Aantarjatiy Vivah Yojana | आंतरजातीय विवाह योजना

आंतरजातीय विवाह करणाऱ्यास आता मिळणार 3 लाख

हाय हेलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण एका वेगळ्या आणि विशेष योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत ज्याच नाव आहे आंतरजातीय विवाह योजना (Aantarjatiy Vivah Yojana). आत्तापर्यंत आपण अनेक योजनांची माहिती घेतली ज्या योजना महिलांसाठी, शेतकरी वर्गासाठी, कमी उत्पन्न असलेल्या वर्गासाठी, मुलींसाठी, बेरोजगारांसाठी, अपंगांसाठी, विधवा महिलांसाठी होत्या पण आंताजातीय विवाह करणाऱ्या लोकांसाठी पण एक योजना आहे हे तुम्हाला माहिती आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. आज आपण या लेखात आंतरजातीय विवाह योजना बद्दल सर्व माहिती घेणार आहोत

Aantarjatiy Vivah Yojana : शासन आपल्या विकसासाठी, प्रोत्साहनासाठी, प्रेरणा देण्यासाठी, आथिर्क साहाय्य प्रदान करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातील आंतरजातीय विवाह योजना नक्की काय आहे, यापासून मिळणारा लाभ फायदे, Aantarjatiy Vivah Yojana ची ठळक वैशिष्ट्ये, यासाठी लागणारी पात्रता, नियम तसेच अर्ज कोठे आणि कसा करायचा त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात दिली जाणार आहे. तरी सर्व माहिती घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा

Aantarjatiy Vivah Yojana

आंतरजातीय विवाह योजना काय आहे

समाजात अस्पृश्यता निवारण करण्यासाठी, जाती भेद कमी करण्यासाठी आणि विशेष म्हणजे आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आंतरजातीय विवाह योजना सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे समाजातील जाती बद्दल असणारा भेदभाव नष्ट होईल, माणुसकी हा एकच धर्म लोक मानू लागतील अशा हेतूने शासनाने ही खास आणि नावीन्यपूर्ण प्रयोग समाजात आणण्याचा विचार केला आहे. योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50000/- रुपये प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते. तसेच जर विवाह करणाऱ्या जोडप्या पैकी एक व्यक्ती अनुसुचित जाती किंवा दलित प्रवर्गातील असेल तर त्या जोडप्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये रक्कम प्रोत्साहन स्वरूपात दिली जाते.

Aantarjatiy Vivah Yojana वैशिष्टये :

  • आपल्या देशात अजूनही काही भागात जात धर्म पाळले जातात, अजूनही जाती धर्मावरून दंगे होतात, तसेच आंतरजातीय विवाहाला देखील बऱ्याचदा खूप ठिकाणी विरोधच होत आहे.
  • लोकांच्या जात धर्माबद्दलच्या समजुती विचार अजूनही बदलले नाहीत. आणि हेच बदल घडवून आणण्यासाठी, जातीभेद नष्ट करण्यासाठी सरकारने आंतरजातीय विवाह योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • अनुसुचित जाती मधून बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्या नागरिकांना अनुसुचित जातीचा दर्जा मिळावा या हेतूने केंद्र शासनाने घटना आदेश 1950 मध्ये सुधारणा करून अनुसुचित जाती संदर्भात घटना आदेश बौध्द धर्माला लागू केल्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अनुसुचित जातीची यादी हिंदू किंवा शीख किंवा बौध्द धर्मियांनाही लागू केला आहे. त्यामुळे अनुसुचित जातीच्या व्यक्ती या योजनेच्या सवलती मिळण्यास पात्र ठरलेल्या आहेत.

आंतरजातीय विवाह योजना पासून मिळणारे लाभ

Aantarjatiy Vivah Yojana पासून मिळणारे लाभ खालीलप्रमाणे

  • या योजने अंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50000/- रुपये प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते.
  • तसेच जर विवाह करणाऱ्या जोडप्यापैकी एक व्यक्ती म्हणजेच मुलगा किंवा मुलगी अनुसुचित जाती किंवा दलित प्रवर्गातील असेल तर त्या जोडप्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये रक्कम प्रोत्साहन स्वरूपात दिली जाते.

आंतरजातीय विवाह योजना साठी पात्रता आणि नियम

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • विवाहित जोडप्यापैकी एक जण अनुसूचीत जाती/ जमातीचा किंवा मागास प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे
  • केवळ अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल ज्यांचा विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत झाला असेल
  • लाभार्थ्यांना कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे
  • अर्जदाराने जर या आधी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार व्दारे एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत या योजनेसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे

योजनेची उद्दिष्ट्ये

  • आपल्या देशात होणारा जात धर्म भेदभाव नष्ट करुन सर्वांना समान हक्क देण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाह योजना सुरू केली आहे
  • या योजनेतून आंताजातिय विवाह योजनेस होणारा विरोध कमी करून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले जाणार आहे
  • जाती धर्म भेदभाव नष्ट करणे
  • नव्या जोडप्याला आंतरजातीय विवाह केल्याबद्दल प्रोत्साहन देणे
  • जोडप्याला आर्थिक साहाय्य प्रदान करणे
  • प्रत्येक धर्माला समान हक्क देणे आणि समान स्थान देणे

आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज कसा करावा

ऑनलाईन पद्धत :

  • सर्वप्रथम लाभार्थी जोडप्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला (https://sjsa.maharashtra.gov.in/) भेट द्या
  • होम पेज वर गेल्यावर आंतरजातीय विवाह योजना दिसेल त्यावर क्लिक करा
  • आता एक नविन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल
  • त्यासाठी तुम्हाला विचारलेली सर्व माहिती जसे की मुलाचे संपूर्ण नाव, मुलीचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, जात, लग्नाची तारीख, आधार क्रमांक अशी सर्व माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घ्या
  • आता सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा
  • आणि अर्ज सबमिट करा, अश्या प्रकारे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करता येईल.

ऑफलाईन पद्धत :

  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीने सर्व प्रथम जवळचा जिल्हा कार्यालयाला भेट द्या
  • तेथून Aantarjatiy Vivah Yojana चा अर्ज घ्या किंवा खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या
  • आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरा
  • सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा
  • आणि अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा
  • अशा प्रकारे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • लाभार्थी विवाहित जोडप्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • वार्षिक उत्पन्न दाखला
  • कोर्ट लग्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे मुलगा आणि मुलगी चे फोटो
  • lलाभार्थी विवाहित जोडप्यापैकी एक जण अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, किंवा मागास प्रवर्गातील असल्याचा दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • ईमेल
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्र
  • वधू वराचा शाळा सोडल्याचा दाखला
  • वधू वराचे एकत्रित कलर फोटो
  • राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असणे आवश्यक
  • बँक खाते आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक

योजेनचे संपूर्ण नाव आंतरजातीय विवाह योजना (Aantarjatiy Vivah Yojana)
कोणी सुरू केली केंद्र शासन/महाराष्ट्र शासन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ 3 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम
श्रेणी राज्य सरकारी योजना
उद्देश समाजातील जात धर्म भेदभाव नष्ट करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट https://sjsa.maharashtra.gov.in/

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज