नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Apaar ID Card अपार आयडी कार्ड One Nation One Card बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.
Apaar ID Card In Marathi
मित्रानो, अपार कार्ड Apaar ID Card यालाच One Nation One Card म्हणून ओळखले जाते. हे कार्ड देशातील सर्व विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामध्ये देशातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती जसे की शिष्यवृत्ती, पुरस्कार, पदवी त्यासोबतच इतर माहिती अपार आयडी कार्ड मध्ये डिजिटली हस्तांतरित केली जाणार असल्याने त्याला लाभ विद्यार्थ्याना होणार आहे.
आर टी ई प्रवेश 2024 मध्ये झाला मोठा बदल, पहा येथे
देशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी Unique I’d क्रमांक तयार करण्यासाठी रस्थिय शैक्षणिक धोरण NEP 2020 च्या अनुषंगाने शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने Apaar ID Card अपार आयडी कार्ड तयार केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी कार्ड चा उपयोग?
Apaar ID Card Information In Marathi
या अपार आयडी कार्ड अंतर्गत आपली शिक्षणीक माहिती जसे की पल्या पदव्या, आपले पुरस्कार, मिळालेली शिष्यवृत्ती त्यासोबतच आणखीन काही शैक्षणिक माहिती यामध्ये डिजिटली साठवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांसोबत च शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मिळवणे सोपे होणार आहे.
अपार आयडी कार्ड म्हणजे काय?
शिक्षण मंत्रालय भारत सरकारने विद्यार्थ्यांसाठी Unique I’d Card तयार केले आहे. जे की आधार कार्ड सोबत लिंक असणार आहे. ज्याला Automated Permanent Academic Account Registry (Apaar) असे नाव दिले गेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती साठवली जाणार आहे.
अपार आयडी कार्ड चे फायदे?
Apaar ID Card Benefits
- सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड अपार क्रमांक द्वारे ट्रक केले जातील.
- त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, निवासस्थान, लिंग, शिष्यवृत्ती, शालेय कर्ज, खेळाडू पुरस्कार, सन्मान इतर माहितीचा समावेश आहे.
- शैक्षणिक आणि परीक्षेचे निकाल, आरोग्य कार्ड, निकाल, आणि ऑलिम्पियाड रँकिंग व विशेष कौशल्य या सारख्या अभ्यासक्रम बाहेरील कामगिरीनसह विद्यार्थ्यांचा डेटा अपार आयडी मध्ये संग्रहित केला जाईल.
- विद्यार्थ्याना अपार आयडी निर्मित Digilocker खाते प्राप्त होईल.
- यामध्ये विद्यार्थ्याना देशातील कोठेही नवीन शाळेत स्वीकारणे सोपे होईल.
- अपार आयडी कार्ड हे विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी ओळखपत्र म्हणून काम करते.
- यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि सिद्दी यांचे निरीक्षण करणे सोपे होते.
अपार आयडी कार्ड रजिस्ट्रेशन कसे करावे?
Apaar Id Registration
- अपार आयडी कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
- वेबसाईट वरती आल्यावर तुम्हाला Sign In करावे लागेल.
- आता तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
- आता तुमच्या मोबाईल क्रमांक वरती OTP येईल ती OTP खालील रकान्यात समाविष्ट करा.
- आता युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- त्यानंनतर शेवटी आधार कार्ड टाकून व्हरिफाय करून घ्या.
अपार आयडी कार्ड Download कसे करावे?
- अपार आयडी कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला www.abc.gov.in/ या संकेतस्थळावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला APAAR कार्ड डाऊनलोड हा पर्याय शोधावा लागेल.
- आता तुम्हांला त्या पर्याय मध्ये डाऊनलोड हा पर्याय किंवा प्रिंट हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
- अशा पद्धतीने तुम्ही अपार आयडी कार्ड डाऊनलोड करू शकता.
आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
Apaar ID Card | apaar card | one nation one student id card apaar card | apaar card full form | apaar card registration Online | apaar card for students | apar card apply |