हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Swanidhi Yojana 2024 याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पीएम स्वनिधी योजना ही पंतप्रधान स्ट्रीट वेंडरची आत्मानिर्भर निधी योजना आहे. PM Swanidhi Yojana 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 जून 2020 रोजी सुरू झाली. ही एक सूक्ष्म कर्ज योजना आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ अनुदानाच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सुलभ हप्त्यांमध्ये त्याची परतफेड करून घेणे हा आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत छोटी कर्जे दिली जातात. योजनेच्या लाभार्थ्यांना 10 हजार रुपये, 20 हजार रुपये आणि 50 हजार रुपये या तीन हप्त्यांमध्ये परवडणारी कर्ज मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ पथ विक्रेते, भाज्या विक्रेते , फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेचे दुकानदार विक्रेते यांना होणार आहे. तरी गरजू आणि इच्छुक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्या
PM Swanidhi Yojana 2024 In Marathi
आज आपण या लेखात PM Swanidhi Yojana नक्की काय आहे, पीएम स्वनिधी योजनेची ठळक वैशिष्ट्ये, स्वनिधी योजनेची उद्दिष्ट्ये, योजनेपासून मिळणारा लाभ फायदे, पात्रता, PM Swanidhi Yojana साठी अर्ज कसा करावा आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
PM Swanidhi Yojana
महिलांसाठी घरगुती ऑनलाईन जॉब, येथे क्लिक करा
पी एम स्वनिधी योजना नक्की काय आहे
देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि कष्टकरी, गरीब आणि गरजू जनतेला कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या होत्या, केंद्राची पीएम स्वनिधी योजना हीदेखील त्यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत, रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायानुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी लाभार्थीला काहीही तारण ठेवण्याची गरज नाही म्हणजेच तुम्हाला विनातारण कर्ज मिळणार आहे. यामुळे सर्वजण स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकतील तसेच व्यवसाय आधीपासून असलेले आपल्या व्यवसायाचा विस्तार करतील
पीएम स्वनिधी योजना उद्दिष्ट्ये :
- कोरोना महामारी च्या काळात आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले होते कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आणि रोड साइड छोटा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा उद्योग/ व्यवसायच बंद झाला होत्या, कित्येक लोक मरण पावले
- नोकरी गेलेल्या, घरातला कर्ता व्यक्ती मरण पावलेल्याना, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या उद्योजकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
- ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्ट्रीट व्हेंडर सेल्फ-रिलायंट फंड योजना सुरू केली, ज्या अंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या उद्योजकांना पुन्हा काम सुरु करण्यासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेचे मुख्य उद्दिष्ट रस्त्यावर आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक परिस्थितीने सक्षम बनविणे हे आहे. जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कोरोना सारख्या प्रसंग पुन्हा आला तर अशा लोकांची आर्थिक हेळसांड होणार नाही नुकसान झालेल्या लोकांचे नुकसान थोड्या फार प्रमणात भरून निघेल. परिणामी देशही मजबूत राहील
फायदे
- आत्तापर्यंत तीनही हप्त्यामध्ये अंदाजे 70 लाख कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे 53 लाखांहून अधिक व्यवसायिकांना लाभ मिळाला आहे. या सोबतच कर्जाची एकूण रक्कम 9,100 कोटी रुपये आहे.
- पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कोणतीही हमी न देता दहा हजार रुपयांचे कर्ज मिळते.
- विशेषतः फेरीवाल्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. फेरीवाल्यांना कोरोनाच्या काळात मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यांना पुन्हा काम सुरू करण्यासाठी या योजनेद्वारे मदत केली जाते. सरकार या कर्जावर सबसिडी देखील देते.
- जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली तर नंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत दुप्पट रकमेचे कर्ज मिळेल. म्हणजेच कोणत्याही हमीशिवाय तुम्ही आणखी कर्ज घेऊ शकता.
