प्रधानमंत्री उज्वला योजना | Ujwala Yojana 2.0 | PMUJ

आता सरकार देणार मोफत गॅस !!!

प्रधानमंत्री उज्वला योजना – हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वरती प्रधानमंत्री उज्वला योजने (PMUJ) बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. या लेखात आपण प्रधानमंत्री मोफत गॅस योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे जसे की ही योजना नक्की काय आहे , याचा काय उपयोग किंवा लाभ आहे आणि तो कोणाला घेता येईल, पात्रता काय असेल, त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, अटी नियम शर्ती , अर्ज कसा आणि कोठे करायचा, आणि या योजनेची प्रमख हेतू किंवा उद्देश काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच लेखात मिळतील. त्यामुळे सर्व माहिती पटकन खाली जाऊन वाचा आणि या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घ्या आणि जे पात्र असतील त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रधानमंत्री उज्वला योजना योजना पोहचवा.

Pradhan Mantri Ujwala Mofat Gas Yojna 2023

प्रधानमंत्री उज्वला योजना मोफत गॅस कनेक्शन 2023

केंद्र तसेच राज्य सरकार दारिद्र्य रेषेखाली असलेल्या वर्गाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत असते ज्याचा त्यांना आर्थिक बाजूने भरपूर फायदा होतो आणि त्यांच्या विकासाला चालना मिळते. यावेळी केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील असलेल्या महिलांसाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना/ प्रधानमंत्री मोफत गॅस कनेकशन 2023 ही योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण आणि अत्यंत लाभदायक निर्णय घेतला आहे. याचा सर्व गरीब महिलांना आर्थिदृष्ट्या बराच फायदा होऊन स्त्रियांना इकासाला चालना मिळेलच शिवाय त्यांच्या आरोग्य ही निरोगी राहील

UjwalaYojana 2.0 नक्की काय आहे

प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात 2016 सालापासून मोदी सरकारने केली. या योजना सुरू करण्याचे कारण गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील वर्गात येणाऱ्या सर्व महिलांना गॅस सिलिंडर चा लाभ सहज घेता यावा. प्रधानमंत्री उज्वला योजनेतून ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि दारिद्य्र रेषेखालील (BPL) येणाऱ्या महिलांना अगदी मोफत दरात गॅस मिळणार आहे.

आत्तापर्यंत सरकारने किती कनेक्शन दिले ?

प्रधानमंत्री उज्वला योजनेतून आतापर्यंत सरकारने तब्बल 9 करोड 60 लाख कनेक्शन दिले आहेत. या योजनेतून सरकार गॅस शेगडी पण मोफत देत आहे शिवाय लाभार्थ्यांना मोफत LPG कनेक्शन सोबतच सिलेंडर ची पाहीली रिफिलिंग सुद्धा मोफत मिळणार आहे.

PMUJ योजनेचा नक्की कोण लाभ घेऊ शकते/ उजवला योजना 2.0 साठी पात्रता काय आहे ?

  • प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात
  • अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे
  • ती महिला दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील असायला हवी आणि तिच्याकडे बीपी एल कार्ड असणे आवश्यक आहे
  • बीपी एल कार्ड सोबत रेशन कार्ड असणे गरजेचे आहे
  • PMUJ लाभार्थी च्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणाच्याही नावावर एल पी जी कनेक्शन नसायला हवे
  • लाभार्थीचे नाव 2018 च्या जनगणनेच्या यादीत असायला हवे

प्रधानमंत्री उज्वला योजनेतून मिळणारे फायदे

Benefits of Ujwala Yojana 2.0

  • योजनेतून सरकार गॅस शेगडी पण मोफत देत आहे
  • लाभार्थ्यांना मोफत LPG कनेक्शन सोबतच सिलेंडर ची पहीली रिफिलिंग सुद्धा मोफत मिळणार आहे.
  • 14.2 किलो सिलेंडर साठी सुरक्षा ठेव 1250/- रुपये तर 5 किलो सिलेंडर साठी सुरक्षा ठेव 800/- रुपये इतकी दिली जाईल
  • प्रेशर रेगुलेटर साठी 150/- रुपये मिळतील
  • एलपीजी नळीसाठी 100/- रुपये मिळतील
  • घरगुती गॅस ग्राहक कार्डसाठी 25/- रुपये दिले जातील शिवाय तपासणी/ मांडणी/ प्रात्यक्षिक शुलकाचे 75/- रुपये मिळतील

