SCSS in Marathi | ज्येष्ठ नागरिक बचत योजना |

बनवा तुमचे भविष्य सुरक्षित

हाय हेलो नमस्कार मित्रांनो आज आपण ध्येयपूर्ती या आपल्या मराठी वेबसाइट वर ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS in Marathi) याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. म्हातारपण ही अशी वेळ असते जिथे आपण दुसरे बालपण च जगत असतो आपले शरीर आदीक वय झाल्याने एकदम जीर्ण आणि निष्क्रिय झालेले असते. त्यामुळे वृद्धप काळात आपण कोणतेही कष्टाचे मेहनतीचे काम करू शकत नाही. आपल्याला काम करण्याचे मनात असून देखील शरीर साथ देत नाही. पण जगायचे असेल तर पैसा महत्वाचा असतोच आणि तो काम केल्याशिवाय मिळत नाही आणि अशा वेळी आपण कामही करू न शकल्यामुळे भासणारी पैशाची चणचण खूप त्रासदायक ठरते. तुमची ही समस्या सोडवण्यासाठी सरकार राबवत आहे जेष्ठ नागरिक बचत योजना. SCSS ही एक अशी योजना आहे ज्यातून तुमचे भविष्य सुरक्षित आणि सोयीचे होणार आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकारी गुंतवणूक योजना आहे. ही योजना पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजनेअंतर्गत येते.

SCSS in Marathi :- ज्येष्ठ नागरिक बचत योजना नक्की काय आहे, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची ठळक वैशिष्ट्ये, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी आवश्यक पात्रता, अटी, नियम तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजने साठी अर्ज कसा करावा, आणि त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अशा सर्व बाबींची माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. हा लेख वाचून सर्व गरजू लोकांनी याचा लाभ घ्या आणि सुरक्षित गुंतवणूक करा.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Senior Citizen Saving Scheme in Marathi

ज्येष्ठ नागरिक बचत योजना नक्की काय आहे

भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही 2004 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमातून हमी परतावा देण्यासाठी सुरू केली होती. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी जोखीममुक्त गुंतवणूक देते. ही योजना पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजनेंतर्गत येते. वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. त्याच वेळी व्हीआरएस घेणारी व्यक्ती आणि 55 वर्षे आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती देखील योजनेत खाते उघडू शकते. त्याच वेळी संरक्षण सेवांमधून निवृत्त झालेल्या 50 वर्षांवरील व्यक्तींनाही खाते उघडता येते.

नवीन नियमांनुसार, एक वर्षाचा गुंतवणुकीचा कालावधी संपण्यापूर्वी खाते बंद केल्यास, जमा केलेल्या रकमेपैकी एक टक्का रक्कम कापली जाईल. यापूर्वी एक वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी खाते बंद केले असल्यास त्या रकमेवर भरलेले व्याज वसूल केले जात होते आणि खातेदाराला शिल्लक रक्कम दिली जात होती

स्वरूप

 • ही योजना किमान 1000 रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू केली जाऊ शकते.
 • जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.
 • यामध्ये पाच वर्षांसाठी खाते उघडता येते. त्यानंतर ती तीन वर्षांसाठी वाढवता येईल.
 • योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास आयकराच्या कलम 80C चा लाभ मिळतो.
 • याद्वारे तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. योजनेत सरकार 8.2 टक्के व्याज देत आहे

Senior Citizen Saving Scheme

मॅच्युरिटी कालावधी

 • या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. म्हणजेच तुम्हाला या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
 • तुम्ही 5 वर्षापूर्वी खाते बंद करू शकता, परंतु तसे केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
 • योजने अंतर्गत आयकर सवलतीचा लाभ आहे
 • या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. म्हणजेच यामध्ये दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून तुम्ही या रकमेवर कर सूट मिळवू शकता.
 • मात्र, या योजनेंतर्गत मिळणारे व्याज करपात्र आहे. या योजनेअंतर्गत संयुक्त खाते देखील उघडता येते.

व्याज तिमाही आधारावर

 • ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS in Marathi) खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते
 • या योजनेतील व्याज तिमाही आधारावर उपलब्ध आहे.
 • एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी व्याज जमा केले जाते.

लाभ

गुंतवणूक लाभ
1 लाख रुपये 1 लाख 65 हजार 600 रुपये
2 लाख रुपये3 लाख 31 हजार 200 रुपये
5 लाख रुपये8 लाख 28 हजार रुपये
10 लाख रुपये15 लाख 90 हजार 400 रुपये
20 लाख रुपये31 लाख 80 हजार 800 रुपये
30 लाख रुपये31 लाख 80 हजार 800 रुपये

आवश्यक कागदपत्रे

 • आयडी प्रूफ (आधार कार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट)
 • 2 पासपोर्ट आकाराचे फोटो
 • पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, युटिलिटी बिल, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट)
 • स्वाक्षरीचा पुरावा (पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)

अर्ज कसा करावा

 • SCSS योजना साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे आणि पैसे घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिस मधे जावे लागेल.
 • तिथे तुम्हाला या योजनेचा अर्ज देतील. तो अर्ज तुम्ही बिनचूक भरा.
 • त्यात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. काही शंका असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना विचारा.
 • अर्जासोबत सांगितलेले सर्व कागदपत्रे जोडा.
 • अर्ज आणि पैसे पोस्ट ऑफिस मध्ये जमा करा.

SCSS Overview :

योजनेचे नावज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)
कोणी सुरु केलीकेंद्र सरकार
विभाग भारतीय डाक विभाग
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांवरील
जेष्ठ नागरिक
उद्देश राज्यांतील जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
श्रेणी केंद्र सरकारी योजना 2023

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Senior Citizen Saving Scheme | SCSS in Marathi | ज्येष्ठ नागरिक बचत योजना | Senior Citizen Saving Scheme in Marathi | SCSS | Senior Citizen Saving Scheme interest rate | ज्येष्ठ नागरिक बचत योजना मराठी | Senior Citizen Saving Scheme Interest | ज्येष्ठ नागरिक बचत योजना व्याजदर | SCSS interest rate | Senior Citizen Saving Scheme benefits |

SCSS in Marathi

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा