हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर विद्यार्थीदशेतच पैसे कसे कमवायचे याबद्दल काही Business Ideas for Students घेऊन आलो आहोत. आजकाल वाढत्या महागाईमुळे पैशाची चणचण किती भासत आहे हे तर सर्वांना माहितच आहे. पण त्यासाठी आपण फक्त खचून जाऊन चालणार नाही. काहीतरी तोडगा यावर आपण काढायला हवा. यावर जर आपण पर्याय शोधला तर आपल्याकडे देखील पैशाची भासणारी चणचण कमी होईल आणि नवीन काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या सर्व गोष्टींचा विचार करून मी विद्यार्थ्यांसाठी काही भन्नाट पैसे कमावण्याच्या idea घेऊन आलो आहे. ज्यातून तुम्ही थोडीफार कमाई करून तुमचा खर्च तुम्ही स्वतः भागवू शकता
Part time Business Ideas : या लेखात आज आपण काही part time Business Ideas बद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजेच काही part time Business ची यादी तुम्हाला या लेखात दिली जाईल. शाळा महाविद्यालयांमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना पॉकेट मनीची गरज भासते. अशा वेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असेल त्यासाठी खास पार्ट टाईम जॉब ची यादी या लेखात तुम्हाला पाहायला मिळेल
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही तुमचे स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू करू शकता
तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनेल काढून पैसे कमवू शकता तुम्ही जर विद्यार्थी आहात, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर, तुमच्या अभ्यासाबद्दल व्हिडिओ बनवून यूट्यूब वर अपलोड करू शकता. तुम्ही तुमच्या करीयर बद्दल तर रोज माहिती काढतच असाल तर ती माहिती देखील तुम्ही चॅनेल वर शेअर करु शकता, तुम्ही चांगले motivator असाल तर इतर विद्यार्थ्यांना यूट्यूब व्दारे motivate करू शकता. तुम्ही असे सारे व्हिडिओ काही वेळात तयार करून चांगली कमाई करू शकता
तुम्ही तुमची स्वतःची शिकवणी चालू करा
तुम्ही शिकवणी घेऊन पैसे कमावू शकता तुम्हाला जर शिकवण्याची आवड असेल तर लहान मुलांची जसे की अंगणवाडी ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची थोडा वेळ शिकवणी घेऊन त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी निर्माण करू शकता, अशाने त्यांनाही फायदा होईल आणि तुम्ही देखील घरबसल्या थोडीफार कमाई करु शकाल तुम्ही ब्लॉगिंग व्दारे पैसे कमावू शकताजर तुमच्यामध्ये लेखनाची आवड असेल आणि तुम्ही जर चांगले लिहू शकत असाल तर ब्लॉगिंग करून म्हणजेच लेख लिहून तुम्ही फावल्या वेळात चांगली कमाई करू शकता
तुम्ही भाषांतर बनून मोठी कमाई करू शकता..!
तुम्हाला भाषांतरात रस असेल तर तुम्ही भाषांतरकार म्हणून काम करू शकता.विद्यार्थीदशेतच तुम्ही विविध प्रकारचे लेख भाषांतर करुन पैसे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे
Handmade Crafts and arts / हस्तकला व्यवसाय
जर आपण एक उत्तम कलाकार असाल आणि तुम्हाला जर तुमच्या वेळेनुसार पैसे कमवायचे असतील तर हा एक उत्तम व्यवसाय आहे , येथे आपण आपल्या आवडीचा क्षेत्रामध्ये पैसे कमावू शकतो .येथे आपण हस्त निर्मित कलाकुसर , घरातील अन्य सजावटीच्या वस्तू, दागिने तयार करून विकू शकतो अश्या हॅण्डमेड वस्तूंना जगभरात मोठं मागणी आहे, आणि या वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हा सध्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगभरात वाढत चाललेला आहे.
योगा क्लासेस चालू करून पैसे कमावू शकता
आजकालच्या वातावरण आणि जीवनशैलीमध्ये वाढत जाणाऱ्या बिघाडामुळे प्रत्येकाची प्रकृती खालावत चालली आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत लोकांचे व्यायाम योगा, निरोगी जीवन याबद्दलचे महत्वव वाढतच चालले आहे त्यामुळे तुम्ही योगा क्लासेस घेउन लोकांचे आरोग्य तर निरोगी ठेवालच त्याबरोबर तुमचाही एक इन्कम सोर्स चालू होईल
तुम्ही घरगुती केक शॉप देखील चालू करू शकता
बिझनेसकेक शॉप चा बिझनेस तर 12 महिने चालणारा आहेत आणि आता वाढदिवस सेलिब्रेट करणारे आणि केक खरेदी करणारे यांची संख्या किती वाढली आहे याबद्दल मी तुम्हाला सांगायची गरजच भासणार नाही
Business Ideas For Students | घरबसल्या करता येणारे व्यवसाय | Business Ideas | top 10 business ideas | part time job | part time business ideas | घरगुती व्यवसाय | घरबसल्या करता येणारे जॉब |