कश्याप्रकारे उसाची नोंद घरबसल्या करायची आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागतील याची सर्व माहिती तुम्हाला हा लेख वाचून समजेल. त्यामुळे तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करुन हा लेख नक्की वाचा. जेणेकरून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतील.

Maha Us Nondani App

महा ऊस नोंदणी ॲप नक्की काय आहे

साखर आयुक्तालय मार्फत सुरू करण्यात आलेले महा ऊसनोंदणी ॲप हे एक असे ॲप आहे ज्यातून तुम्हाला घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाइन तुमच्या ऊसाची नोंदणी करता येईल. यातून शेतकरी बांधवांचा वेळआणि होणारा खर्च देखील वाचेल. त्यांना कारखान्यात येरझाऱ्या घालाव्या लागणार नाहीत.

ज्या शेतकऱ्यांना कारखान्यात जाऊन उसाची नोंदणी करणे शक्य नसल्यास त्यांनी Maha Us Nondani App चा वापर करुन आपल्या उसाची नोंद करू शकतात.

शेतकऱ्यांना कारखान्यात कोणकोणत्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंद केली आहे याची देखील माहिती या ॲप वर पाहता येणार आहे.

नोंद कशी करावी

Maha Us Nondani App वर आपल्या ऊसाची नोंद घरबसल्या ऑनलाइन मोबाईल वरून कशी करायची याची सविस्तर माहिती खाली दिली आहे तरी ज्यांना आपल्या ऊसाची नोंद करायची आहे त्यांनी खालील प्रक्रिया काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या ऊसाची नोंद त्वरित करुन घ्या

  • सर्वात आधी तर तुमच्या मोबाईल च्या प्ले स्टोअर ( Play Store) ॲप वर जा
  • त्यामध्ये Maha Us Nondani App सर्च (search) करा
  • ॲप ला लॉगिन करुन घ्या आणि तुमचे ॲप सुरू करुन घ्या
  • ॲप सुरू झाल्यानंतर तुम्हाला 5 टप्प्यात माहिती भरायला सांगितली जाईल
  • ते पाच टप्पे खालील प्रमाणे आहेत
    • ऊस नोंद करणाऱ्या शेतकऱ्याची माहिती
    • ऊस क्षेत्र असलेल्या ठिकाणची माहिती
    • ऊस लागवडीची माहिती
    • कोणत्या कारखान्यास ऊस नोंद करायची आहे ती माहिती
    • स्वयंघोषणापत्र
  1. ऊस नोंद करणाऱ्या शेतकऱ्याची माहिती
    • या टप्प्यात प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायला सांगतील, त्यांनतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव टाकावे लागेल. ही सर्व माहिती बिनचूक भरा
  2. ऊसाचे क्षेत्र असलेल्या ठिकाणची माहिती
    • या टप्प्यात तुम्हाला तुमचे ऊसाचे क्षेत्र नक्की कोणत्या गावात आहे कोणत्या भागात आहे याबद्दलची माहिती विचारली जाईल. म्हणजेच यात तुम्हाला प्रथम तुमचा जिल्हा निवडावा लागेल नंतर तुमचा तालुका आणि गावाचे अचूक नाव निवडावे लागेल आणि तुमच्या शेतीचा गट नंबर भरावा लागेल. गट नंबर काळजीपूर्वक लिहा
  3. ऊस लागवडीची माहिती
    • येथे तुम्हाला ऊस लागवडीची सर्व माहिती विचारली जाते जसे की, तुम्ही ऊसाची लागवड केंव्हा केली, तुमच्या उसाचा प्रकार कोणता आहे, ऊसाची जात काय आहे, ऊस लागवडीची तारीख काय आहे तसेच तुमच्या ऊस लागवडीचे क्षेत्र किती आहे ही सर्व माहिती तुम्हाला या टप्प्यात भरावी लागेल. ( तुमचे ऊस लागवडीचे क्षेत्र गुंठ्यांत लिहा)
  4. कोणत्या कारखान्यात ऊस नोंदणी करायची आहे
    • या टप्प्यात तुम्हाला 3 पर्याय दिले जातील त्यापैकी तुम्हाला कोणत्या कारखान्यात तुमचा ऊसाची नोंदणी करायची आहे त्या कारखान्याचे नाव या टप्प्यात निवडा
  5. स्वयंघोषणापत्र
    • येथे तुम्हाला दिलेले सर्व स्वयंघोषणापत्र काळजीपूर्वक वाचून घ्या आणि ‘ऊस क्षेत्राची माहिती नोंदवा’ या पर्यायावर क्लिक करा

आता तुम्हाला धन्यवाद आपण सादर केलेली माहिती यशस्वीरित्या साखर कारखान्यांना कळवली आहे असा मेसेज पाहायला मिळेल

ऊसाची नोंदणी स्वीकारली आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मुख्य पृष्ठावर खालच्या बाजूला उस नोंदणी पर्यायावर क्लिक करा , तिथे तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि खालच्या बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमचा ऊस नोंदणीचा स्टेटस पाहायला मिळेल.

महा ऊस नोंदणी ॲप लॉन्च चे फायदे

Maha Us Nondani App चे बरेच फायदे तुम्हाला होणार आहेत, असेच काही महत्वाचे फायदे खाली दिलेले आहे

  • महा ऊस नोंदणी ॲप द्वारे घरबसल्या आपण ऊसाची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करू शकतो
  • या ॲपद्वारे नोंदणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल
  • यामुळे शेतकऱ्यांना होणारा खर्च देखील वाचेल
  • तसेच या ॲप मुळे आता पर्यंत किती शेतकऱ्यांनी नोंद केली आहे हेही पाहायला मिळणार आहे
  • ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊसाची नोंदणी करणे शक्य होणार नाही त्यांना आता घरी बसून मोबाईल वर ऑनलाइन नोंदणी करता येईल
  • महा ऊस नोंदणी ॲप वरून 100 सहकारी आणि 100 खाजगी अशा एकूण 200 कारखान्यांना नोंद शेतकरी करू शकणार आहे
  • Maha Us Nondani App हे आपण सहज डाऊनलोड करु शकतो आणि हे वापरायला पण अगदी सोपे आहे
  • या ॲप द्वारे शेतकऱ्यांना कारखान्यात घालावे लागणारे येरझारे कमी होणार आहेत
  • शेतकऱ्यांचे ऊस नोंदणी चे काम कमी वेळेत आणि कमी खर्चात होणार आहे
ॲपचे संपूर्ण नाव महा उस नोंदणी ॲप (Maha Us Nondani App)
विभाग साखर विभाग आयुक्तालय
लाभार्थी ऊस उत्पादक शेतकरी
लाभ घरबसल्या ऑनलाइन ऊस नोंदणी
उद्देश शेतकऱ्यांना घरबसल्या सहज ऊस नोंदणी करता यावी आणि त्यांच्या वेळ आणि पैशाची बचत व्हावी
नोंदणी करण्याची पद्धत ऑनलाइन
ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.neml.msp.selffarmerregistration

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जेल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइट ला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज