atal bandhkam kamgar gharkul yojana | अटल बांधकाम कामगार घरकुल योजना |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण अटल बांधकाम कामगार घरकुल योजना (atal bandhkam kamgar gharkul yojana) याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे असे वाटत असते. प्रत्येकाचे ते स्वप्न च असते की आपल्या डोक्यावर हक्काचे पक्के छप्पर असावे. राहण्यासाठी पक्का निवारा असावा. पण काही जणांच्या आर्थिक परिस्थिती मुळे ते त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहते. पण अटल बांधकाम कामगार घरकुल योजना तुम्हाला तुमचे हे स्वप्न पुर्ण करुन देणार आहे. अटल ही घरकुल योजना ग्रामीण 2023 ही प्रधानमंत्री आवास योजना यांचा ” सर्वासाठी घरे ” या धोरणावर आधारित आहेत .

Atal Bandhkam Kamgar Gharkul Yojana 2024 – ya लेखात आपण अटल बांधकाम कामगार घरकुल योजना नक्की काय आहे? यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, अटल बांधकाम कामगार घरकुल योजना पासून मिळणारा लाभ, कागदपत्रे, अर्ज कसा करायचा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अटल बांधकाम कामगार घरकुल योजना नक्की काय आहे

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडे नोंदणीकृत ग्रामीण कामगारासाठी Atal Bandhkam Kamgar Gharkul Yojana सुरु केली आहेत. या योजनेला मान्यता आणि अर्थसहाय्य देण्यास मान्यता दिलेली आहे. बांधकाम कामगार व असंघटीत कामगाराचे कच्चे घरांचे रुपांतर पक्के घरात करण्यासाठी या कल्याणकारी मंडळातर्फे 1 लाख 50 हजार रुपये आर्थिक मदत किंवा अनुदान दिले जाणार आहे. तसेच महात्मा गांधी राष्टीय रोजगार हमी योजनेचे 18 हजार रुपये व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय साठी 12 हजार रुपये असे एकूण 30 हजार रुपये या मध्ये समाविष्ट आहेत. तसेच स्वत:ची जागा नसल्यास 50 हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत जागा खरेदी साठी केली जाणार आहेत

नियम व अटी

 • कामगाराकडे स्वताची जागा असणे किंवा कच्चे घर असणे गरजेचे आहे जेणेकरून योजनेचे घर तेथे बांधू शकेल. ( स्वत:ची जागा नसल्यास जागा खरेदी साठी 50 हजार रुपयांची मदत देखील दिली जाऊ शकते)
 • बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ येथे नोंदणीकृत असला पाहिजे.
 • इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • पात्र ठरलेल्या कामगारांनी कमीत कमी 269 चौरस फुट इतके चटई क्षेत्र असलेले बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर ते स्वखर्चाने करावे लागेल.
 • कामगार हा महाराष्ट्र बांधकाम मंडळ मध्ये 1 वर्षा पेक्षा अधिक दिवस सक्रीय कामगार असावा.
 • अर्जदाराचे कमीत कमी वय 18 आणि जास्तीत जास्त वय 60 वर्ष असावे.
 • लाभार्थीने वर्षभरात कमीत कमीत 90 दिवस काम कलेले असावे.
 • अर्जदाराच्या पत्नी अथवा पती च्या नावावर पक्के घर , सिमेंट वाळू चे घर नसावे.
 • कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय ) कामगार हा प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.
atal bandhkam kamgar gharkul yojana

किती अनुदान मिळणार

अटल बांधकाम कामगार घरकुल योजना ( Atal Bandhkam Kamgar Gharkul Yojana Marathi ) या योजनेत 1 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत

bandhkam kamgar gharkul yojana documents

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • सक्षम प्राधिकरण अधिकारी ने नोंदीत बांधकाम म्हणून दिलेले प्रमाणपत्र
 • मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र
 • 7/12 ( असेल तर)बँक पासबुक ची प्रत
 • मोबाईल नंबर
 • फोटो
 • आधी कुटुंबाकडे पक्के घर नाही याचे शपथपत्र

अर्ज कसा करावा

अटल बांधकाम कामगार घरकुल योजना साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल

 • अर्ज हा विहित केलेल्या नमुन्या मध्ये भरून सर्व कागदपत्र सोबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडे सादर करायचा आहेत. अर्ज या https://mahabocw.in/ अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करा आणि भरून मंडळ कडे जमा करा, या नंतर अर्जाची छाननी होईल आणि पात्र लाभार्थी ची यादी लावण्यात येईल.

atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 | अटल बांधकाम कामगार आवास योजना 2023 | 1 लाख 50 हजार अनुदान | बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे | atal bandhkam kamgar gharkul yojana marathi | atal bandhkam kamgar gharkul yojana 2024 | अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024