MSSC | Mahila Samman Savings certificate |

महिला सन्मान बचतपत्र योजना | सरकारची भरपूर व्याज मिळवून देणारी खास योजना

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण महिला सन्मान बचतपत्र योजना ( MSSC) या बद्दल संपूर्ण माहिती या लेखात देणार आहोत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी खास महिलांसाठी महीला सन्मान बचतपत्र योजना सुरू केली आहे. MSSC या योजनेत महिलांसह मुली देखील लाभ घेऊन जास्त व्याजाचा उपभोग घेऊ शकतील. सरकार वेळोवेळी महिलांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी नवनवीन योजना राबवत असते त्यातीलच 1 फेब्रुवारी 2023 रोजी महिला सन्मान बचतपत्र योजना ही एक सुरू करण्यात आलेली एक जोरदार योजना आहे.

Mahila Samman Saving Certificate (MSSC) – आपल्या मराठी वेबसाईट वर आपण महिला सन्मान बचतपत्र योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. जसे की MSSC योजना नक्की काय आहे, यापासून मिळणारे फायदे, योजनेची वैशिष्ट्ये/ उद्दिष्ट्ये, पात्रता नियम, योजनेपासून मिळणारा लाभ, यासाठी व्याजदर काय असेल तसेच महिला सन्मान बचत पत्रासाठी अर्ज कसा व कोठे करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतील या तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख नक्की वाचा.

MSSC

महिला सन्मान बचत पत्र योजना नक्की काय आहे

1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री 2023 रोजी आपला अर्थसंकल्प सादर केला जात महिला सन्मान बचत पत्र या योजनेची देखील त्यांनी घोषणा केली. MSSC ही एक अशी योजना आहे ज्यातून निश्चित 7.5 टक्के दराने महिलांना त्यांच्या ठेवीवर व्याज मिळणार आहे. ही एक ठेवीची योजना आहे आणि तुम्हाला फक्त 2 वर्षासाठी तुमचे पैसे यात गुंतवावे लागतील. पण यातून मिळणारे फायदे आणि व्याज इतर ठेवी योजनेपेक्षा वेगळे आणि खास आहेत. ज्यातून महिलांना आर्थिक मदतच होईल आणि त्यांची उन्नती होईल. यामध्ये कोणताही धोखा नसल्यामुळे आणि ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे जास्तीत जास्त महिला वर्गाने या योजनेचा लाभ नक्की घ्या.

महिला सन्मान योजनेची वैशिष्ट्ये

जास्तीत जास्त व्याज मिळवून देणाऱ्या महिला सन्मान बचतपत्र (Mahila Samman Savings certificate) याजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीप्रमाणे आहेत

 • ही एक वेळ बचत/ ठेव योजना आहे
 • ही योजना फक्त 31 मार्च 2025 पर्यंतच ऊपलब्ध असणार आहे
 • MSSC वैयक्तिक महीला किंवा मुलींसाठी च उपलब्ध आहे
 • महिला कमीत कमी गुंतवणूक रूपये 1000/- करू शकतात
 • योजनेची जास्तीत जास्त गुंतवणूक एका महिले साठी 20000/- रुपये इतकीच आहे
 • व्याजाचा दर 7.5 टक्के प्रती वार्षिक चक्रवाढ तिमाही आहे
 • जास्तीत जास्त रकमेच्या अधीन म्हणणेच 2लाख रकमे पर्यंत कितीही खाती उघडू शकतात
 • फक्त आधिच्या आणि नविन खात्याच्या मध्ये 3 महिन्यांचे अंतर असणे बंधनकारक आहे
 • खाते उघडलेल्या तारखेपासून 2 वर्षांनी ते परिपक्व किंवा पूर्ण होते (मुदत संपते)
 • MSSC ला फक्त single ची सोय आहे joint/ संयुक्त ची सोय उपलब्ध नाही

गुंतवणुकीची मर्यादा

या योजनेची गुंतवणुकीची मर्यादा एकूण 2 वर्षाची आहे. तुम्ही जर मार्च 2023 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक केली तर तुम्ही या योजनेतून मार्च 2025 पर्यंत पैसे काढू शकता. ही योजना 2 वर्षाची ठेव योजना आहे. 2 वर्षापेक्षा जास्त दिवस यात पैसे ठेवता येत नाही

महिला सन्मान बचत पत्र योजना मध्येच बंद करता येते का?