उज्वला योजना 2.0 साठी कसा अर्ज करायचा

Hoe to Apply for Ujwala Yojana 2.0

योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीं पद्धतीने आपल्याला करता येईल. प्रधानमंत्री मोफत गॅस योजनेसाठी अर्ज कसा करावा लागेल याची क्रमवारी पद्धत खालील प्रमाणे :

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत-

  1. सर्वप्रथम जवळच्या गॅस केंद्रात जाऊन प्रधानमंत्री उज्वला योजनेचा अर्ज घ्या
  2. अर्जात विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरा
  3. सोबत सांगितलेले सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स जोडा.
  4. आणि अर्ज गॅस केंद्रात जमा करा
  5. सदर भरलेला अर्ज आणि कागदपत्राची तपासणी करून गॅस वितरक केंद्र तुम्हाला मंजुरी देईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत –

  1. सगळ्यात आधी तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
  2. ही आहे अधिकृत वेबसाईट — https://www.pmuy.gov.in/
  3. तिथे गेल्यावर नविन उज्वला योजना 2.0 कनेक्शन साठी अर्ज करा वर क्लिक करा
  4. तिथे तुम्हाला आवश्यक दस्तएवज माहिती दिसेल त्याखाली ऑनलाइन पोर्टल द्वारे हे शब्द दिसतील त्यावर क्लिक करा
  5. आता तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील गॅस वितरक निवडावा लागेल जसे की HP, Bharat
  6. त्यानंतर Type of connection वर जाऊन Ujwala 2.0 New Connection var ja aani तुम्हाला दिलेली सर्व माहिती भरा
  7. New KYC वर जावून Normal KYC वर क्लिक करा आणि आधार नंबर captcha टाकून otp जनरेट करा
  8. त्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती बिनचूक लिहा
  9. नंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा
  10. आणि फॉर्म सबमिट करा अश्या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

List of Ujwala Yojana 2.0 Form Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वाहन चालक परवाना
  • टेलिफोन/वीज/पाणी बिल
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड
  • स्वयं घोषणापत्र
  • लिज आग्रीमेंट
  • पारपत्र
  • लाभार्थी महिलेच्या राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक/ जन धन बँक खात्याचे पासबुक
  • PMUJ लाभार्थी जर अनुसूचित जातीचा असेल तर जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र

PMUJ / Ujwala Yojana 2.0 Overview

योजनेचे नावप्रधानमंत्री उज्वला गॅस योजना (Ujwala Yojana 2.0)
सरकार केंद्र सरकार
श्रेणी केंद्र सरकारी योजना
योजनेची सुरुवात 1 मे 2016
लाभार्थी गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील महिला
उद्देशगरीब महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ एलपीजी सारखे इंधन उपलब्ध करुन देणे
आर्थिक सहाय्य 1600/- रुपये / एलपीजी कनेक्शन
अधिकृत वेबसाईट https://www.pmuy.gov.in/
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन किंवा ऑफलाईन

प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश

  • केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करून स्वच्छ इंधन, बेहतर जीवन असा संदेश आपल्याला दिला आहे जेणेकरून स्त्रिया स्वच्छ इंधनाचा वापर करून आपले आरोग्य सुरक्षित ठेवतील
  • चुली साठी लागणारे लाकूड त्यामुळे जी वृक्ष तोड होत होती ती कमी होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल
  • लाकुड/ गोवऱ्या यापासून निर्माण होणारा धूर कमी होऊन हवेचे प्रदूषण कमी होईल शिवाय स्त्रियांचे आरोग्य निरोगी राहील
  • अश्या प्रकारे अशुद्ध इंधनापासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
  • तसेच गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस मिळून त्यांच्या आर्थिक विकासास देखील चालना च मिळेल

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जेल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइट ला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज

Tags-