मोफत पिठाची गिरण योजना 2023 | Mofat Pithachi Giran Yojana |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्या साठी मोफत पिठाची गिरण योजना (Mofat Pithachi Giran Yojana 2023) या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि मुफ्त आटा चक्की/ पिठाची गिरण मिळवण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा. या लेखात आपण मोफत पिठाची गिरण योजना नक्की काय आहे, याचे काय फायदे आहेत, काय लाभ मिळेल, पात्रता, अटी नियम आणि अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे अश्या तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेणार आहे.

महाराष्ट्र शासन महिलांसाठी वेगवेगळ्या फायदेशीर योजना राबवत असतेच आणि त्यातून महिलाना फायदाच होत असतो. महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने अशीच एक योजना सुरू केली आहे. या विभागाने महिलांच्या उद्योग करण्याच्या स्वप्नानाना दिशा मिळावी, त्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनाव्या म्हणून महिलाना मोफत पिठाची गिरण योजना 2023 या माध्यमातून पिठाची गिरण कमी किमतीत देण्याचा निर्णय घेतला आहे. Free Flour Mill Scheme ही एक अशी योजना आहे ज्यातून महिला स्वतचे एक उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतात ज्यामुळे त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही .

Free Flour Mill Scheme 2023 | Free Flour Mill Yojana 2023 | Mahila yojana 2023 | महिला उद्योगासाठी मिळणाऱ्या योजना | Mofat Pithachi Giran Yojana | मोफत पिठाची गिरण योजना

मोफत पिठाची गिरण योजना 2023

मोफत पिठाची गिरण योजना 2023 नक्की काय आहे

महिलांचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाची गिरण योजना 2023 ही एक खास योजना सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून ही राबवण्यात येत आहे आणि त्याचा लाभही अनेक महिलानी घेतला आहे. विशेष करून ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेमार्फत अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना मोफत पिठाची गिरण मिळणार आहे. सध्या तरी या योजनेचा लाभ शहरातील गरजू आणि गरीब महिलांसाठी मिळेल की नाही याची माहिती प्राप्त झालेली नाही

योजनेपासून मिळणारे फायदे

  • Mofat Pithachi Giran Yojana या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी पिठाची गिरण घेण्यासाठी अनुदान सरकार देते
  • पिठाच्या गिरणीच्या कोटशन किंवा एकूण बिलावर तब्बल 90 टक्के सबसिडी दिली जाते
  • उरलेली 10 टक्के रक्कम मोफत पिठाची गिरण योजनेच्या लाभयार्थ्याला भरावी लागेल
  • या पिठाच्या गिरणीचा वापर महिलानी स्वत: चा व्यवसाय सुरू कण्यासाठी करावा, ज्यातून त्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होईल
  • महिलांच्या आत्मनिर्भर आणि सक्षम बनण्याला चालना मिळेल
  • नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील
  • महिलाना समाजात जगण्यासाठी कोणाच्याही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागणार नाही

मोफत पिठाची गिरण योजना 2023 साठी पात्रता

Eligibility Criteria ForMofat Pithachi Giran Yojana

  • मोफत पिठाची गिरण योज चा लाभ फक्त महिलाना घेता येईल
  • Free Flour Mill Scheme साठी अर्ज करणाऱ्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे
  • मोफत पिठाच्या गिरणीचा लाभ घेण्यासाठी सदर लाभार्थी महिलेचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 60 असणे आवश्यक आहे
  • सध्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिला वर्ग च या योजनेसाठी पात्र आहेत
  • तसेच महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलानाच या योजनेचा लाभ घेता येईल
  • ज्या महिलाना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या आर्थिक परिस्थितीने गरीब असणे आवश्यक आहे

अर्ज कसा करावा

Free Flour Mill Scheme या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती खाली दिल्या आहेत. तरी ज्याना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा

  1. मोफत पिठाची गिरण योजना 2023 या योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करता येतो
  2. हा फॉर्म अर्जदाराना आपापल्या गावाच्या ग्रामपंचायत किंवा जिल्हापरिषद येथे अगदी सहज उपलब्ध होईल
  3. जर तुम्हाला हा अर्ज ग्रामपंचायत किंवा जिल्हापरिषद येथे उपलब्ध झाला नाही टर तुम्ही आपल्या जिल्हयासाठीचा अर्जाची प्रत गुगल वर ऑनलाइन देखील सहज मिळेल
  4. ऑनलाइन अर्जाची परत डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा
  5. उपलब्ध झालेल्या अर्ज काळजीपूर्वक आणि बिनचूक भरा
  6. अर्जासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा
  7. आणि भरलेला फॉर्म कागदपत्रासहित जिलहापरिषदे मध्ये जमा करा
  8. संबंधित अधिकारी अर्जाची तपासणी आणि पडताळणी करून तुम्ही Mofat Pithachi Giran Yojana 2023 साठी पात्र आहात की नाहीत हे कळवले जाईल
  9. आपण जर या योजनेसाठी पात्र जळत टर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी मंजूरी मिळेल
  10. पात्र अर्जदाराना पिठाची गिरण योजना 2023 च्या माध्यमातून पिठाच्या गिरणीच्या बिलाच्या किंवा कोटशन च्या 90 टक्के एवढी सबसीडी मिळेल
  11. सदर सबसिडी लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होईल
  12. अशा प्रकारे आपण ऑफलाइन अर्ज करून मोफत पिठाची गिरण योजना 2023 चा अगदी सहज पणे लाभ घेऊ शकता

अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • संबंधित अर्ज
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • लाभार्थी चे पासबुक
  • रेशन कार्ड
  • पीठ गिरण खरेदीचा प्रमाणित अहवाल
  • वर्तमान वीज बिल
  • पासपोर्ट साइज चे फोटो
  • मोबाइल क्रमांक
  • दारिद्र्य रेषे खाली असल्याचा पुरावा
  • व्यवसायासाठी सदर जागेचा 8 अ कहा नमूना

Mofat Pithachi Giran Yojana Overview

योजेनचे संपूर्ण नाव मोफत पिठाची गिरण योजना 2023
कोणी सुरू केली महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण विभाग
विभाग राज्य महिला व बलकल्याण विभाग
लाभार्थी सध्या अनुसूचित जाती आणि जमातीतील गरीब महिला वर्ग
लाभ पिठाच्या गिरणीच्या बिलावर तब्बल 90 टक्के सबसिडी देणे
श्रेणी राज्य सरकारी योजना 2023
उद्देश मोफत पिठाची गिरण देऊन महिलाना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज