Pradhanmantri Suraksha Bima Yojana | प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना मराठी |

Pradhanmantri Suraksha Bima Yojana :- हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. भारत सरकार नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी नवनवीन योजना राबवत असते ज्यातून त्यांना आर्थिक मदत होते. माहितीच्या अभावामुळे बऱ्याच योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही पण आपल्या ध्येयपूर्ती या मराठी वेबसाईट वरती आपण प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही dheypurti.com या आपल्या मराठी वेबसाईटला भेटत राहा.

केंद्र सरकारने 2015 रोजी अत्यंत नाममात्र दरात/ प्रीमियम मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना 2023 सुरू केली. यामध्ये एकदाच माफक प्रीमियम भरून तुम्हाला 1 वर्षा साठीचे विमा संरक्षण मिळते. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे लोकांची आरोग्याविषयीची काळजी आणि गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे आरोग्यासाठीचे साधने, सोयी, योजना आणि विमा या सर्व गोष्टींना लोक प्राधान्य देत आहेत. मात्र विमा उतरवून घेणे प्रत्येकालाच परवडणारी गोष्ट नाही. म्हणूनच भारत सरकारने अगदी कमी किंमतीत प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. किंमत तर कमी आहेच परंतु अजून बरेच फायदे अपल्याला Pradhanmantri Suraksha Bima Yojana यातून मिळतात. त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा

Pradhanmantri Suraksha Bima Yojana

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना नक्की काय आहे

अलिकडे अपघात, तसेच आजार महामारी चे प्रमाण दिवसंदिवस वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस आरोग्याची काळजी घेणे आवश्यक वाटू लागले आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर Pradhanmantri Suraksha Bima Yojana ही एक अशी योजना आहे ज्यातून आपल्याला अपघाती मृत्यू, आंशिक अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व आले तर तब्बल 2 लाख रुपयांचे कवरेज मिळते. त्यासाठी आपल्याल फक्त आणि फक्त 20 रुपयांमध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना उतरवायचा आहे. हा एक अपघाती बिमा आहे

18 ते 70 वयोगटातील लोकांसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत बिमा काढलेल्या व्यक्तीचा त्या संबंधित वर्षात अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला, किंवा कायमचे किंवा आंशिक अपंगत्व आले, डोळे जाणे, पाय जाणे हाथ जाणे यासारख्या काही गोष्टी झाल्या तर त्याला 2 लाख रुपये मिळतील. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना पात्रता काय आहे ?

योजनेस कोणते व्यक्ती पात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण खाली बघुया

 1. PMSBY लाभ घेण्यासाठी सदर व्यक्ति भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
 2. योजने साठी व्यक्तीचे वय 18 ते 70 वर्षाच्या वयोगटातील असणे अनिवार्य आहे
 3. अर्जदाराकडे चालू बँक खाते असावे
 4. अर्जदाराला पॉलिसी प्रीमियमच्या आटो डेबिट साठी एका सहमती पत्रावर सही करावी लागेल
 5. बँक खाते बंद पडले तर पॉलिसी पण बंद होईल
 6. प्रीमियम जमा नाही झाले तर पॉलिसी RENEW होणार नाही

अर्ज कसा करावा (Pradhanmantri Suraksha Bima Yojana/PMSBY)

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेसाठी अर्ज खालील पद्धतीने करता येतो

 1. अर्जदाराला प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर (https://jansuraksha.gov.in/) जावे लागेल
 2. आशिकरुत वेबसाइट वर गेल्यावर होम पेज दिसेल
 3. होम पेज वर Forms चा ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा
 4. पुढच्या पेज वर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा वर क्लिक करा त्यानंतर Application Form वर जा
 5. त्यानंतर Application Form ची PDF येईल ती डाउनलोड करा
 6. त्यामधे तुमची सर्व माहिती जसे की नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल अशी सर्व माहिती बिनचूक भरा
 7. आता लॉग इन वर क्लिक करून पासवर्ड टाकून लॉगिन करा
 8. नंतर तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करा
 9. आणि संबंधित बँकेत भरलेला फॉर्म सबमिट करा , अश्या प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल

वाट कसली बघताय मग आजच करा अर्ज !!

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मोबाइल क्रमांक
 • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 • बँके चे पासबुक
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • संपर्क माहिती
 • नामनिर्देशित तपशील
 • अर्जाचा नमूना
 • जर तुमच्या बचत बँक खात्याशी आधार लिंक नसेल टर अर्जा सोबत फक्त आधार कार्ड परत सबमिट करावी लागेल

प्रधानमंत्री सीरक्ष बिमा योजनेची वैशिष्ट्ये/उदिष्ट्ये :

PMSBY ची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत

 • PMSBY योजनेअंतर्गत मृत्यू किंवा कायमच्या अपंगत्वाच्या बाबतीत 2 लाख रुपये मिळतील
 • जर विमाधारकाला अपघाता दरम्यान अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल
 • या योजनेअंतर्गत प्रीमियम एकदाच भरावा लागतो करण येथे प्रीमियमआटो डेबीट ची सुविधा उपलब्ध आहे
 • अपघाती मृत्यू विमा संरक्षण दरवर्षी नूतनीकरण करण्यायोग्य आहे
 • तुम्ही पॉलिसी सुरू केल्यास दरवर्षी वर्षातून एकदा म्हणजे 30 मे रोजी तुमच्या खत्यातून 20 रुपये कापले जातील

अटी व शर्ती :

 1. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर व्यक्ति भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
 2. PMSBY साठी व्यक्तीचे वय 18 ते 70 वर्षाच्या वयोगटातील असणे अनिवार्य आहे
 3. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे
 4. प्रधानमंत्री सुरक्षा विमाची पॉलिसी खरेदी करताना बँक खाते PMSB योजनेशी लिंक केले जाते
 5. बँक खाते आधार कार्ड लअ लिंक केलेले असावे
 6. व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त खाती असल्यास तो किंवा ती फक्त एकाच बँक खात्याद्वारे योजनेत सामील होऊ शकते
 7. ही योजना फक्त एक वर्षासाठी वैध आहे आणि वर्षाच्या शेवटी तिचे नूतनीकरण केले जाऊ शकते

योजने अंतर्गत काय लाभ मिळतो

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ मिळतो

 • ही एक प्रकारची अपघाती विमा पॉलिसी आहे
 • ज्या व्यक्तीने वीमा केला आहे त्याचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास विम्याच्या रकमेसाठी आपल्याला दावा करावा लागेल
 • प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना ही 1 वर्षासाठी वैध असेल
 • PMSBY योजनेअंतर्गत मृत्यू किंवा कायमच्या अपंगत्वाच्या बाबतीत 2 लाख रुपये मिळतील
 • जर विमाधारकाला अपघाता दरम्यान अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल
 • या योजनेअंतर्गत प्रीमियम एकदाच भरावा लागतो करण येथे प्रीमियमआटो डेबीट ची सुविधा उपलब्ध आहे
 • म्हणजेच तुम्ही पॉलिसी सुरू केल्यास दरवर्षी वर्षातून एकदा म्हणजे 30 मे रोजी तुमच्या खत्यातून 20 रुपये कापले जातील

Pradhanmantri Suraksha Bima Yojana Overview/ PMSBY :

योजेनचे संपूर्ण नाव प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना
राज्य भारत सरकार
विभाग वित्त मंत्रालय भारत सरकार
लाभार्थी देशातील 18 ते 70 वयोगटातील सर्व पात्र नागरिक
लाभ 2 लाख रुपये
श्रेणी अपघाती विमा योजना 2023
उद्देश देशातील आर्थिक स्थितीने गरीब असणाऱ्या नगरीकाना अत्यंत कमी किमतीत विमा संरक्षण उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन किंवा ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट https://jansuraksha.gov.in/

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज