Post Office Accident Insurance Cover | पोस्ट ऑफीस दुर्घटना योजना |

10 लाख पर्यंतचा विमा फक्त 396 रुपयात

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण पोस्ट ऑफिस च्या एका अपघाती विम्या बद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे पोस्ट ऑफिस दुर्घटना योजना (Post Office Accident Insurance Cover). भारतीय पोस्ट ऑफिस आणि बजाज फायनान्स कंपनीने विमा क्षेत्रातील एक महत्वाची क्रांतिकारी योजना सुरू केली आहे. केवळ 396 रुपयांच्या वार्षिक प्रीमियम वर पॉलिसी धारकास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळेल. पोस्ट ऑफिस च्या या योजनेचा देशातील गरीब आणि गरजू लोकांना मोठा फायदा होणार आहे. अत्यंत कमी खर्चात आपल्याला जास्तीत जास्त रूपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. भारतीय टपाल विभागाची सुरक्षितता आणि विश्वास या विमा योजनेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Post Office Accident Insurance Cover : आज आपण आपल्या वेबसाईट वर पोस्ट ऑफीस दुर्घटना योजना बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. म्हणजेच आपण पोस्ट ऑफिस अपघाती विमा नक्की काय आहे, पोस्ट ऑफिस अपघाती विम्यातुन काय आणि किती संरक्षण मिळते, या योजनेची ठळक वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, आवश्यक पात्रता, पोस्ट ऑफिस दुर्घटना योजना साठी आवश्यक कागदपत्रे या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तरी Post Office Accident Insurance Cover ची सर्व माहिती हा लेख वाचून नक्की घ्या.

Post Office Accident Insurance Cover

पोस्ट ऑफिस दुर्घटना योजना नक्की काय आहे

भारतीय पोस्ट ऑफिस आणि बजाज फायनॅन्स कंपनीने विमा क्षेत्रातील एक महत्वाची योजना सुरू केली आहे. यातून केवळ 396 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर पॉलिसीधारकास 10 लाख रुपायांपर्यंतचे विमा संरक्षण मिळेल. ही योजना 18 ते 65 वयोगटातील नागरिकांसाठी असून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ प्रत्येक व्यक्ती ने घेतला पाहिजे. योजनेची चांगली अमलबजावणी करण्यासाठी पोस्टल खाते आणि बजाज फायनॅन्स विमा कंपनीशी करार केला आहे. वैयक्तिक अपघात विम्याबद्दल लोकाना फारच कमी माहिती असते. सामान्य जीवन विमा पॉलिसी मृत्यूमुळे होणारे नुकसान कव्हर होते. मोठ्या हॉस्पिटल पासून होणारा खर्च वाचण्यास मदत होईल.

पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे कमीतकमी वय 18 वर्ष असावे तसेच जास्तीत जास्त वय 65 वर्षे असावे
  • उमेदवार IPPB खातेधारक असणे आवश्यक आहे

पोस्ट ऑफिस दुर्घटना योजना पासून मिळणारा लाभ

  • व्यक्ती अवघ्या 299 किंवा 399 रुपयांच्या हप्तामध्ये एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकते.
  • यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू (Accidental Death), अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल.
  • याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल.
  • त्याचबरोबर रुग्णालयाच्या खर्चासाठी (Hospital Expenditure) 10 दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील.
  • कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्च ही मिळणार आहे.
  • अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी 5 हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम देण्यात येणार आहे.