हो ! Mahila Samman Saving Certificate मध्येच बंद करता येते. म्हणजेच ते 1 वर्षानंतर आपण बंद करू शकतो (1 वर्षाच्या आत नाही). पण 1 वर्षा नंतर मिळणारी रक्कम ही फक्त ठेवीच्या 40 टक्के असेल. पुर्ण रक्कम काढता येणार नाही. तसेच जर तुम्हाला 6 महिन्यातच खाते बंद करायचे असेल तर 2 टक्के कमी व्याज मिळेल. म्हणजेच 5.5 टक्के व्याजाने तुमचा परतावा मिळेल. जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर मात्र तुम्हाला खाते बंद करता येईल

मुदतीनंतर किती पैसे मिळतील

कोणत्या ठेवीवर किती रूपये परतावा मिळेल याची काही उदाहरणे खाली दिली आहेत

 • जर तुम्ही 1000 रूपये गुंतवले तर 2 वर्षानंतर व्याजासहीत मिळणारी रक्कम 1160 रुपये असेल
 • जर तुम्ही 10000 रूपये गुंतवले तर 2 वर्षानंतर व्याजासहीत मिळणारी रक्कम 11604 रुपये असेल
 • जर तुम्ही 50000 रूपये गुंतवले तर 2 वर्षानंतर व्याजासहीत मिळणारी रक्कम 58012 रुपये असेल
 • जर तुम्ही 100000 रूपये गुंतवले तर 2 वर्षानंतर व्याजासहीत मिळणारी रक्कम 116021 रुपये असेल
 • जर तुम्ही 200000 रूपये गुंतवले तर 2 वर्षानंतर व्याजासहीत मिळणारी रक्कम 232044 रुपये असेल

कर लाभ

प्रमाणपत्र योजना आयकर कायदा 1961 या कायद्या अंतर्गत कर लाभासाठी पात्र आहे. ज्यामुळे महिलांना त्यांच्या कर दायित्व वर बचत करता येते

योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे (Mahila Samman Saving Certificate)

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
 • वारसाचे पुर्ण नाव
 • ओळखीचा पुरावा

MSSC साठी अर्ज कसा करावा

 • महिला सन्मान बचत पत्र योजना साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे आणि पैसे घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिस मधे जावे लागेल.
 • तिथे तुम्हाला या योजनेचा अर्ज देतील. ती अर्ज तुम्ही बिनचूक भरा.
 • त्यात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. काही शंका असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना विचारा.
 • अर्जासोबत सांगितलेले सर्व कागदपत्रे जोडा.
 • अर्ज आणि पैसे पोस्ट ऑफिस मध्ये जमा करा

अशा प्रकारे तूम्ही अगदी सहज आणि तात्काळ महिला सन्मान बचत पत्र खाते उघडू शकता.

MSSC Overview :

योजेनचे संपूर्ण नाव महिला सन्मान बचतपत्र योजना (Mahila Smman Saving Certificate)
सुरू कोणी केली केंद्र सरकार
लाभार्थी देशातील सर्व महिला
लाभ ठेवीवर 7.5 टक्के प्रती वार्षिक चक्रवाढ तिमाही व्याज
श्रेणी केंद्र सरकारी योजना 2023
उद्देश महिला आणि मुलीना आर्थिक द्रुष्ट्या सक्षम बनवणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अंतिम वर्ष मार्च 2025

महिला सन्मान बचतपत्र योजना | MSSC | Mahila Smman Saving Certificate | महिला सन्मान बचतपत्र योजना 2023 | MSSC 2023 | महिला सन्मान योजना | Mahila Smman Saving Yojana |

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन कर जेणे करून तुम्हाला नानाविण योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जेल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइट ला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज