Annasaheb Patil Loan | आणासहेब पाटील कर्ज योजना

खुल्या प्रवर्गातील तरुणांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी कर्ज

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण ध्ये यपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वर आणासाहेब पाटील कर्ज योजना ( Annasaheb Patil loan) बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. राज्यातील वाढत जाणारी बेरोजगारी पाहता मराठा समाजातील बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून तसेच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा ह्या हेतूने आण्णासाहेब पाटील आर्थिक कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय झाला. या योजेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना अगदी सहज सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासोबत या महामंडळातर्फे घेतलेल्या कर्जाचे व्याज स्वतः महामंडळ भरते. या योजनेतून आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या तरूण वर्गाला नविन रोजगाराची संधी निर्माण होईल

Annasaheb Patil loan : आपण आज या लेखात आण्णासाहेब पाटील कर्ज योजना नक्की काय आहे, या योजनेचा खरा उद्देश काय आहे, आण्णासाहेब पाटील कर्ज योजना ची वैशिष्टये, यापासून मिळणारा लाभ, यासाठी लागणारी अचूक पात्रता, तसेच आण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी अर्ज कसा करावा, काय कागदपत्रे लागतील या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा लेख वाचून नक्की मिळतील तरी वाचक मित्रांनो हा लेख तूम्ही नक्की वाचा.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना नक्की काय आहे

भारत देश हा जास्त तरूण लोकसंख्या असलेला देश म्हणुन ओळखला जातो पण भारतातल्या जास्तीत तरूण हे बेरोजगार आहेत हे तुम्हाला माहिती असेलच. बेरोजगारी सारख्या मोठ्या समस्येतून तरुणांना बाहेर काढण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना उद्योग करण्यास प्रवृत्त करण्यासाठी सरकारने राबवलेली एक योजना म्हणजे आण्णासाहेब पाटील कर्ज योजना. Annasaheb Patil loan अंतर्गत सरकार राज्यातील तरूण वर्गाला सहज सोप्या पद्धतीने कर्ज मिळवून देणार आहे.

आण्णासाहेब पाटील मंडळामार्फत 3 प्रकारच्या योजना राबवल्या जातात
  1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
  2. गट कर्ज व्याज परतावा योजना
  3. गट प्रकल्प कर्ज योजना

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • अर्ज करणाऱ्या पुरूषांचे वय जास्तीत जास्त 50 वर्षे असावे (50 वर्षापेक्षा जास्त नसावे)
  • आणि महिलांची जास्तीत जास्त वयोमार्यादा 55 वर्षे इतकी असावी
  • महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही

योजनेपासून मिळणारा लाभ

  • आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत केली जाते
  • या योजनेअंतर्गत जर लाभार्थीनी वेळेत कर्जाचे हप्ते फेडले तर त्यातील व्याजाची 12 टक्के रक्कम लाभार्थी च्या बँक खात्यात प्रती महिना जमा करण्यात येतील
  • ज्या लाभार्थी चे वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी आहे अशा नागरीकाना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो
  • या महामंडलामार्फत बिनव्याजी कर्ज दिले जाते
  • आण्णासाहेब पाटील कर्ज योजना राज्यातील बेरोजगार युवकाना व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देते

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना उद्दिष्ट्ये :

  • राज्यातील नागरिकांना रोजगारासाठी सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे
  • आर्थिक परिस्थितीने गरीब असणाऱ्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे
  • आर्थिकद्रुष्ट्या मागास असलेल्या युवकाना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे
  • राज्यातील बेरोजगार तरुणांचे जीवनमान सुधारणे
  • राज्यातील तरुणाना त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणे
  • पैशांच्या अभावी बेरोजगार राहणाऱ्या तरूणांची संख्या कमी करण्यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू करण्यात आली

योजनेसाठी असणारे नियम

  • आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकदाच घेता येईल
  • अर्ज करताना उद्योग आधार प्रत अपलोड करणे आवश्यक आहे
  • दिव्यंग नगरिकांकडे त्यांचे दिव्यंग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे
  • गट प्रकल्प योजनेअंतर्गत उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराने याआधी कोणत्याही महामंडळाचा लाभ घेतलेला नसावा
  • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा
  • जर लभार्थीनी नियमित कर्जाची परतफेड नाही केली टर त्यांना व्याज परतावा दिला जाणार नाही
  • अर्जदाराने व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असेल तर कर्ज फेडीचा हप्ता हा मासिक असणे अनिवार्य आहे

आवश्यक कागदपत्रे :

ऑनलाइन अर्ज करताना लागणारी कागदपत्रे :

  1. आधार कार्ड
  2. पॅनकार्ड
  3. पासपोर्ट आकाराचे फोटो
  4. प्रकल्प अहवाल
  5. उत्पन्नाचा दाखला (8 लाख पेक्षा कमी)
  6. वयाचा पुरावा
  7. जातीचे प्रमाणपत्र
  8. मोबाईल क्रमांक
  9. ईमेल आयडी

बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • राशन कार्ड
  • वीज बिल.
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • सिबील रिपोर्ट
  • उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना
  • बँक खात्याचा तपशील
  • व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र

व्याज परतावा साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना.
  • बँक तपशील
  • व्यवसायचा फोटो.
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल.
  • बँकेचे कर्ज मंजुरी पत्र

Annasaheb Patil Loan अर्ज कसा करावा

  1. तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
  2. वेबसाईटच्या होम पेज वरती आल्या नंतर तुम्हाला तिथे नोंदणी वरती क्लिक करावे लागेल
  3. त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी साठी माहिती विचारली जाईल ती भरायची आहे
  4. सर्व माहीती भरून झाल्यावर next बटण वरती क्लिक करा
  5. आता तुम्हाला एक युजर नेम आणि पासवर्ड दिला जाईल तो टाकून तुम्ही लॉगिन करायचे आहे
  6. लॉगिन झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी वरती क्लिक करावे लागेल
  7. त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची निवड करा
  8. आता तूमची व्यक्तिगत माहिती भरा
  9. त्यानंतर तुमच्या ग्रुप किंवा कंपनीचा तपशील भरा
  10. आणि तुम्हाला विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा
  11. आता सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल
  12. अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

Annasaheb Patil Loan Overview :

योजेनचे संपूर्ण नाव अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
कोणी सुरू केली महाराष्ट्र शासन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य नागरिक
लाभ 10 लाख ते 50 लाख आर्थिक साहाय्य
श्रेणी राज्य सरकारी योजना
उद्देश बेरोजगाराना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट https://udyog.mahaswayam.gov.in/

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज

Annasaheb Patil Mahamandal Loan Process | Annasaheb Patil Loan Scheme | Annasaheb Patil Karj Yojana | Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan Scheme | annasaheb patil business loan | annasaheb patil | Annasaheb Patil Loan | Annasaheb Patil Mahamandal Loan Scheme | Annasaheb Patil Karj Yojana | Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan Scheme | Annasaheb Patil | Annasaheb Patil Mahamandal | Annasaheb Patil Loan | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ | Annasaheb Patil Yojana | Mahaswayam | आण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamandal Yojana | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Mahamandal Loan Scheme | Annasaheb Patil Mahamandal Loan Process | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ | Annasaheb Patil Yojana | Mahaswayam | आण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamandal Yojana | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना |