Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजना |

वृद्धपकाळात मिळवा 5000 रुपयांपर्यंत प्रती महिना पेन्शन

Atal Pension Yojana : हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाईट वर अटल पेन्शन योजना बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन गरीब लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, अपंग व्यक्तींसाठी, महिलांसाठी तसेच निराधार नागरिकांसाठी, बेरोजगारांसाठी नवनवीन आणि महत्त्वपूर्ण योजना राबवून देशातील नागरिकांना एक चांगले योगदान च देत आहे. Atal Pension Yojana ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे ज्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी सुरू केली आहे. वृद्ध लोकांसाठी सुरू केलेली अटल पेन्शन ही योजना वृद्ध लोकांना एक निश्चित उत्पन्न सुरक्षा मिळवून देईल.

आज आपण या लेखात अटल पेन्शन योजना बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणजेच आपण आज अटल पेन्शन योजना नक्की काय आहे, अटल पेन्शन योजनेची ठळक वैशिष्ट्ये/उद्दिष्ट्ये यापासून मिळणारा लाभ फायदे, अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा (Atal Pension Yojana apply), यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, तसेच पात्रता नियम अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा जास्तीजास्त लाभ घेऊन आपले भविष्य सुरक्षित करावे. त्यासाठी हा लेख नक्की वाचून घ्या आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील ही खास योजना नक्की सांगा.

Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजना नक्की काय आहे

Atal Pension Yojana ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे ज्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी सुरू केली आहे. अटल पेन्शन योजने अंतर्गत देशातील वयोवृद्ध नागरिकांना उत्पन्न सुरक्षा मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे. विशेषतः गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगारांवर या योजनेचा भर दिला आहे. असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांच्या दीर्घायुषी आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून या असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृतीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करण्यासाठी उद्युक्त करायचे आहे. २०११- १२ च्या NSSO च्या ६६ व्या फेरीत असे निष्पन्न झाले आहे कि असंघटीत कार्यशेत्रातील कामगार हा संपूर्ण कामगारांच्या ८८ % आहे म्हणजे ४७.२९ करोड आहे आणि त्यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.

त्यामुळे सरकारने सर्वाना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन सर्व भारतीयांसाठी जाहीर केली आहे. अटल पेन्शन योजना ज्यात सर्वाना काळ आणि त्यांची वर्गणी नुसार पेन्शन मिळणार आहे. अटल पेन्शन योजना यात वर्गणी दाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात १००० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये, ५००० रुपये ची कायम स्वरूपी वयाच्या ६० व्या वर्षापासून पेन्शन मिळेल, वर्गणी हि अटल पेन्शन योजनेत सामील होण्याच्या वयावर अवलंबून असेल.

अटल पेन्शन योजना फायदे

 • जे वर्गणीदार १८ ते ४० या वयोगटात पासून वर्गणी भरत आहे. त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायम स्वरूपी १००० ते ५००० रुपये प्रती माह पेन्शन वर्गणीदारांना मिळेल.
 • Atal Pension Yojana अंतर्गत तूम्ही जे पैसे जमा करता त्यावर तूम्ही tax deduction घेऊ शकता.
 • जेवढा वर्गणीदार लवकर योजनेत सामील होईल त्याची वर्गणी कमी राहील आणि वर्गणी कमी राहील आणि वर्गणी वयानुसार वाढत जाईल.
 • लाभार्थीचा 60 वर्षापूर्वीच जर मृत्यु झाला तर या योजनेचे सर्व लाभ त्याच्या वारसदाराला किंवा जोडीदाराला मिळतील
 • या योजनेत गुंतवणूकीची रक्कम/ वर्गणी निश्चित नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार रक्कम निश्चित करू शकता.
 • अटल पेन्शन योजना आपण इतर कोणत्याही पोस्ट किंवा बँकेत tranfer करू शकतो

पात्रता

 • अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराचे वय 18 ते 40 वयोगट दरम्यान असावे
 • लाभार्थी इतर कोणत्याही पेन्शन प्रणालीमध्ये समाविष्ट नसावा (जसे की National Pension System)

अटल पेन्शन योजना साठी अर्ज कसा करावा

 • अटल पेन्शन योजना साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफीस शी भेट द्यावी लागेल
 • तिथे अटल पेन्शन योजनेचा फॉर्म घ्या आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती बिनचूक लिहा.
 • तुम्हाला या योजनेत भरावयाची रक्कम निश्चित करा
 • अर्जासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा
 • अशा प्रकारे तूम्ही अगदी सहज पद्धतीने अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता.

पैसे कधी भरावे लागतील

 • या योजनेत तुम्ही महिन्यातून एकदा पैसे भरू शकता
 • किंवा तुम्ही 3 महिन्यातून एकदा पैसे भरू शकता
 • किंवा वर्षातून 2 वेळा म्हणजेच 6 महिन्याला हप्ता जमा करू शकता
 • अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार वर्गणी निश्चित करायची आहे
 • जर तुम्ही एखाद्या महिन्यात काही कारणास्तव पैसे भरले नाहीत तर पुढील महिन्यात दंडसाहित हप्ता भरावा लागेल
 • प्रत्येक 100 रुपायसाठी 1 रुपये दंड होईल

Atal Pension Yojana Overview :

योजेनचे संपूर्ण नाव अटल पेन्शन योजना
कोणी सुरू केली केंद्र शासन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 18 ते 40 वयोगटातील नागरिक
लाभ निवृत्ती नंतर 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन
श्रेणी केंद्र सरकारी योजना
उद्देश वृद्धपकाळात पेंशन स्वरूपात आर्थिक उत्पन्न निश्चित करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन

Atal Pension Yojana Chart/Plan/ Contribution

चालू करतानाचे वय महिन्याची गुंतवणूक/रक्कम पेंशन रक्कम
18-22100042
18-22200084
18-223000126
18-224000 168
18-225000 210
23-27100053
23-272000 106
23-273000159
23-274000212
23-275000265
28-32100067
28-322000134
28-323000201
28-324000268
28-325000335
33-37100085
33-372000170
33-373000255
33-374000340
33-375000426
38-401000113
38-402000226
38-403000339
38-404000452
38-405000565

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज

Atal Pension Yojana | Atal Pension Yojana scheme | अटल पेन्शन योजना | Atal Pension Yojana tax benefits | Atal Pension Yojana chart | अटल पेन्शन योजना माहिती | Atal Pension Yojana marathi | अटल पेन्शन योजना प्रीमियम चार्ट | Atal Pension Yojana contribution |अटल पेन्शन योजना मराठी | Atal Pension Yojana benefits | अटल पेन्शन योजना फायदे |