- पीएम स्वनिधी योजनेतील ऐकून 2-65% कर्जदार हे 26 ते 45 वयोगटातील आहेत, एकूण लाभार्थ्यांपैकी 43% महिला आहेत.
- पी एम स्वनिधी योजना शहरांमध्ये काम करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचे काम करते
- तुम्हाला जर 10,000/- रुपये कर्ज पाहिजे असेल तर कोणत्याही हमी शिवाय उपलब्ध होणार आहे. व या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 12 महिन्यांचा राहील.
- जर तुम्ही पहिल्या कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला दुसऱ्यांदा 20,000/- हजार रुपये कर्ज व तिसऱ्यांदा 50,000/- हजार रुपये कर्ज उपलब्ध होऊ शकते. या सोबतच तुम्हाला 1200 रुपयांचा कॅशबॅक ही मिळणार आहे.
स्वनिधी योजना कर्ज देणाऱ्या संस्था:
- सहकारी बँक
- स्मॉल फायनाप्रादेशिक ग्रामीण बँक
- न्स बँक
- मायक्रो फायनान्स संस्था आणि SHG बँका
- बिगर बँकिंग वित्त कंपन्या
लाभार्थी
- भाजी विक्रेता
- कारागीर उत्पादने
- लॉन्ड्री दुकाने (धोबी)
- जोडे दुरस्ती दुकाने मोची
- नाईची दुकाने
- खाण्यासाठी तयार स्ट्रीट फूड
- ब्रेड, डंपलिंग्ज आणि अंडी विक्रेते
- चहा स्टँड
- फळ विक्रेता
- कपडे विकणारे व्यापारी
- पान सुपारीची दुकाने (पानवडी)
आवश्यक कागदपत्रे
विक्रेत्यांना खालीलपैकी कोणतेही एक दस्तऐवज Submit करणे देखील आवश्यक असू शकते
- मतदार ओळखपत्र
- आधार कार्ड
- मनरेगा कार्ड
- पॅन कार्ड
- चालक परवाना
अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत
- प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होम पेज समोर उघडेल.
- तुम्हाला होम पेज वर Planning to Apply for Loan हा पर्याय दिसेल.
- त्यानंतर, कर्ज अर्ज योजनेतील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जा आणि अधिक पहा बटणावर क्लिक करा.
- पुढचे पान तुमच्या समोर येईल. तुम्ही या पेजवर फॉर्म पहा/डाउनलोड करा या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर पीएम स्वानिधी योजनेच्या फॉर्मची PDF ओपन होईल.
- तुम्ही या प्लॅनची PDF डाउनलोड करू शकता. त्यानंतर application डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. माहिती भरल्यानंतर, तुम्हाला अर्जासोबत सर्व महत्वाची कागदपत्रे जोडा.
- यानंतर, तुमचा अर्ज खाली नमूद केलेल्या संस्थांना सादर करा.
ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत
- सर्वात आधी योजनेचा लाभ घण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता.
- बँकेत आल्या नंतर तुम्हाला तेथून पीएम स्वानिधी योजनेचा अर्ज भरावा लागेल.
- योजनेच्या अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून घ्या व सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा.
- त्यानंतर आपल्या तो पल अर्जाची माहिती तपासून तुम्हाला कर्ज वितरित केले जाईल.
- कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कर्जाचे पैसे हप्त्यांमध्ये मिळण्यास सुरुवात होईल.
आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद .
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
PM Swanidhi Yojana in Marathi | PM Swanidhi Yojana | पी एम स्वनिधी योजना | Pradhan mantri Swanidhi Yojana Marathi | पीएम स्वनिधी योजना इन मराठी | PM Swanidhi Yojana form pdf | PM Swanidhi Yojana Form | पीएम स्वनिधी योजना | पी एम स्वनिधी योजना अर्ज | पी एम स्वनिधी योजना यादी | PM Swanidhi Yojana List | Pradhan mantri Swanidhi Yojana | Swanidhi yojana |