पोस्ट ऑफिस दूर्घटना योजना वैशिष्ट्ये

  • Post Office 396 Insurance Scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच विमा करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये Saving Account असणे गरजेचे आहे.
  • जर कोणाजवळ खाते नसेल तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन लवकरात लवकर या विमा योजनेचा लाभ घ्या.
  • 18 ते 65 वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घ्यावा.
  • यासाठी पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांद्वारे लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्येक डाक घरामध्ये ही मोहीम चालू केली गेली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल.
  • या योजनेअंतर्गत माणसाला कोणत्याही प्रकारचे दुर्घटना मध्ये मृत्यू, करंट लागणे, वीज पडणे, घसरून पडणे इत्यादी दुर्घटना यात आहे.
  • भारतीय डाक घरामध्ये ग्रामीण डाक सेवक द्वारे प्रत्येक क्षेत्रामध्ये ही योजना प्रत्येक लोकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे.
  • Post Office Special Offer Scheme या policy अंतर्गत आता मात्र 258 रुपये किंवा 396 रुपये प्रति वर्ष च्या Premiam वर लोकांना दहा लाखाचा पर्सनल एक्सीडेंट कवरेज मिळेल.
  • दवाखान्यात भरती झाल्यावर 60000 पर्यंत आणि एक्सीडेंटल ओपीडीच्या प्रकरणांमध्ये 30000 रुपये पर्यंत claim व विमा करणाऱ्या व्यक्तींची मृत्यू झाल्यास पाच हजार रुपये अंतिम दहन साठी प्रदान केले जाईल.
  • इतकच नाही तर या योजने मध्ये 10 टक्के रक्कम किंवा 1 लाख रुपयांचा मुलांचा शिक्षण बोनस कव्हर द्वारे दोन मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा लाभ ही दिला जातो.
  • या योजनेचा लाभ घेतलेल्या लोकाना पूर्ण विकलांगता आणि आंशिक विकलांगता किंवा लकवा ग्रस्त झालेल्या व्यक्तींना दहा लाखांचा विमा प्रदान केला गेला आहे.
  • ही Policy 1 वर्षात समाप्त करू शकतो. ही एका वर्षाची पॉलिसी आहे आणि ही समाप्त झाल्यानंतर ग्राहक कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या पॉलिसीला अजून एक वर्षासाठी नवीनीकरण करू शकतो.

अर्ज कसा करावा

  • तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे इंडिया चार पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे.
  • जर खाते नसेल तर तुम्ही नव्याने खाते काढून या योजनेचा लाभधारक होऊ शकता.
  • तुमच्या जवळ फक्त काही आवश्यक गोष्टी लागतील
  • त्या म्हणजे मोबाइल क्रमांक, ईमेल, आधार कार्ड, तुम्ही स्वत: आणि वारसाची जन्मतारीख
  • या सर्व गोष्टी असतील तर ग्रामीण डाक सेवक तुम्हाला त्वरित विमा काढून देतील

Post Office Accident Insurance Cover साठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • IPPB कार्ड (396 रुपये शिल्लक बॅलेन्स असावा)
  • मोबाइल क्रमांक
  • ईमेल
  • वारसदाराचे नाव
  • वारसदाराची पूर्ण जन्मतारीख

299 आणि 396 च्या योजनेतील फरक काय आहे

  • दोन्ही योजना सारख्याच आहेत. तरी त्यामध्ये काही मूलभूत फरक आहे.
  • 399 च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना 1 लाखांपर्यंतची मदत ही शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपघातानंतर दवाखान्यात येण्या जाण्यासाठी कुटुंबीयांना 10 दिवसांपर्यंत प्रतिदिन 1 हजार रुपये मिळतील. तसेच 25 हजार रुपये वाहतूक खर्च व मृत्यूनंतर 5 हजार अंत्यसंस्कार खर्च मिळेल
  • पण 299च्या योजनेला शिक्षण खर्च, प्रतिदिन 1 हजार, वाहतूक खर्च 25 हजार व अंत्यसंस्कार खर्च 5000 लागू नाहीत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज

Post Office Accident Insurance Cover | पोस्ट ऑफिस अपघाती विमा | Post Office Accident Insurance Cover Marathi | पोस्ट ऑफिस अपघाती विमा | Post Office Accident Insurance Cover apply | पोस्ट ऑफिस अपघाती विमा मराठी | Post Office Accident Insurance Scheme | Post Office Accident Insurance Scheme marathi | Postal life insurance | पोस्ट ऑफिस दुर्घटना योजना | पोस्ट ऑफिस दुर्घटना स्कीम